असे केले खोबऱ्याचे वाटप तर टिकेल महिनाभर

असे केले खोबऱ्याचे वाटप तर टिकेल महिनाभर

कोकण म्हटले की,अनेक जण खोबऱ्याचे वाटप घालतात.पण भाज्या, आमटी यासाठी रोजच्या रोज नारळ खवणे, कांदा चिरणे तो भाजणे आणि मग वाटणे हे सगळं करायला इतका वेळ जातो की, अनेकांना यामधील शॉर्टकट हवा असतो. रोजच्या रोज वाटप करायला नको म्हणून अनेक जण महिन्यातून एकदाच वाटप करुन ते फ्रिजमध्ये ठेवतात. पण फ्रिजमध्ये ठेवलेले वाटप ताज्या वाटपाची चव देऊ शकेल का? असा प्रश्न अनेकांना असतो. कारण खोबरं-कांदा खराब होण्याची शक्यता जास्त असते अनेकांना वाटते. जास्त काळासाठी फ्रिजमध्ये ठेवलेले वाटप हे थोडे खवट लागते. अशी तुमची तक्रार असेल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीने खोबऱ्याचे वाटप करत आहात.आज आम्ही तुम्हाला कांदा- खोबऱ्याचे वाटप करण्याची योग्य पद्धक सांगणार आहोत.

अशी कराल पुरणाची पोळी तर होईल छान लुसलुशीत आणि चविष्ट

असे करा कांदा- खोबऱ्याचे वाटप

Instagram

 सर्वसाधारणपणे उभा कांदा चिरुन आणि  खवलेले ओलं नारळ तेलात परतून ते वाटून ठेवले जाते. जे वाटप ताजे म्हणून वापरायला अगदी चांगले आहे. पण जर तुम्हाला ते टिकवायचे असेल तर थोडेसे वेगळ्या पद्धतीने ते करावे लागेल. 

  • खोबऱ्याच्या अर्धा कांदा घेऊन तो उभा चिरुन घ्या. ओला नारळ खवून घ्या. 
  • तव्यावर किंवा कढईमध्ये रोजच्यापेक्षा थोडे जास्तीचे तेल घेऊन त्यामध्ये कांदा परतून घ्या. कांदा चांगला लालसर झाला की, त्यामध्ये आलं- लसूण( आवडीनुसार) घालून परतून घ्या.
  •  लसूण आणि आलं चांगलं परतून झालं की, त्यामध्ये खोबरं घालून ते छान परतून घ्या. काही जणं सुकं खोबर वापरुनही वाटप करतात. तुम्ही तसेही करु शकता. 
  • आता खोबरं घालून चांगलं परतून घ्या. इतरवेळी तुम्ही खोबरं थोडं कच्चं ठेवलं तर चालू शकतं. पण ज्यावेळी तुम्हाला ते फ्रिजमध्ये ठेवायचं आहे तेव्हा तुम्हाला खोबरं नीट भाजावचं लागतं.
  • जर तुम्हाला थेड फ्रिजमधून काढून मसाला वापरायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले घालून ते देखील भाजून घ्या. 
  • सगळे सारण थंड झाल्यानंतरच खोबरं वाटायला घ्या. कारण त्यामुळे ते चांगलं वाटलं जातं आणि त्याला वेगळा वास येत नाही. 
  • मिक्सरला लावून कांदा- खोबऱ्याचे वाटप लावून बारीक किंवा तुम्हाला जसे लागते तसे करुन घ्या.  तुमचे कांदा खोबऱ्याचे वाटप तयार. हे वाटप तुम्ही भाज्या, उसळी, आमटी यासाठी वापरु शकता. 

लसूण आणि हिरव्या मिरचेचे चटपटीत लोणचे बनवा घरच्या घरी

असे करा कांदा खोबरं वाटप सेट

  1.  कांदा- खोबऱ्याचे वाटप सेट करताना तुम्ही एक चांगला एअर टाईट डबा निवडा. कारण हा डबा आतली हवा बाहेर जाऊ देत नाही. वाटप जास्त काळ टिकवायचे असेल तर ते तुम्ही फ्रिजरमध्ये ठेवा. 
  2. ज्यावेळी तुम्हाला हे वाटप वापरायचे आहे त्यावेळी तुम्ही पूर्ण डबा बाहेर काढून ठेवू नका. जेवढा हवा तेवढे वाटप काढून घ्या आणि त्याचा उपयोग करुन मस्त वाटपाची भाजी किंवा आमटी बनवा. 
  3. जर तुम्हाला सतत वाटप वापरायचे असेल तर तुम्ही आईस ट्रे किंवा ज्या भांड्यात त्याचे क्युब करता येतील असे वाटप सेट करा. म्हणजे ते वापरणे सोपे जाते. 


आता कांदा खोबऱ्याचे वाटप करायचे असेल आणि ते टिकवायचे असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने वाटप करा. 

भोगीची भाजी अशी करा अधिक चविष्ट, रेसिपी मराठीत (Bhogi Bhaji Recipe)