मानेखाली का होतो केसांचा गुता, जाणून घ्या उपाय

मानेखाली का होतो केसांचा गुता, जाणून घ्या उपाय

सुंदर लांब केस सगळ्यांनाच आवडतात. अनेकांचे मोठे केस पाहिले की, असे मोठे केस आपले ही असायला हवे असे अनेकांना वाटते. केस लहान असो किंवा लांब काही जणांच्या केसांचा गुंता हा काही केल्या सुटत नाही. विशेषत: मानेच्या खाली केसांचा असा काय गुंता होतो की तो सोडवता सोडवता नाकी नऊ येतात. केस विंचरताना किंवा बाहेरुन घरात आल्यानंतर माने खाली केसांचा गुंता झालेला तुम्हालाही जाणवले आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा केसांचा गुंता नेमका कशामुळे होतो आणि त्यावर काय सोपे उपाय करता येतील ते आज जाणून घेऊया.

केस पांढरे का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

का होतो केसांचा मानेखाली गुंता

Instagram

  • केसांचा गुंता होण्याचे पहिले कारण म्हणजे केस न विंचरणे. अनेकांना केस विंचरताना पाहिल्यावर इतकेच लक्षात येते की काही जण केस केवळ वरवर विंचरतात.
  • जर तुम्ही मानेपर्यंत येणारे कपडे घालत असाल. उदा.स्टँड कॉलर, टर्टल नेक अशा पद्धतीने गळ्यालगत असलेले कपडे. असे कपडे सतत केसांना लागत राहतात. त्यामुळे केस आणि कपड्यात सतत घर्षण होत राहते आणि केसांचा त्या ठिकाणी गुंता होत राहतो. 
  • केस धुतल्यानंतर केस कोरडे करुन विंचरणे हे जरी अनेकांना माहीत असले तरी देखील केस धुतल्यानंतर तसेच ओले केस घेऊन अनेक जण बाहेर पडतात. केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे देखील केसांचा गुंता होऊ लागतो. वर वर आपण केसांचा गुंता काढतो. पण मानेखाली हात घालून केस विंचरायला आपण मुळीच जात नाही. परिणामस्वरुप केसांचा गुंता वाढत राहतो 
  • केसांचा गुंता  वाढण्यामागे आणखी कारण म्हणजे काही जण शॅम्पू किंवा कंडिशनर लावताना मानेखाली लावत नाही. त्यामुळेही केसांचा गुंता सुटत नाही. तो अधिकच गुंतत राहतो. 
  • केसांचा गुंता वाढण्यामागे आणखी एक कारण असते ते म्हणजे मोठे केस. मोठे केस मोकळे ठेवत असाल तरी देखील केसांचा गुंता वाढू शकतो.

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

अशी घ्याल केसांची काळजी तर होणार नाही केसांचा गुंता

Instagram

तुमचाही वेगवेगळ्या कारणामुळे केसांचा अशापद्धतीने गुंता होत असेल तर तुम्ही  अशी घ्या केसांची काळजी 

  • केस विंचरताना मानेखाली आधी विंचरा. केसांचा गुंता जर खूप झाला असेल तर एखादे सीरम किंवा काहीही लावून केस जाड कंगव्याने विंचरुन घ्या. 
  • केस धुताना मानेखाली केसांना योग्य पद्धतीने शॅम्पू आणि कंडिशनर लावा त्यामुळे केसांचा गुंता कमी होतो. 
  • जर तुम्हाला केस सोडायची सवय असेल तर किमान बाहेर जाताना तरी केस बांधून घ्या. कारण जर तुम्ही केस बांधले तर केसांचा गुंता कमी होईल. 
  • केस लहान असतील तरी देखील केसांचा अशा प्रकारे गुंता होत असेल तरी देखील तुम्ही केसांची काळजी घेण्यासाठी जाड कंगवा सोबत ठेवा. केस जेव्हा शक्य असेल तेव्हा केस सोडवत राहा. 
  • जर तुम्ही स्टँड कॉलर किंवा कॉलर असलेले कपडे घालत असाल तर असे कपडे घालताना स्कार्फ घाला म्हणजे केसांचा गुंता होणार नाही. 

आता मानेखाली केसांचा गुंता होत असेल तर अशा पद्धतीने काळजी घ्या. 

केसांना करा कलर आणि हायलाईट घरी (How To Highlight Hair At Home In Marathi)

Beauty

Manish Malhotra Kesar Face Pack Gel

INR 945 AT MyGlamm