असे बनवा घरीच तुमचे आवडते आईस्क्रिम केक (Ice Cream Cake Recipe In Marathi)

Ice Cream Cake Recipe In Marathi

प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त घरी स्वतःचा हाताने केक बनवावा असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी नेहमीच्या मावा केकपेक्षा काहीतरी हटके बनवावं असं तुम्हाला वाटू शकतं. आजकाल आईस्क्रिम केकचा ट्रेंड आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी आईस्क्रिमचा बेत आखणार असाल तर त्यासोबत आईस्क्रम केक बनवण्यास काहीच हरकत नाही. कारण आईस्क्रिम केक जास्त काळ टिकत नसल्यामुळे ते बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा घरीच बनवणं जास्त सोयीचं ठरू शकतं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत आईस्क्रिम केकच्या या भन्नाट रेसिपीज

Table of Contents

  चॉकलेट आणि व्हॅनिला आईस्क्रिम केक (Chocolate And Vanilla Ice Cake Recipe In Marathi)

  साहित्य  - 

  • एक कप मैदा
  • पाव कप तेल
  • अर्धा कप पिठी साखर
  • पाव कप कोको पावडर
  • अर्धा  कप दूध
  • अर्धा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • पाव चमचा बेकिंग सोडा
  • अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस
  • व्हॅनिला आईस्क्रिम
  • डेकोरेशनसाठी साहित्य 

  कृती  -

  ओव्हन प्रीहिट करून घ्या. केक चे भांडे ग्रीस आणि डस्टिंग करा. एका भांड्यात मैदा, पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा मिक्स करून चाळून घ्या. त्यात व्हॅनिला इसेंस, अॅपल सायडर मिसळलेले दूध टाका आणि कट आणि फोल्ड पद्धतीने बॅटर तयार करा. बॅटर सरसरीत झाले पाहिजे शिवाय त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. कॅकच्या भांड्यात बॅटर ओता आणि डॅब करा. ओव्हनमध्ये केक तीस मिनीटे बेक होऊ द्या. टूथपिकने केक चेक करा आणि तयार झाल्यावर बाहेर काढा. केक पूर्ण थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करा आणि दोन लेअरमध्ये एक कप आईस्क्रिम लावा. त्यावर दुसरा लेअर ठेवा आणि केकच्या वर आणि कडांवर दोन कप आईस्क्रिम चांगले स्प्रेड करा. चॉकलेट केक सजवण्यासाठी चॉकलेट चे तुकडे, कोको पावडर, जेम्सच्या गोळ्या, चेरी यांचा वापर करा. केकवर आईस्क्रिम तेव्हाच स्प्रेड करा जेव्हा तुम्हाला केक कापायचा असेल.

  Instagram

  सेव्हन लेअर आईसक्रीम केक (Seven Layer Ice Cream Cake In Marathi)

  साहित्य -

  • सहा कप मैदा
  • तीन कप साखर
  • सहा चमचे कोको पावडर
  • दोन चमचा बेकिंग पावडर
  • दोन कप बटर
  • दोन कप दूध
  • अर्धा कप तेल
  • दोन चमचे मिल्क पावडर
  • दोन चमचे व्हॅनिला इसेंस
  • फूड कलर
  • व्हॅनिला आईस्क्रिम

  कृती -

  मैदा, कोको पावडर. साखर, मिल्क पावडर, बेकिंग सोडा चाळून एकत्र करा. त्याच बटर, दूध, व्हॅनिला इसेंस मिसळा आणि बॅटर तयार करा. बॅटरचे सात भाग करा आणि त्यात सात रंगाचे फूड कलर मिसळा. छोट्या छोट्या केकच्या भांड्यात हे सातही केक बेक करून घ्या. केक थंड झाल्यावर त्यांच्या एक एक स्लाईस घ्या. प्रत्येक रंगाच्या स्लाईसवर दोन ते तीन स्कूप आईस्क्रिम लावा आणि स्प्रेड कराअशा प्रकारे तुमच्या केकचे सात थर तयार होतील. सप्तरंगाचा हा एक तुम्ही निरनिराळ्या फ्लेवर्सच्या आईस्क्रिमने सजवू शकता. 

  जाणून घेऊया ओरिओ बिस्कीटचा केक रेसिपी

  Instagram

  वॉलनेट ब्राऊनी आईस्क्रिम केक (Walnut Brownie Ice Cream Cake)

  साहित्य -

  • एक कप मैदा
  • दोनशे ग्रॅम वितळवलेलं डार्क चॉकलेट
  • एक कप पिठीसाखर
  • एक चमचा बेकिंग पावडर
  • चिमूटभर बेकिंग सोडा
  • पन्नास ग्रॅम कंडेन्स मिल्क
  • एक कप दूध
  • दोनशे ग्रॅम बटर
  • अक्रोडचा चुरा
  • एक चमचा कोको पावडर
  • व्हॅनिला आईस्क्रिम

  कृती  -

  डार्क चॉकलेटमध्ये बटर टाकून मिक्स करा. त्यामध्ये चाळलेला मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कंडेन्स मिल्क,दूध टाकून चांगलं बॅटर तयार करा. जर बॅटर घट्ट वाटत असेल तर थोडं दूध मिसळ्यास काहीच हरकत नाही. हिवाळ्यात बॅटर थंडाव्यामुळे घट्ट होऊ शकतं. केकच्या भांड्याला ग्रीस आणि डस्टिंग करून केक तीस मिनिटे बेक करा. बेक करण्यापूर्वी मैदा लावलेला अक्रोडचा चूरा बॅटरमध्ये घाला. मैदा लावल्यामुळे बेक होताना अक्रोडचा चूरा केकच्या भांड्याच्या तळाशी जाणार नाही. गरमगरम चॉकलेट ब्राऊनीचे चौकोनी तुकडे करा. त्यावर थंडगार व्हॅनिला आईस्क्रिम पसरवा आणि वरून मेल्टेड हॉट चॉकलेट टाका. 

  Instagram

  बनाना चॉकलेट आईस्क्रिम केक (Banana Chocolate Ice Cream Cake)

  साहित्य -

  • एक कप मैदा
  • पाव कप तेल
  • अर्धा कप पिठी साखर
  • पाव कप कोको पावडर
  • अर्धा कप दूध
  • एक पिकलेले केळं
  • अर्धा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • पाव चमचा बेकिंग सोडा
  • अर्धा चमचा व्हॅनिला इसेंस
  • व्हॅनिला आणि स्टॉबेरी आईस्क्रिम
  • डेकोरेशनसाठी पिकलेल्या केळ्याचे काप

  कृती -

  ओव्हन प्रीहिट करून घ्या. केक चे भांडे ग्रीस आणि डस्टिंग करा. एका भांड्यात मैदा, पिठी साखर, कोको पावडर, बेकिंग सोडा मिक्स करून चाळून घ्या. त्यात बटर, कुस्करलेलं केळं,इसेंस टाकून बॅटर तयार करा. बॅटर केकच्या भांड्यात भरून ओव्हनमध्ये केक तीस मिनीटे बेक करा. केक पूर्ण थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करा आणि दोन लेअरमध्ये व्हॅनिला अथवा स्टॉबेरी आईस्क्रिम स्प्रेड करा..त्यावर दुसरा लेअर ठेवा आणि केकच्या वर आणि कडांना देखील आईस्क्रिम लावून घ्या. केकच्या वर डेकोरेशनसाठी केळ्याचे काप पसरवा. 

  Instagram

  रसबेरी आलमंड आईस्क्रिम केक (Raspberry Ice Cake Recipe In Marathi)

  साहित्य -

  • फ्रेश रसबेरी
  • पाव कप साखर
  • एक चममाच लिंबाचा रस
  • एक कप बदाम
  • अर्धा कप खजूर
  • दोन चमचे कोको पावडर
  • दोन चमचे ओलं खोबरं
  • चवीपुरतं मीठ
  • पाणी
  • विपिंग क्रीम
  • कंडेन्स मिल्क
  • व्हॅनिला आणि रसबेरी आईस्क्रिम

  कृती -

  रसबेरी क्रश आणि साखर एकत्र मिसळा. त्यात थोडा लिंबाचा रस टाका. सर्व साहित्य गॅसवर पंधरा मिनिटे गरम करून त्याचा जॅम तयार करा. मिश्रण गाळणीने गाळून घ्या. मिक्सरमध्ये बदाम, खजूर, ओलं खोबरं, आणि कोका पावडर चवीपुरतं मीठ जाडसर वाटून घ्या. मिश्रणात थोडंसं  पाणी टाका. एका पॅनला ग्रीस करा आणि त्यात हे बॅटर टाका. वरच्या लेअरवर विपिंग क्रीम आणि कंडेन्स मिल्क चांगलं फेटून टाका. मिश्रण फ्रीजमध्ये दोन तास सेट करा. त्यानंतर वरून रसबेरी आणि रसबेरी क्रशने सजवा आणि पुन्हा थोडावेळ सेट करा. व्हॅनिला आणि रसबेरी आईस्क्रिम मिक्स करून त्याचा एक थर पुन्हा केकवर लावा. केक सेट करा आणि त्याचा आस्वाद घ्या.

  Instagram

  मिंट आईस्क्रिम केक (Mint Ice Cream Cake)

  साहित्य -

  • दीड कप मैदा
  • अर्धा कप साखर
  • दीड चमचे कोको पावडर
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • अर्धा कप बटर
  • अर्धा कप दूध
  • चमचाभर तेल
  • अर्धा चमचा मिल्क पावडर
  • पुदिना इसेंस
  • पुदिन्याची प्युरी
  • विपिंग क्रिम
  • व्हॅनिला आईस्क्रिम

  कृती -

  मैदा, कोको पावडर, साखर, मिल्क पावडर, बेकिंग सोडा चाळून एकत्र करा. त्याच बटर, दूध, पुदिना इसेंस मिसळा आणि बॅटर तयार करा. बॅटर केकच्या भांड्यात बेक करून घ्या. केक थंड झाल्याववर त्याचे दोन भाग करा. विपिंग क्रिममध्ये पुदिन्याची प्युरी टाकून ते विप करून घ्या. दोन स्लाईसच्या मध्ये हे विपिंग क्रिम भरा. केक अर्धातास फ्रिजमध्ये सेट करा सर्व्ह करण्यापू्र्वी केकवर व्हॅनिला आईस्क्रिम स्प्रेड करा आणि सजवा. 

  Instagram

  ओरिओ आईस्क्रिम केक (Oreo Ice Cream Cake Recipe In Marathi)

  साहित्य - 

  • ओरिओ बिस्किट
  • एक कप दूध
  • एक चमचा साखर
  • स्टॉबेरी आणि व्हनिला आईस्क्रिम 

  कृती -

  ओरिओ बिस्किटमधील क्रीम काढून ते मिक्सरमध्ये बारिक करा मात्र त्याची जास्त पावडर होता कामा नये यासाठी जाडसर करा.ओरिओ बिस्किटच्या पावडरमध्ये साखर टाका आणि दूध मिसळत बॅटर तयार करामिश्रणाला केकच्या भांड्यात टाका त्याआधी भांडे चांगले ग्रीस करा. गॅसवर डबल बॉयलर पद्धतीने म्हणजेच पाण्याच्या भांड्यावर आणखी एक भांडे ठेवून अथवा कुकरमध्ये तो केक झाकण लावून बेक करा. टुथपिकने केक झाला आहे का ते चेक करा आणि थंड झाल्यावर त्याचे दोन लेअर करा. दोन लेअरच्या मध्ये व्हॅनिला आईसक्रिम भरा ज्यामुळे तो केक एखाद्या मोठ्या ओरिओ बिस्किटप्रमाणे दिसेल. केकवर स्टॉबेरी आईस्क्रिम एकसमान लावा आणि वरून ओरिओ बिस्किट लावून केक सजवा.

  Instagram

  चॉकलेट वॅफल आईस्क्रिम केक (Chocolate Waffle Ice Cream Cake In Marathi)

  साहित्य -

  • तुमच्या आवडीनुसार वॅफल
  • व्हॅनिला आईस्क्रिम
  • चॉकलेट आईस्क्रिम
  • नटेला चॉकलेट
  • स्टॉबेरी आईस्क्रिम
  • रसबेरी अथवा स्टॉबेरी
  • मध 
  • हॉट फज

  कृती  -

  वॅफल मेकऱमध्ये तुमच्या आवडीनुसार वॅफल बनवून घ्या जर ते बनवणं शक्य नसेल तर चॉकलेट आणि नटेला फ्लेवरचे प्लेन वॅफल ऑर्डर करा. जर थंड झाले असतील तर ओव्हन अथवा पॅनवर गरम करा. एकावर एक वॅफल ठेवा आणि त्यावर व्हॅनिला, चॉकलेट, स्टॉबेरी असे आईस्क्रिम स्पेड करा. सर्वात शेवटच्या थरावर रसबेरी अथवा स्टॉबेरी, मध आणि हॉट चॉकलेट टाका. तुमचा चॉकलेट वॅफल आईस्क्रिम केक तयार आहे. 

  Instagram

  कसाटा आईस्क्रिम केक (Kasata Ice Cream Cake)

  साहित्य -

  • तीन कप मैदा
  • दीड कप साखर
  • तीन चमचे कोको पावडर
  • एक चमचा बेकिंग पावडर
  • एक कप बटर
  • एक कप दूध
  • पाव कप तेल
  • एक चमचा मिल्क पावडर
  • एक चमचा व्हॅनिला इसेंस
  • डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स
  • निरनिराळ्या प्लेवर्सचे होममेड आईस्क्रिम

  कृती -

  मैदा, कोको पावडर. साखर, मिल्क पावडर, बेकिंग सोडा चाळून एकत्र करा. त्याच बटर, दूध, व्हॅनिला इसेंस मिसळा आणि बॅटर तयार करा. बॅटरचे दोन भाग करा आणि तुमच्या आईस्क्रिमच्या रंगानुसार त्यात फूड कलर मिसळा. दोन्ही बॅटर केकच्या भांड्यात बेक करून घ्या. दोन्ही केक थंड झाल्याववर त्यांच्या आणखी एक स्लाईस करा. प्रत्येक स्लाईसवर दोन ते तीन स्कूप होममेड आईस्क्रिम लावा आणि स्प्रेड कराअशा प्रकारे तुमच्या केकचे चार थर तयार होतील. केक मध्ये आईस्क्रिम भरल्यामुळे तो आणखीन आकर्षक दिसेल वरून ड्रायफ्रूटने सजवा आणि केक कापण्यासाठी तयार करा. 

  Instagram

  रेड अॅंड व्हाईटआईस्क्रिम केक (Red And White Ice Cream Cake)

  साहित्य -

  • एक कप मैदा
  • फ्रेश स्टॉबरी
  • अर्धा कप दूध
  • एक चमचा व्हिनेगर
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • चिमुटभर बेकिंग सोडा
  • दोन चमचे कोको पावडर
  • आयसिंग शुगर
  • अर्धा कप तेल
  • व्हॅनिला इसेंस
  • शुगर सिरप
  • स्टॉबरी क्रश
  • व्हॅनिला आणि स्टॉबेरी आईस्क्रिम

  कृती -

  मैदा, बकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर, व्हॅनिला इसेंस एकत्र करा. त्यात कोमट दूध आणि व्हिनेगर मिसळा. स्टॉबेरीची क्रश, आयसिंग शुगर, तेल टाकून मस्त बॅटर तयार करा. केक ओव्हनमध्ये अर्धा तास बेक करा. थंड झाल्यावर त्याचे दोन भाग करा आणि त्यावर शूगर सिरप लावून तो नरम होऊ द्या.या लेअरवर स्ट्रॉबेरीचा क्रश पसरवा. त्यावर स्टॉबेरी आईस्क्रिम पसरवा. पुन्हा दुसरा लेअर ठेवा आणि त्यावर व्हॅनिला ऑईस्क्रिमचा लेअर परसवा. केक चारी बाजूनीं व्हॅनिला आईस्क्रिमने कव्हर करा आणि वरून स्टॉबेरीने सजवा. कापल्यावर लाल आणि पांढऱ्या रंगाचे हे लेअर्स खूप आकर्षक दिसतील.  

  Instagram

  आईस्क्रिम केकबाबत मनात असलेले निवडक प्रश्न - FAQs

  1. आईस्क्रिम केक फ्रीजमध्ये ठेवू शकतो का ?

  हो नक्कीच पण तुम्ही ते फक्त रेफ्रिजेरेटरमध्ये ठेवू शकता. कारण जर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवले तर तुमच्या केकचं आईस्क्रिम घट्ट होईल आणि केक कापताना तो कडक झाल्यामुळे लगेच कापता येणार नाही. शिवाय फ्रीजमधून बाहेर काढल्यावर लगेचच आईस्क्रिम वितळू लागेल.

  2. स्टॉबेरी केकसोबत कोणते आईस्क्रिम चांगले लागेल ?

  जर तुम्ही स्टॉबेरी फ्लेवरचा केक बनवणार असाल तर त्यासोबत वॅनिला, फ्रूट अॅंट नट, बदाम, अक्रोड अथवा चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रिम चांगलं लागेल.

  3. आईस्क्रिम केक वितळू नये यासाठी काय करावे ?

  आईस्क्रिम केक फ्रीजमधून बाहेर काढल्याबरोबर लगेच कापून खायला हवा. जर तुम्ही बाहेरून केक आणणार असाल तर तो आणताना विशेष काळजी घ्यावी. फ्रीजमध्ये ठेवताना तो एखाद्या पॅनप्रमाणे शेप असलेल्या भांड्यात ठेवावा.

  4. प्रवासात आईस्क्रिम केक दोन तास कसा टिकवावा ?

  प्रवासादरम्यान तुम्हाला दोन तासांसाठी आईस्क्रिम केक टिकवायचा असेल तर तो बर्फासोबत पॅक करायला हवा. जसं की आयसोलेटेड कंटेनर, इलेक्ट्रिक कुलरमधून तुम्ही आईस्क्रिम केक दोन तास टिकवू शकता. मात्र जर अशी कोणतीही सोय तुमच्याकडे नसेल तर मात्र तुमचा केक वितळण्याची शक्यता आहे.