ADVERTISEMENT
home / Combination Skin
How To Take Care Of Combination Skin

मिश्र त्वचा असणाऱ्यांनी अशी घ्या काळजी (How To Take Care Of Combination Skin)

ना धड तेलकट ना धड कोरडी अशी त्वचा तुमची असेल तर तिला मिश्र त्वचा (Combination Skin) असे म्हणतात़. अशी त्वचा वातावरणानुसार बदलते. कधी तुकतुकीत तर कधी कोरडी अशी ही त्वचा वाटते. या त्वचेची काळजी घेणे फारच गरजेचे असते. कारण बरेचदा ही त्वचा अनेकांना ओळखता येत नाही. त्यामुळेच चुकीचे स्किनकेअर प्रॉडक्ट वापरले जाते. तुम्हालाही तुमची त्वचा कधी तेलकट आणि कधी कोरडी वाटत असेल तर तुम्ही आधी तुमची त्वचा कोणत्या स्वरुपाची आहे ते ओळखून तशी काळजी घ्यायला हवी. तसे केले तर तुमची त्वचा अगदी कोणत्याही हवामानात चांगली तुकतुकीत दिसेल. मिश्र त्वचा असणाऱ्यांनी त्वचेची नेमकी कशापद्धतीने काळजी घ्यावी? काय टाळावे आणि कोणते प्रॉडक्ट निवडावे याची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही यामध्ये केला आहे.

मिश्र त्वचा म्हणजे काय? ती कशी ओळखावी? (What Is Combination Skin & How To Know It?)

मिश्र त्वचा म्हणजे काय

Instagram

ADVERTISEMENT

त्वचेचे सर्वसाधारणपणे चार प्रकार आहेत. कोरडी त्वचा, तेलकट त्वचा, संवेदनशील त्वचा आणि मिश्र त्वचा. मिश्र त्वचा ही ओळखणे थोडे कठीण असते. कारण या त्वचेमध्ये अंशत: कोरडी- तेलकट आणि काही अंशी संवेदनशील त्वचेचे असतात. मिश्र त्वचा ही हवामानानुसार बदलते. त्यामुळे हिवाळ्यात ही त्वचा वातावरणातील थंडीनुसार कधी कोरडी तर कधी तेलकट जाणवते. उन्हाळ्याच्या दिवसातही अशी त्वचा अंशत: कोरडी आणि तेलकट असते. मिश्र त्वचेची अशी लक्षण जरी असली तरी देखील त्वचेचा हा प्रकार नेमका कसा ओळखायचा ते जाणून घेणे महत्वाचे आहे. तेलकट त्वचेप्रमाणे या त्वचेचा टी झोनकडील भाग म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटी तेलकट होत जाते. एकाचवेळी त्वचेवर वेगवेगळी लक्षणं दिसत असतील तर तुमची त्वचा मिश्र स्वरुपाची आहे. तुमची त्वचा कोणत्या प्रकारातील आहे हे जर तुम्हाला खात्रीशीर जाणून घ्यायचे आहे तर एखाद्या स्किन एक्सपर्टची मदत घ्या. कारण त्यांच्याकडे असलेल्या मशीन्स आणि इतर गोष्टी तुम्हाल तुमच्या त्वचेच्या प्रकाराची योग्य पद्धतीने जाणीव करुन देतात. त्यामुळे एक्सपर्टची मदतही तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरेल.

मिश्र त्वचेची काळजी कशी घ्यावी? (How To Take Care Of Combination Skin)

मिश्र त्वचेची काळजी घेणं फार कठीण नाही. तुम्ही रोज वापरत असलेले स्किनकेअर प्रॉडक्ट आणि त्वचेला हाताळताना थोडी काळजी घेतली तर तुम्हाला त्वचेसंदर्भात फारसा त्रास होणार नाही. या शिवाय त्वचेचा प्रकार कसा ओळखावा, ते देखील जाणून घेतलेले आहे.

सौम्य फेसवॉश (Gentle Face Wash)

त्वचेसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फेसवॉश. त्वचेसाठी फेसवॉशची निवड ही फारच महत्वाची असते. विशेषत: मिश्र त्वचा असणाऱ्यांना ही काळजी घ्यावी लागते. कारण बरेचदा तेलकट, कोरड्या त्वचेसाठी स्किनकेअर प्रॉडक्ट उपलब्ध असतात.पण यासोबतच मिश्र त्वचेसाठी देखील खास फेसवॉस बनवले जातात. ज्यामुळे तुमची त्वचा कोरडीही होत नाही आणि तेलकटही होत नाही. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेला तजेला तुम्हाला त्यातून अगदी सहज मिळतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये तुम्ही या गोष्टीचा समावेश करा.

ADVERTISEMENT

चांगले स्किन एक्सफोलिएटर (Good Exfoliation)

स्किन करा एक्सफोलिएट

Instagram

मिश्र त्वचा ही थोडी नाजूक असते. कारण या त्वचेमध्ये दोन त्वचेचे गुणधर्म असल्यामुळे त्वचेसाठी उत्तम एक्सफोलिएटर अर्थात स्क्रब शोधणे जास्त गरजेचे असते. तेलकट त्वचा अंशी असल्याने ओपन पोअर्सचा त्रास या त्वचेला असू शकतो. त्यामुळे योग्य वेळी त्वचा स्क्रब करणेही तितकेच गरजेचे असते. पण असे करताना त्वचा ही अंशत: कोरडी असल्यामुळे खूप दाणेदार आणि जाड स्क्रब वापरुनही चालत नाही. त्यामुळे त्वचा डॅमेज होण्याची शक्यता ही फार जास्त असले. एखादे माईल्ड आणि नॅचरल घटकांनी युक्त असे एक्सफोलिएटर वापरा. त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसेल. त्वचेसाठी  असे स्क्रब शोधत असाल तर तुम्ही फळांचे स्क्रब निवडा कारण त्यामध्ये जास्त कचकच नसते.

मॉईश्चरायझरची निवड (Selection Of Moisturizer)

प्रत्येकाच्या त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी अर्थात मॉईश्चर टिकवून ठेवण्यासाठी मॉईश्चरायझरची गरज असते. मिश्र त्वचेसाठी मॉईश्चरायझर हे केवळ त्वचेचा तजेला टिकवणे हे असते. कारण वातावरणातील बदलानुसार त्यामध्ये कोरडेपणा आणि तेलकटपणा येत असतो. थंडी असू दे किंवा उन्हाळा या दोन्ही वातावरणाच्या बदलात त्वचेमध्ये फरक जाणवून येतो. तुमची त्वचा फार तेलकट करणार नाही आणि त्वचेत चांगले मुरेल अशा मॉईश्चरायझरची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे असे समजा. चांगले मॉईश्चरायझर हे वापरल्याशिवाय मुळीच कळणार नाही. तुम्ही चांगल्या कंपनीचे आणि चांगल्या दर्जाचे मॉईश्चरायझर योग्य सल्ल्याने घ्या. हल्ली बाजारात काकडी, शिआ बटर, स्ट्रॉबेरीज असे वेगवेगळे घटक असलेले मॉईश्चरायझर मिळतात. पण असे मॉईश्चरायझर निवडतानाही तुम्हाला त्वचेच्या प्रकारानुसारच आणि योग्य सल्ल्यानिशी त्याची निवड करा. 

ADVERTISEMENT

फेस मास्क करा ट्राय (Try Face Mask)

फेस मास्क करा ट्राय

Instagram

फेस मास्क हा त्वचेसाठी फार गरजेचा आहे. त्वचेला तजेला देण्याचे काम फेसमास्क करतो.कोरड्या आणि तेलकट त्वचेसाठी वेगवेगळे फेस मास्क बाजारात मिळतात. पण त्यांचा वापर मिश्र त्वचेसाठी करणे मुळीच चांगले नाही. कारण त्याचे त्वचेवर विपरीत परिणाम होतात. फेस मास्क निवडताना त्यामध्ये योग्य प्रमाणात ओलावा आणि तेलकटपणा कमी करण्याची क्षमता हवी. अशा त्वचेसाठी फळांपासून तयार केलेले फेस मास्क हे उत्तम काम करतात. त्याचा वापर तुम्ही आठवड्यातून एकदा करा. त्यामुळे तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. शिवाय त्वचेवरील अतिरिक्त आणि नको असलेले तेलकट घटक अर्थात त्वचेखाली असलेले सीबम नियंत्रणात राहते.

फेस मसाज (Face Massage)

त्वचेचा प्रकार अगदी कोणताही असू दे. अशा कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी फेस मसाज हा फार महत्वाचा असतो. फेस मसाज केल्यामुळे त्वचेची इलास्टिसिटी टिकून राहायला मदत मिळते. त्यामुळे त्वचेसाठी टी ट्री ऑईल किंवा तेलकट नसलेल्या फेस ऑईलचा वापर करुन तुम्ही फेस मसाज करु शकता. जर तुम्हाला कोणत्याही तेलाचा वापर त्वचेसाठी करायचा नसेल तर तुम्ही नुसता मसाज करुनही त्वचा चांगली करु शकता. त्यामुळे तुमच्या त्वचेची इलास्टिसिटी चांगली राहील आणि त्वचा अधिक चांगली दिसेल. फेस मसाज करण्याच्या अनेक पद्धती आहे जर तुम्ही कांस्य मसाजचा उपयोग केला तर त्याने देखील तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. हाताने मसाज करायचा नसेल तर तुम्ही जेड रोलर, कांस्य मसाजर असा उपयोग करु शकता. मिश्र त्वचा असली तरी देखील त्वचेच्या खाली असलेल्या सेल्सला अॅक्टिव्ह करणे हे फार गरजेचे असते.जे फेस मसाज उत्तमपद्धतीने करते.

ADVERTISEMENT

फेस ऑईलची निवड करताना (Selection Of Face Oil)

फेस ऑईलची निवड करताना

Instagram

हल्लीचे प्रदूषण आणि वातावरणातील बदल पाहता त्वचेसाठी फेस ऑईल हे फार महत्वाचे असते. फेस ऑईलच्या वापरामुळे त्वचा अधिक चांगली दिसते. मिश्र त्वचेला तेलकट त्वचेप्रमाणे पिंपल्स येण्याचा त्रास होतो. त्यामुळे चेहऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाची अर्थात फेसऑईलची निवड करतानाही त्यांना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. तुमची त्वचा तेलकट त्वचेकडे अधिक झुकणारी असेल तर तुम्ही त्वचा तेलकट करेल अशा फेसऑईलचा वापर करु नका. त्याऐवजी योग्य अशा फेस ऑईलची निवड करा. सीरम स्वरुपात असणारे फेस ऑईल हे त्वचेसाठी फारच चांगले असते. त्यामुळे त्वचा ही अधिक सुंदर दिसते. व्हिटॅमिन C, E असलेले फेस सीरम निवडा त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. जर तुम्हाला  फेस ऑईल वापरण्याची भीती असेल तर तुम्ही फेस सीरम निवडू शकता. या शिवाय जर तुम्हाला टोनर वापरण्याचा सल्ला दिला असेल तर फेस टोनरआणि फेस सीरममधील फरक जाणून घ्या.

टाळा या प्रॉडक्टसचा प्रयोग (Products To Avoid)

त्वचेसाठी उत्तम प्रॉडक्ट निवडणे हे प्रत्येकाला आवडते. पण असे करताना बरेचदा चुकीचे स्किनकेअर प्रॉडक्ट निवडले जातात. तुम्हीही इतरांचे पाहून स्किनकेअर प्रॉडक्ट निवडत असाल तर असे करणे आताच टाळा. कारण तेल असलेले आणि त्वचा कोरडी करणारे असे दोन्ही घटक तुम्हाला मुळीच चालणार नाही. त्वचेवर कोणत्याही तेलाचा प्रयोग तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकतो. त्यामुळे तुमच्या त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. याशिवाय तुम्ही त्वचेसाठी  हानिकारक असलेले केमिकल्स वापरणेही टाळा.  कोणाच्याही सल्ल्याने प्रॉडक्ट निवडताना तुमच्या त्वचेला काय शोभते आणि काय नाही यादी काढून घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी प्रॉडक्ट घेत आहात त्यांना देखील या विषयीची माहिती द्या म्हणजे तुम्हाला नवीन प्रॉडक्ट निवडणे सोपे जाईल.

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQs)

1. संवेदनशील त्वचेने अधिक काळजी घेणे गरजेचे असते का?

संवेदनशील त्वचेला अगदी कोणत्याही गोष्टीचा सहज त्रास होऊ शकतो. वातावरणातील बदलही यांच्यासाठी फारच घातक असतात. शिवाय यांना जास्त केमिकल्सचा प्रयोगही घातक ठरु शकतो. त्यामुळे संवेदनशील त्वचेने अत्यंत काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घ्यावी.

2. संवेदनशील त्वचा कशी ओळखावी ?

संवेदनशील त्वचा ओळखणे फारच सोपे असते. कारण या त्वचेला अगदी कोणतेही नवे स्किनकेअर प्रॉडक्ट लावले तरी त्रास होतो. सूर्याची किरण, थंडी, उष्णता या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. तुम्हालाही असा त्रास त्वचेवर अगदी पटकन जाणवत असेल तर तुमची त्वचाही मिश्र आणि संवेदनशील प्रकारातील आहे असे समजावे.

3. संवेदनशील त्वचा असण्याची लक्षणे कोणती?

त्वचा लाल होणे, त्वचेवर जखमा होणे, काहीही लावल्यानंतर त्याचे चट्टे उठणे अशी काही संवेदनशील त्वचेची लक्षणे आहेत. या लक्षणांवरुन तुम्ही तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखू शकता. या शिवाय तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे हे देखील तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ओळखता येऊ शकते.

13 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT