अशी बनवा तर्रीवाली मिसळ, होईल नेहमीच चमचमीत

अशी बनवा तर्रीवाली मिसळ, होईल नेहमीच चमचमीत

महाराष्ट्रीयन पदार्थाची खासियतच असते त्याचा चमचमीतपणा. त्यातल्या त्यात मिसळ हा पदार्थ असा असतो जो चमचमीत आणि झणझणीत व्हायलाच हवा. मिसळ पाव हा तुमचा आवडीचा पदार्थ असेल आणि तुम्हाला बाहेर मिळते तशीच्या तशी मिसळ करायची असेल. तशीच मस्त तर्री तुम्हाला घरी बनवायची असेल. खोबऱ्याच्या वाटपाचा वापर न करता कशापद्धतीने तुम्हाला तर्रीवाली मिसळ करायची ते जाणून घेऊया. म्हणजे या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही मस्त मिसळ खाऊ शकाल.

असे केले खोबऱ्याचे वाटप तर टिकेल महिनाभर

अशी बनवा तर्रीवाली मिसळ

मिसळ ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि वेगवेगळ्या कडधान्यांचा वापर करुन बनवली जाते. काही जणांना मूग, मटकी, पांढरे वाटाणे यांचा वापर करुन बनवली जाते. तुम्ही अगदी कोणतेही कडधान्य निवडा.तुमच्या आवडीचे कडधान्य निवडले तरी देखील तुम्हाला याच पद्धतीने मिसळ करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिसळ केली तर तुम्हाला वेगळी तर्री बनवायची गरज लागणार नाही. 

(चार जणांसाठी )
साहित्य:    2 वाट्या भिजलेले कडधान्य, 2 मोठे कांदे, 2 मोठे टोमॅटो, 1 ½ चमचा कोणताही मिसळ मसाला, 3 मोठे चमचे लाल तिखट, तेल, कडिपत्ता, मोहरी, तेल, मीठ, आलं-लसूण पेस्ट, 1 चमचा हळद

अशी कराल पुरणाची पोळी तर होईल छान लुसलुशीत आणि चविष्ट

Instagram

कृती : 

  •  भिजवलेले कडधान्य घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या. कडधान्यांना मोड काढून घ्या. ज्या दिवशी मिसळ करणार त्या दिवशी तुम्ही भिजवलेले कडधान्य कुकरमध्ये घेऊन, त्यात थोडीशी हळद आणि पाणी घालून कुकरचे झाकण लावून 3 ते 4 शिटी काढून शिजवून घ्या. 
  • कांदा- टोमॅटो दोन्ही उभे चिरुन ते भाजायचे आहे. त्यासाठी तव्यावर तेल घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा आणि आलं-लसूण पेस्ट घालून छान परतून घ्या. त्यामध्ये टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. मिक्सरमध्ये त्याचे छान वाटप करा. जर तुम्हाला असे करायचे नसेल तर तुम्ही सरळ शेगडीवर किंवा आचेवर कांदा आणि टोमॅटो भाजून घ्या. आणि मग वाटा त्यामुळे त्याचा रंग थोडा चॉकलेटी दिसतो. 
  • आता वाटप तयार झाल्यानंतर मिसळ फोडणीला देण्याचे काम करायचे आहे. आता एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कडिपत्ता आणि मोहरी घालून तडतडू द्या. त्यामध्ये कांदा- टोमॅटोचे वाटप घाला आणि ते चांगले परतून घ्या. त्यामध्ये हळद, तिखट घालून चांगले परतून घ्या.याला चांगले तेल सुटायला हवे. 
  • थोड्यावेळ झाकण लावून तुम्ही त्याला वाफ येऊ द्या. त्यामध्ये तुम्हाला आता मिसळ मसाला घाला. मिसळ मसाला घालून तो चांगला शिजू द्या. त्यानंतर त्यामध्ये शिजवलेले कडधान्य घाला.
  • कडधान्य शिजलेले असले तरी देखील तुम्हाला हा मसाला चांगला या वाटपात शिजणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही चांगले उकळा. त्यामुळे त्यावर तर्री येते. अशी तर्रीवाली मिसळ चांगली लागते. 

सुक्या जवळ्यापासून बनवा या मस्त रेसिपी (Jawala Recipes In Marathi)

मिसळ अशी करा सर्व्ह

Instagram

मिसळ  जर तुम्ही घरी करत असाल तर अशी मिसळ करताना ती थोडी आधी करा. कारण मुरलेली मिसळ अधिक चांगली लागते. त्यामुळे खाण्याआधी किमान थोडे तास आधी ही मिसळ करा. मिसळ पाव करताना थोडी ग्रेव्ही जास्त हवी त्यामुळे तुम्ही पाणी जास्त घाला. त्यामुळे ही ग्रेव्ही जास्त छान आणि पातळ लागते. प्लेटमध्ये फरसाण, तर्री वाढून मस्त कांद्यासोबत मिसळपाव सर्व्ह करा

आता जर मिसळपाव करत असाल तर अशापद्धतीने करा. तुम्हाला नक्कीच अशी केलेली मिसळ आवडेल.