ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
महागडा शालू टाकण्यापेक्षा असा करा त्याचा उपयोग, पैसै होतील वसूल

महागडा शालू टाकण्यापेक्षा असा करा त्याचा उपयोग, पैसै होतील वसूल

लेहंगा हा कितीही ट्रेंडमध्ये असला तरी देखील आजही अनेक वधू लग्नासाठी खास शालू निवडतात. नेहमीच्या साड्यांपेक्षा थोडा वेगळा असा हा शालू असतो. लग्नात शालू नेसून झाला की, तो फार फार जवळच्या दोन-चार लग्नांमध्ये नेसला जातो. पण त्यानंतर ती साडी नेसण्याचा योग तसा फार येत नाही. पण काही जण लग्नातला शालू 10 हजार आणि त्यापुढे निवडतात. अशा शालू दुसऱ्या कोणाला देऊन टाकायचा म्हणजे लग्नाची गोड आठवण टाकून देण्यासारखे असते. हा शालू नेसता येत नाही आणि कोणाला देऊनही टाकता येत नाही. त्यामुळे होतं असं की, हा शालू तसाच घरात पडून राहतो. काहीजण त्याकडे इतके दुर्लक्ष करतात की, तो कधी घडीत विरुन जातो हे देखील कळत नाही. शालूची अशी अवस्था होण्याआधी जर तुम्हाला त्याचा योग्य वापर करायचा असेल तर या काही आयडियाज तुम्हाला नक्की कामी येतील.

जुन्या साड्यांपासून शिवा ड्रेसचे असे हटके पॅटर्न्स (Dresses Made From Old Sarees In Marathi)

कुडता आणि जॅकेट

फॅन्सी ड्रेस

Instagram

ADVERTISEMENT

तुमच्याकडे कितीही वर्ष जुना शालू असला तरी त्याचा पदर आणि काठ हा फारच सुंदर असतो.म्हणूनच नववधू असताना तुम्ही त्याची निवड केलेली असते. असा सुंदर शालू जर विरत आला असेल तर त्यापासून सरळ एखादा छान कुडता शिवा. साडीच्या अंगाचा उपयोग करुन तुम्ही कुडता शिवू शकता. आणि त्यावर थोडासा हेव्ही आणि फेस्टिव्ह लुक येण्यासाठी तुम्ही जॅकेट घालू शकता. हे जॅकेट तुम्ही शालूच्या पदरापासून तयार करु शकता. साडीचा तुकडा मोठा असल्यामुळे तुम्हाला अनारकली, स्ट्रेट फिट अशा कोणत्याही स्वरुपाचा कुडता शिवता येऊ शकतो. पण जॅकेट शिवताना मात्र पदराचा भाग थोडा लहान असल्यामुळे तुमच्या शरीरयष्टीनुसार जॅकेट स्लिव्हलेस किंवा फुल स्लिव्हज असा शिवता येऊ शकेल. 

लहान मुलांसाठी ड्रेस

https://www.instagram.com/p/CFpSPC4KNXG/

Instagram

शालूपासून लहानमुलांचे सुंदर ड्रेस बनवता येतात. हल्ली पारपंरिक साड्या आणि बॉर्डरचा उपयोग करुन लहान मुलांना छान घेरदार फ्रॉक, झब्बा बनवला जातो. जो दिसायला फारच सुंदर दिसतो. ज्यापद्धतीने कुडता किंवा जॅकेट शिवला जातो. अगदी तसाच विचार करुन तुम्ही लहान मुलांना थोडे ट्रेडिशनल कपडे शिवू शकता. जे दिसायला फारच सुंदर दिसतात. मुलांना कपडे शिवताना त्यामध्ये अगदी आवर्जुन अस्तर घाला कारण जर साडीवर जर किंवा काही भरतकाम केलेले असेल तर त्याचा त्रास मुलांना होणार नाही. 

ADVERTISEMENT

पदराचा शिवा ब्लाऊज

पदराचा शिवा ब्लाऊज

Instagram

तुमचा फॅशन सेन्स चांगला असेल तर साडीच्या पदराचा योग्य उपयोग करुन तुम्ही एखादा नवा ब्लाऊजही तयार करु शकता साडीचा पदर हा नेहमी हेव्ही आणि खूप भरलेला असतो. हल्ली अशा भरजरी ब्लाऊजचा ट्रेंड आहे. गोल्डन, सिल्व्हर अशा जरीच्या साड्यांचे ब्लाऊज एखाद्या प्लेन साडीवर फारच शोभून दिसतात. पण त्यासाठी एक पारखी नजर हवी. शालूचा पदर फाडताना टेलरचा योग्य सल्ला घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा पॅटर्न शिवताना काही अडचणी येणार नाहीत. 

तुम्हालाही साडी सावरणे जाते कठीण? मग ट्राय करा रेडिमेड साडी

ADVERTISEMENT

कुशन कव्हर्स

Instagram

साडीपासून घर सजावट करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जुन्या शालूपासून छान कुशन कव्हर्स बनवता येतील. घर सजावटीची आवड असलेल्यांना माहीतच असेल की, हल्ली पारंपरिक प्रिंट असलेल्या कव्हर्सना जास्त मागणी असते. पैठणी किंवा साडीच्या उत्तम ब्राईट रंगापासून हे कव्हर बनवले जातात. ज्यांच्या किमती चांगल्याच असतात. जर तुमचा शालू तुम्ही अजिबात वापरणार नसाल तर अशा शालूपासून तुम्हाला असे कव्हर बनवायला काहीच हरकत नाही. अस्तर लावून असे कव्हर शिवल्यास अधिक काळासाठी टिकतात.

साडी वेगळ्या पद्धतीने करा ड्रेप

साडी वेगळ्या पद्धतीने करा ड्रेप

ADVERTISEMENT

Instagram

कितीही नव्या आयडियाज मिळाल्या तरी साडी फाडण्याची इच्छा ही काही केल्या अनेकांना शालू फाडण्याची इच्छा होत नाही. महाग असेल तर असा विचार येणे अत्यंत स्वाभाविक आहे. असे तुमच्याबाबतीतही होत असेल तर तुम्ही चक्क साडी थोडी वेगळ्या पद्धतीने ड्रेप करा. साडी ड्रेप करण्याच्या सध्या इतक्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ज्या तुम्ही नक्की ट्राय करायला हव्यात. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा लग्नात तुम्हाला अशा पद्धतीने साडी ड्रेप करता येते. ब्लाऊजमध्ये थोडी व्हरायटी आणली की हाच जुना शालू नवा दिसू लागतो. 

आता शालू वाया गेला म्हणायची वेळ येणार नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर करुन पैसा वसूल केला तर…टॅग करा तुमच्या मैत्रिणींना ज्यांना आहे या ट्रिकची खूपच गरज

‘या’ साड्यांशिवाय महाराष्ट्रीयन लग्न अपूर्णच (Maharashtrian Bridal Sarees In Marathi)

ADVERTISEMENT
04 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT