तुमचेही गुलाबजाम फुटतात,जाणून घ्या परफेक्ट गुलाबजाम बनवण्याची पद्धत

तुमचेही गुलाबजाम फुटतात,जाणून घ्या परफेक्ट गुलाबजाम बनवण्याची पद्धत

गुलाबजाम हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. विशेषत: भारतात लग्नसमारंभापासून ते थेट कोणत्याही पार्टीपर्यंत गुलाबजाम हा पदार्थ अनेक ठिकाणी गोड पदार्थ म्हणून ठरलेला असते. एखाद्या ठिकाणाचा गुलाबजाम खाल्ल्यानंतर असात गुलाबजाम घरी करण्याचा विचार तुम्हीही कधी केला असेल आणि घरी गुलाबजाम बनवलेही असतील.गुलाबजाम बनवण्याची काहींची भट्टी एकदम छान जमते. तर काहींना मात्र शेवटपर्यंत गुलाबजाम काही बनवताच येत नाही. होते असे की, काहींचे गुलाबजाम फुटतात, त्यांना भेगा पडतात, काहींचा पाकच नीट होत नाही. असे काहीना काही झाल्यामुळे रेडिमेडसारखे गुलाबजाम बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न भंगते. पण अनेकवेळा वेगवेगळ्या पद्धतीने गुलाबजाम करुन पाहिल्यानंतर मी एकदम सोपी आणि साधी पद्धत अवलंबली ज्यामुळे माझे गुलाबजाम आता एकदम परफेक्ट होतात. हीच सोपी पद्धत आणि काही ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत आहे.

अशी बनवा तर्रीवाली मिसळ, होईल नेहमीच चमचमीत

पीठ असो कोणतेही 

गुलाबजामसाठी बाजारात रेडिमेड मिक्स मिळते. अनेक जुने आणि नवे ब्रँड यामध्ये आहेत. ज्या विषयी प्रत्येकाची आपआपली मतं अगदी ठरलेली आहेत. तुम्हाला पीठाचा घाट घरी घालायचा नसेल तर सरळ गुलाबजामचे रेडिमेड मिक्स घेऊन या ( घरी तुम्ही प्रमाण घेऊन पीठ बनवणे आणि विकत घेणे यामध्ये काहीच फरक पडत नाही. पण रेडिमेड पीठ हे वापरणे थोडे सोपे असते) ते आणल्यानंतर लगेचच किंवा काही दिवसांच्या फरकाने गुलाबजाम करणार असाल तर चांगले कारण गुलाबजामचे पीठ जितके जुने होते. तितके ते मळताना त्रासदायक होते. त्यामुळे गुलाबजामचे मिक्स कोणतेही असले तरी चालते. 


हलक्या हाताने मळा 

गुलाबजाम मिक्स किंवा तुमचं घरी बनवलेलं गुलाबजाम मिक्स  एकत्र येण्यासाठी हलक्या हाताने मळणे गरजेचे असते. जर तुम्ही हे पीठ मळताना थंड दूधाचा उपयोग केला तर अधिक चांगले. कारण दुधामुळे गुलाबजामचे मिक्स अधिक चांगले मऊसूत होते. अर्धे पाणी आणि अर्धे दूध घेऊनही तुम्ही गुलाबजामचे मिक्स मळू शकता. आता काय घालणार हे निश्चित झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने पीठ मळून घ्या. त्यावर जास्त जोर लावू नका. चिकट पीठ न मळता त्याचे गोळे पडतील असे पीठ मळा.

घरीच बनवा स्पेशल मालवणी मसाला रेसिपी (Malvani Masala Recipe In Marathi)

 

Instagram

पाक करा तयार 

पाकाच्या बाबतीत अनेकांच्या चुका होतात हे लक्षात आले आहे. त्यामुळे पीठ मळून झाल्यावर सगळ्यात आधी काही करायचे असेल तर त्याचा पाक तयार करुन घ्यायचा आहे. गुलाबजामसाठी फार जाड पाक चांगला लागत नाही. हलवाईच्या दुकानात हा पाक जाड असला तरी घरी असा मुळीच करु नका. याचे प्रमाणे हे कायम 1 वाटी साखर, एक वाटी पाणी असेच असू द्या. वाढवतानाही तसेच वाढवा. तुमचा पाक अगदी छान बनतो. साखर विरघळली आणि दोन उकळ्या आल्या की, त्यात केशराच्या काड्या आणि वेलची पूड घाला. तुमचा पाक तयार 


तुपात तळा गुलाबजाम 

गुलाबजामचे हव्या त्या आकाराचे गोळे करुन झाले की, ते तळण्यासाठी अनेक जण तेलाचा वापर करतात. पण तूपात तळलेले गुलाबजाम हे फारच टेस्टी लागतात. त्यामुळे एखाद्या खोल कढईत मध्यम आचेवर गुलाबजाम तळून घ्या. साधारण एक चॉकलेटी-सोनेरी रंग येईलपर्यंत तळा. गुलाबजाम मोठ्या आचेवर तळले की, त्यांना नुसता रंग येतो ते छान शिजत नाही. त्यामुळे थोडा वेळ काढून मगच ही रेसिपी करा. कारण गुलाबजाम प्रेमाने तळणे फारच गरजेचे असते.  गरमागरम गुलाबजाम पाकात घाला. 


तुमचे स्वादिष्ट गुलाबजाम तयार. तुम्ही कोणत्या पद्धतीने गुलाबजाम करता आमच्यासोबत नक्की शेअर करा.

मेथीच्या ताज्या पानांपासून बनवा घरीच कसूरी मेथी