जेवताना एखादी भाजी आवडली नाही की सर्वात पहिले कोणत्या पदार्थाची आठवण येत असेल तर ते म्हणजे लोणचं. आपल्याकडे अनेक प्रकारची लोणची केली जातात. पण लोणच्याला बुरशी लागते. लोणचं दीर्घ काळ टिकवायचे असेल तर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. लोणचं तयार करतानाच तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अधिक काळ लोणचं टिकविण्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. प्रत्येक लहान सहान गोष्टींची काळजी घेतली तर लोणचं दीर्घ काळ टिकण्यासाठी नक्कीच मदत होते. काही गोष्टी पूर्वपरंपरागत तुम्हाला माहीतही असतील. पण काही गोष्टी अधिक सोप्या रितीने आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्हालाही लोणच्याची आवड असेल आणि दीर्घ काळ लोणचं टिकवायचं असेल तर हे नक्की वाचा. पण त्याआधी लोणचं नेमकं खराब का होतं याची कारणं जाणून घेऊया.
लोणचं खराब होण्याची कारणे
लोणचं खराब नक्की का होतं तुम्हाला माहीत आहे का? याची काही महत्वाची कारणं जाणून घ्या.
लोणचंं खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला बुरशी लागणे. लोणच्यामध्ये जे साहित्य वापरण्यात येते त्यामुळे ही बुरशी लागते.
दुसरं कारण म्हणजे तुम्ही जर लोणच्यामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वापर केला नाही तर लोणचं खराब होतं. लोणच्याला जास्त प्रमाणात तेल लागतं.
तसंच लोणच्याचे साहित्य अर्थात कैरी, लिंब, आवळा हे नीट धुतले गेले नाही आणि त्यावरील डाग तसेच राहिले तरीही लोणचं खराब होण्याची शक्यता असते.
लोणचं बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यात अथवा चमच्याला योग्यरित्या स्वच्छ केले नाही अथवा कोणताही ओला चमचा लोणच्याच्या बरणीत घातल्यास, लोणचं खराब होते
ताजे लोणचे घातल्यानंतर सुरूवातीला काही दिवस यामध्ये चमच्याने वरखाली करणे गरजेचे असते. पण असं न केल्यास बुरशी लागण्याची शक्यता असते
लोणचे नुसते तयार करून चालत नाही ते टिकविण्यासाठी योग्य तऱ्हेने ठेवावेही लागते. याच्या काही सोप्या टिप्स जाणून घ्या
लोणचं तयार करून झाल्यावर दोन ते तीन दिवसाने मलमलच्या कपड्यामध्ये बरणी झाकून उन्हात ठेवावे ज्यामुळे लोणच्यात कोणताही दमटपणा असेल तर तो निघून जाईल आणि लोणचे दीर्घ काळ टिकू शकेल
लोणच्यातील मसाल्यांमध्ये दमटपणा असेल तर लोणचे खराब होऊ शकते त्यामुळे लोणचं तयार करण्यापूर्वी हे मसाले जरा भाजून घ्या अथवा मसाले काही वेळ उन्हात ठेवा
लोणच्यामध्ये मीठाचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. जर तुम्हाला दीर्घ काळ लोणचे टिकवायचे असेल तर त्यामध्ये मीठ थोडे जास्त प्रमाणात घाला. लोणचे हे बराच काळ ठेवण्यात येते. त्यामुळे मधून मधून त्यामध्ये मीठाचे प्रमाण तुम्ही तपासून घ्या
यामध्ये तेलामध्ये लोणचे पूर्ण मुरायला हवे असते. तेल तरंगणे गरजेचे आहे. तसे नाही झाले तर बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलाचे प्रमाण व्यवस्थित आहे की नाही ते पाहा. अन्यथा तुम्हाला वरूनही फोडणी घालता येते
गोड लोणचे बनवत असाल तर अजिबात पाण्याचा थेंबही राहता कामा नये. पाक व्यवस्थित जाड करून घेणे
लोणचे बनविण्यासाठी जो हंगाम आहे त्याप्रमाणे भाजीचा वापर करावा. भाजी आधी स्वच्छ धुवा. ती कपड्याने स्वच्छ करा आणि उन्हात काही वेळ सुकवा
कैरीच्या लोणच्यासाठी कच्ची कैरी आहे की नाही याचा अंदाज घेऊनच वापर करा. तसंच आवळा लोणचे बनविण्यासाठी ताजे आणि कच्चे आवळे घ्यावेत. यावर डाग असू नयेत
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक