सकाळी उठल्यावर चेहरा दिसत असेल सूजलेला तर करा हे उपाय

सकाळी उठल्यावर चेहरा दिसत असेल सूजलेला तर करा हे उपाय

सकाळी उठल्यावर बऱ्याचदा तुमचा चेहरा सूजल्यासारखा दिसू लागते. चेहऱ्यावरची ही सूज (Face Bloating) यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र त्यासाठी घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण ही एक त्वचेबाबत असलेली सामान्य समस्या आहे. रात्रीची अपूरी झोप अथवा अती झोप, कामाची दगदग, अती ताण, चिंता, रात्रीचे जड जेवण, झोपण्यापूर्वी अती मद्यपान करणे, अती प्रमाणात कॉफी घेणे,शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असणे अशी अनेक कारणं यामागे असू शकतात. मात्र सकाळी उठल्यावर असा सूजलेला चेहरा पाहताना नक्कीच काळजी वाटू शकते. शिवाय ही सूज अथवा पफीनेस फाऊंडेशन, कन्सीलरनेही लपवता येत नाही. म्हणूनच या टिप्स फॉलो करा ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अशी सूज नक्कीच येणार नाही. 

थंड पाण्याने चेहरा धुवा -

सकाळी चेहऱ्यावर दिसणारी सूज कमी करण्यासाठी थंड पाण्याने चेहरा धुणे हा एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण थंड पाणी अथवा बर्फ चेहऱ्यावर लावण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सूज नक्कीच कमी होऊ शकते. याचं कारण थंड पाणी आणि बर्फ यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे स्किन पोअर्स घट्ट होतात आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचेला त्वरित आराम मिळतो आणि चेहऱ्यावरची सूज कमी होते. जर अगदी सकाळी सकाळी तुम्हाला थेट चेहऱ्यावर बर्फ लावणं त्रासदायक वाटत असेल तर एका भांड्यात बर्फ घ्या आणि त्या बर्फाची थंड वाफ चेहऱ्यावर घ्या. त्यानंतर एका सूती कापडात बर्फ घेऊन चेहऱ्यावर लावा अथवा बर्फामध्ये गुंडाळलेल्या कापडाने चेहरा पूसून काढा.

Shutterstock

चेहऱ्याला मसाज द्या -

चेहऱ्यामध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला जेड रोलर, कास्य मसाजर अथवा इतर मसाजर सारखे टूल्स उपयोगी पडू शकतात. यासाठी चेहऱ्यावर आणि मानेवर एखादे फेस ऑईल अथवा सीरम लावा. त्यानंतर हळू हळू मसाजरने चेहऱ्यावरील महत्त्वाचे पॉईंट्स प्रेस करत मसाज सुरू करा. असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेखालचा रक्तप्रवाह सुधारतो. स्नायू रिलॅक्स होतात आणि त्वचेमधील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. चेहऱ्यावरील सूज यामुळे कमी होऊ शकते.

योगासने आणि प्राणायम करा -

योगासने, प्राणायम, मेडिटेशन, वर्कआऊट करण्यामुळे शरीर आणि मनाला चांगला आराम मिळतोच. मात्र यामुळे तुमच्या शरीराचे सर्व स्नायू रिलॅक्स होतात, शरीराचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला तजेला येतो. व्यायाम करताना रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेचे पोअर्स मोकळे होत असतात. शारीरिक हालचाल योग्य पद्धतीने झाल्यामुळे शरीराला घाम सुटतो. या घामाद्वारे शरीरातील टॉक्सिन्स त्वचेबाहेर टाकली जातात. या सर्व क्रियांमुळे तुमच्या चेहऱ्यावरची सूज कमी होते. 

Shutterstock

डोळ्यावर काकडीचे काप ठेवा -

चेहरा रिलॅक्स करण्याचा एक त्वरित उपाय म्हणजे डोळ्यांना रिलॅक्स करणं. कारण त्याद्वारे तुम्ही तुमच्या शरीरातील ताण बाहेर टाकू शकता. यासाठी डोळ्यांवर गुलाब पाण्यात बूडवलेले कॉटन पॅड, काकडीचे काप अथवा केळीची साल ठेवा. ज्यामुळे तुमच्या  शरीरातील उष्णता, ताण डोळ्यांवाटे बाहेर पडत आहे असं तुम्हाला जाणवेल. शरीर रिलॅक्स झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सूजही कमी होईल.

भरपूर पाणी प्या -

चेहऱ्यावर सूज येण्याचं मुख्य कारण तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असणं अथवा डिहायड्रेशन असू शकतं. यासाठीच सकाळी उठल्याबरोबर भरपूर पाणी प्या. पाण्यामुळे युरिनद्वारे तुमच्या शरीतील टॉक्सिन बाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे सकाळी नाश्तामध्ये जलयुक्त पदार्थ, पेज, स्मूदी, सूप, ज्युस, नारळपाणी यांचा समावेश करा. शरीराला हायड्रेट ठेवण्याचा आणि चेहऱ्यावरची सूज कमी करण्याचा हा एक साधा आणि सहज करता येईल असा पर्याय आहे. 

Shutterstock

Skin Care

MyGlamm GLOW Iridescent Brightening Essence

INR 1,195 AT MyGlamm