आपात्कालीन परिस्थितीसाठी तयार हवी ‘गो बॅग’

आपात्कालीन परिस्थितीसाठी तयार हवी ‘गो बॅग’

संकट कधीही सांगून येत नाही. त्या संकटाला सामोरे जाण्याची जिद्द अनेकांमध्ये असते. पण या जिद्दीसोबतच काही गोष्टींची पूर्वतयारी करणे हे फार गरजेचे असते. तुम्ही ‘गो बॅग’ असा प्रकार कधी ऐकला आहे का? जर ऐकला नसेल तर याची माहिती तुम्ही जाणून घेणे फार गरजेचे आहे. ‘गो बॅग’ही प्रत्येकासाठी महत्वाची असून ती काय आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घेऊया. अनेकदा शाळा, कॉलेजमध्ये मुलांना या विषयी अगदी आवर्जून सांगितले जाते. पण काही जण याकडे दुर्लक्ष करतात. तर काही जण मात्र ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे हे समजून त्यानुसार आपली गो बॅग तयार करतात. जाणून घेऊया ही ‘गो बॅग’ आहे तरी काय आणि ती कशी तयार करायला हवी.

स्तनांच्या बाजूची चरबी वाढू न देण्यासाठी ब्रा घालताना टाळा या चुका

‘गो बॅग’ म्हणजे काय?

Instagram

गो अर्थात जाणे ही बॅग अशी बॅग आहे ज्यामध्ये आपात्कालीन परिस्थिती असताना फक्त तेवढीच बॅग घेऊन घरातून बाहेर पडायचे आहे. गो बॅगमध्ये तुमच्या सगळ्या महत्वाच्या वस्तू तुम्हाला ठेवायच्या असतात. यात सोनं किंवा अशा गोष्टी येत नाहीत. तर कागदपत्रांचा समावेश असतो. कारण सोनं किंवा बाकीच्या गोष्टी इतके वजन घेऊन तुम्हाला निघायचे नसते. गो बॅगही पटकन सापडेल अशी आणि पटकन उचलता येईल अशी हवी असते. म्हणूनच त्याला ‘गो बॅग” असे म्हणतात. 

या हिवाळ्यात वीजेचं बिल कमी करण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

अशी तयार करा तुमची गो बॅग

जर तुम्ही घरातील सगळ्यांची गो बॅग करण्याचा निर्णय घेतला असेल तर अशा पद्धतीने ही गो बॅग करायला घ्या. 

  • घरातील प्रत्येकाची अशी गो बॅग असायला हवी. प्रत्येकी एक अशी गो बॅग असेल तर ती तुम्हाला इतरवेळीही कामी येते. 
  • गो बॅगमध्ये आपल्याला सगळ्या महत्वाच्या गोष्टी ठेवायच्या असतात. अर्थात यामध्ये आपल्याला कागदपत्रांचा समावेश करायचा असतो. कारण इतर गोष्टी आपण कशाही मिळवू शकतो. पण कागदपत्र पुन्हा मिळवणे हे थोडे कठीण काम असते. त्यामुळे तुमची काही कामही अडकू शकतात. 
  • साधारण फोल्डर असलेली बॅग किंवा मल्टी पाकिट असलेले फोल्डर तुम्ही यासाठी करु शकता. 
  • आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र, घराची कागदपत्र. एफडी, बँकेचे पासबुक यांचा समावेश असणे फारच गरजेचे असते. 
  • गो बॅगमध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला काही ठेवायचे असेल तर तुम्ही तुम्हाला आवश्यक वाटणाऱ्या अत्यंत महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश करु शकता. 
  • गो बॅग ही महत्वाच्या कागदपत्रांनी भरायची म्हणजे ती जड करायची असे होत नाही. कारण तुम्हाला ती पटकन उचलता यायला हवी. घरातील अशा ठिकाणी तुम्ही ती ठेवा की, ज्यावेळी काही आपात्कालीन परिस्थिती असेल त्यावेळी तुम्हाला ती बॅग पटकन उचलून ठेवता येईल. 
     

अजूनही तुम्ही तुमची गो बॅग तयार केली नसेल तर अशी गो बॅग आताच तयार करा.

 नव्या वर्षापासून पिकनिकसाठी असे करा पैशांचे नियोजन