ADVERTISEMENT
home / Recipes
kolambi recipes in marathi

झक्कास कोळंबी रेसिपी (Kolambi Recipes In Marathi)

 

मासे खाणाऱ्यांमध्ये ‘कोळंबी’ हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. कोळंबी हा असा मासा आहे जो खाताना त्याचे काटे काढावे लागत नाही. त्यामुळे ती पटपट आणि मटकन खाता येते. अगदी नव्याने मासे खायला सुरुवात करत असाल तरी देखील पहिला मासा जो तुम्ही खाऊ पाहायला हवा तो म्हणजे कोळंबी. कोळंबीचा वापर करुन अगदी स्टार्टसपासून सगळे पदार्थ बनवले जातात. कोळंबी वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते असे म्हणताना तिच्या अनेक रेसिपी फारच प्रसिद्ध आहेत. तुम्ही कोळंबीच्या मस्त चटपटीत रेसिपी बनवण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी मस्त कोळंबी रेसिपी शोधल्या आहेत. अगदी कोळंबी फ्रायपासून ते कोळंबी पुलावपर्यंत झटपट होणाऱ्या अशा या रेसिपीज आहे. इतकेच नाही तर या रेसिपी ट्राय केलेल्या असल्यामुळे डोळे बंद करुन या रेसिपींवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. चला जाणून घेऊया अशाच मस्त कोळंबी रेसिपी (kolambi recipe in marathi)

कोळंबीपासून बनवा वेगवेगळ्या कोळंबी रेसिपी (Different Types Of Kolambi Recipes In Marathi)

 

कोळंबीपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांची आम्ही एक यादीच केली आहे. तुम्ही अगदी कधीही ट्राय करु शकता अशा या कोळंबी रेसिपी आहेत.

कोळंबी फ्राय (Kolambi Fry Recipe In Marathi)

कोळंबी फ्राय  - Kolambi Fry Recipe In Marathi

Instagram

 

कोळंबी फ्राय ही रेसिपी अगदी प्रत्येक कोकणी घरात केली जाते. कोळंबीपासून केला जाणारा हा सुका प्रकार करणे फारच सोपे आहे.

ADVERTISEMENT

साहित्य:
स्वच्छ केलेली कोणत्याही प्रकारातील कोळंबी, लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तांदूळाचे पीठ, तेल, आमसुलाचा रस किंवा कोकम आगळ.

कृती:

  • एका भांड्यात कोळंबी घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आलं-लसूण पेस्ट घालून एकत्र केला.
  • त्यामध्ये कोकमचा आगळ घाला. एक फ्राय पॅन घेऊन त्यामध्ये तेल घ्या. मॅरिनेट केलेली कोळंबी तांदूळाच्या पिठीत घोळवून ती थेट तव्यावर फ्राय करण्यााठी ठेवा. एक बाजू चांगली शिजली की, मगच कोळंबी दुसऱ्या बाजूला परतून घ्या.
  • कोळंबी छान कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या. मस्त तिखट डाळ – भातासोबत ही कोळंबी छान लागते.

कोळंबी भात (Kolambi Bhat Recipe In Marathi)

कोळंबी भात - Kolambi Bhat Recipe In Marathi

Instagram

 

घरी भरपूर पाहुणे येणार असतील. मासे करायचा बेत असेल पण झटपट काहीतरी करायचे असेल तर कोळंबी भात ही अशी चमचमीत रेसिपी आहे जी तुम्हाला कधीही कमीत कमी साहित्यात पटकन करता येते. 

ADVERTISEMENT

साहित्य:
एक वाटी कोळंबी, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर, अख्खा खडा मसाला- तमाल पत्र, काळी मिरी, लवंग, तेल, मीठ,  गरम मसाला

कृती:

  • कोळंबी भात हा कुकरमध्ये पटकन करता येतो. हा अजून झटपट होण्यासाठी तुम्ही थोडा जाड तांदूळ वापरला तर आणखी चांगली चव येईल.
  • कुकरमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये अख्खा खडा मसाला घालून छान परतून घ्या. त्यामध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट घाला. छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कोळंबी घाला. धुतलेला तांदूळ घालून एकजीव करुन घ्या. अंदाजाने पाणी घालून झाकण बंद करुन घ्या.
  • कुकरच्या दोन शिट्ट्या काढून कुकर थंड करुन कोळंबी भात गरमागरम सर्व्ह करा. 

वाचा – Makhana Chivda Recipe In Marathi

कोळंबी मसाला रेसिपी मराठी (Kolambi Masala Recipe In Marathi)

कोळंबी मसाला - Kolambi Masala Recipe In Marathi

Instagram

ADVERTISEMENT

 

कोळंबीचा मस्त सुका मसााला आणि भाकरी हे कॉम्बिनेशन फारच सुरेख लागतं. आजही अनेक ठिकाणी कांदा-खोबऱ्याचे वाटप करुन हा मसाला केला जातो. कोळंबी मसाला हा चवीला एकदम मस्त लागतो. तो जितका शिळा होईल तितका जास्त चांगला लागतो.

साहित्य:
स्वच्छ केलेली कोळंबी, कांदा- खोबऱ्याचे वाटप, कडीपत्ता, तेल, आमसूल, कोथिंबीर

कृती:

  • कांदा- खोबऱ्याचे दरदरीत वाटप करुन घ्या. जर तुम्हाला कांदा-खोबऱ्याचे वाटप करता येत नसेल तर तुम्ही तव्यावर उभा चिरलेला कांदा- खोबरं- आलं-लसूण पेस्ट भाजून वाटून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्त्याची फोडणी द्या. कोळंबी घालून छान शिजवून घ्या. आता तयार वाटप घालून ते चांगले शिजवून घ्या.
  • त्यामध्ये आमसूल घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चांगली वाफ येऊ द्या.
    तयार कोळंबी मसाला मस्त भाकरीसोबत खा.

वाचा – Bhagar Amti Recipe In Marathi

ADVERTISEMENT

कोळंबीचं सुकं (Sukka Kolambi Recipe In Marathi)

कोळंबीचं सुकं - Sukka Kolambi Recipe In Marathi

Instagram

 

कोळंबीचं सुकं नावाचा प्रकार हा देखील अनेक ठिकाणी केला जातो. हा प्रकार पोळी किंवा भातासोबत खाता येतो. याला करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. पण आज आपण कांदा – टोमॅटोचा वापर करुन करु शकता.

साहित्य:
1 ते 2 वाटी कोळंबी, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, हळद, घरगुती मालवणी मसाला , मीठ, तेल, कडीपत्ता, कोथिंबीर, कोकम

कृती:

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात तेल गरम करुन उभा चिरलेला कांदा- टोमॅटो -आलं- लसूण पेस्ट भाजून घ्या. त्याची पेस्ट मिक्सरमध्ये करुन घ्या. किंवा तुम्ही कांदा- टोमॅटो बारीक चिरुही शकता.
  • कढईत तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्ता कांदा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो घालून छान तेल येईपर्यंत परतून घ्या.
    त्याला चांगले तेल सुटले की त्यामध्ये कोळंबी घालून छान परतून घ्या.
  • कोळंबी शिजली की, त्यामध्ये आमसूल, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गरम गरम भात- कांदा आणि कोळंबीचं सुकं एकदम मस्त लागतं.

कोळंबीची चटणी (Kolambichi Chutney)

कोळंबीची चटणी

Instagram

 

कोळंबी ही चटणी स्वरुपातही खाल्ली जाते. चटणी याचा अर्थ शब्दश: होत नाही. तर ती जास्त काळ टिकते आणि सोबत नेता येते म्हणून याला कोळंबीची चटणी असे म्हणतात

साहित्य:
कोळंबी, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, मीठ तेल, कोथिंबीर, तेल

कृती:

ADVERTISEMENT
  • एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये कांदा, आलं-लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, हळद, तिखट घालून चांगले परतून घ्या. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या.
  • त्यामध्ये कोळंबी घाला आणि छान शिजवून घ्या. कोळंबीची चटणी तयार

कोळंबीचं लोणचं (Kolambicha Loncha)

कोळंबीचं लोणचं

Instagram

 

ज्यांना माशांशिवाय दुसरं काहीही आवडत नाही अशांना कोळंबीचं लोणचं फारच आवडतं. अगदी कोणत्याही प्रवासाला गेल्यानंतर हे थोडसं लोणचं घेऊन खाल्लं तरी मासे खाल्ल्याचं समाधान मिळतं.

साहित्य:
कोळंबी, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, तिळाचे तेल
मोहरी- काळीमिरी-मेथीचे दाणे- लाल तिखट-हळद हे एक एक चमचा घेऊन त्याचा एक लोणचं मसाला करुन घ्या.

कृती:

ADVERTISEMENT
  • कोळंबी स्वच्छ करुन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ घालून एकजीव करुन घ्या. एक कढई घेऊन त्यामध्ये जास्तीचे तेल गरम करुन त्यामध्ये मसाला लागलेली कोळंबी घेऊन घेऊन ती चांगली दोन – चार मिनिटे शिजवून घ्या
  • आता पुन्हा एकदा त्याच कढईत थोडं जास्त तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी तडतडू द्या. त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून चुरचुरु द्या. त्यामध्ये लोणच्याचा मसाला अंदाजित घालून त्यामध्ये पुन्हा एकदा कोळंबी घाला. तेल सुटेपर्यंत कोळंबी लोणचं मस्त सर्व्ह करा.

कोळंबी 65 (Kolambi 65)

कोळंबी 65

Instagram

 

कोळंबीचा स्टाटर्स म्हणून आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कोळंबीपासून कोळंबी 65 देखील बनवू शकता. चिकन 65 प्रमाणेच याची रेसिपी असते. पण कमी वेळात ही रेसिपी होऊ शकते.

साहित्य:
स्वच्छ केलेली कोळंबी, कॉर्नफ्लॉवर- मैद्याचा घोळ, ढोबळी मिरची, पातीचा कांदा, बारीक चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या, ग्रीन चिली, रेड चिली, सोया सॉस,बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, मीठ, तेल

कृती :

ADVERTISEMENT
  •  एका भांड्यात कोळंबी घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घाला. ज्याप्रमाणे चिकन 65 करण्यासाठी ज्यापद्धतीने कोळंबी आधी फ्राय करुन घेतले जातात अगदी तसेच करायचे आहे. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा एक घोळ तयार करुन त्यामध्ये कोळंबी घोळवून सगळ्यात आधी कोळंबी तळून घ्या.
  • दुसऱ्या सॉस पॅनमध्ये तेल गरम करुन भरपूर चिरलेला लसूण आणि चौकोनी तुकड्यामध्ये चिरलेल्या ढोबळी मिरची आणि हिरव्या मिरच्या घालून छान स्टर करुन घ्या. या भाज्या पूर्ण शिजवायच्या नाहीत. त्या थोड्या स्टर फ्राय करायच्या आहेत.
  • त्यामध्ये सगळे सॉस घालून चांगले शिजवून घ्या.तुम्हाला थोडा चायनीज सारखा जाडसरपणा आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचे पाणी घालू शकता. त्यामुळे त्याला थोडासा जाडसरपणा येईल.
  • त्यामध्ये तयार कोळंबी घालून मसाल्यामध्ये छान घोळवून घ्या. वरुन कोथिंबीर भुरभुरून गरमा गरम स्टाटर्स म्हणून सर्व्ह करा.

कोळंबी तंदूर (Tandoor Kolambi Recipe In Marathi)

कोळंबी तंदूर

Instagram

 

आतापर्यंत तुम्ही चिकन तंदुरी हा प्रकार ऐकला असेल पण तुम्ही कधी कोळंबी तंदूर हा प्रकार ऐकला आहे का? हल्ली अनेक ठिकाणी स्टाटर्स म्हणून कोळंबी तंदूर दिले जाते ते बनवणे फारच सोपे आहे.

साहित्य:
एक वाटी कोळंबी, ऑलिव्ह ऑईल, आलं-लसूण पेस्ट, काळिमिरी पूड

कृती:

ADVERTISEMENT
  • कोळंबीसाठी तुम्हाला स्कुअरची गरज आहे. यासाठी तुम्हाला आधी कोळंबी मॅरिनेट करायची आहे.
  • एका भांडीत कोळंबी घेऊन त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, काळिमिरी पूड घाला. एक एक कोळंबी स्क्युअर्समध्ये लावा आणि जाळीदार तव्यायावर ठेवून आचेवर ठेवा. असे करताना तुम्हाला तेलाचा ब्रश मध्ये मध्ये फिरवायचे आहे. असे करताना कोळंबी खूप जाळू नका.
  • मेओनिझ किंवा मिटं मेयोसोबत तुम्ही ही कोळंबी खाऊ शकता.

कोळंबीची कढी (Kolambi Curry Recipe In Marathi)

कोळंबीची कढी

Instagram

 

कोकण म्हटलं की मासे आले. त्यातच कोकणात भात – मासे आवर्जून खाल्ले जातात. कोकणात माशांची कढी ही वेगळ्या पद्धतीने केली जाते. ही रेसिपी नक्की करुन पाहा.

साहित्य:
स्वच्छ केलेली कोळंबी, उभा चिरलेला कांदा – कांद्याच्या दुप्पट खोबरं, (धणे- लाल मिरची भिजत घातलेली), मीठ, तेल, कडीपत्ता, आमसुलं, कोथिंबीर

कृती :

ADVERTISEMENT
  • कोळंबीची कढी करण्यासाठी धणे- लाल मिरची ही साधारण तासभर भिजवून ठेवावी.
  • कांदा- खोबरं आणि भिजत घातलेले धणे- मिरची मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या. ते छान बारीक वाटून घ्या.
  • आता कोळंबीच्या कढीला फोडणी देण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्ता आणि कोळंबीची फोडणी द्या. कोळंबी पांढरी झाली की, त्यामध्ये वाटलेला मसाला घालावा.
  • कढी पातळ हवी असेल तर तुम्ही हे वाटप बारीक चाळणीतून गाळून घ्या. आता कढीमध्ये आवश्यक अससेले पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. खोबरं कच्चं असल्यामुळे फार उकळी काढू नका. कारण त्यामुळे कढी फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे जरासे आधाण आले की, मग गॅस बंद करा.
  • आमसूलं आणि कोथिंबीर घालून कढी झाकून ठेवा. गरमागरम भात आणि मस्त कढीचा आस्वाद घ्या. जर तुमच्याकडे कैरी असेल तर तुम्ही कैरीही घालू शकता.

वाचा – उन्हाळ्याच्या दिवसात आंबा खाण्याचे फायदे

कोळंबी बिर्याणी (Prawns Biryani Recipe In Marathi)

कोळंबी बिर्याणी

Instagram

 

अनेकांना चिकनला पर्याय म्हणून मासा हवा असतो. चिकनपेक्षा कोळंबी बिर्याणी तुम्ही कधी खावून पाहिली आहे का? जर तुम्ही कधी कोळंबी बिर्याणी खाऊन पाहिली नसतील तर नक्की खाऊन बघा.

साहित्य:
एक वाटी कोळंबी, अख्खा लांब बासमती तांदूळ, तळलेला कांदा, अख्खा खडा मसाला, आलं-लसूण पेस्ट, मीठ ,तेल

ADVERTISEMENT

कृती :

  • सगळ्यात आधी कोळंबी मॅरिनेट करुन घ्या. तांदूळ स्वच्छ धुवून तो निथळत ठेवा.
  • सगळ्यात आधी भात बनवून घ्या. त्यासाठी एका भांड्यात अख्खे खडे मसाले, तेल घालून त्यामध्ये तांदूळ घाला. भात हा ¾ शिजवून घ्या. पाणी निथळून घ्या. तांदूळ चांगला मोकळा करुन घ्या.
  • ज्या भांड्यात तुम्ही कोळंबी शिजवणार आहात आणि बिर्याणीला दम देणार आहात त्या भांड्यात तेल गरम करुन मॅरिनेट केलेली मसालेदार कोळंबी घाला. तळलेला कांदा घातल्यामुळे त्यात छान ग्रेव्ही तयार होईल. ही ग्रेव्ही फार आटू देऊ नका.
  • तयार ग्रेव्हीवर शिजलेला भात घाताचा थर घाला. गरज असल्यास पुदिन्याची पानं आणि केशराचे दूध रंगापुरते घाला.
  • पुन्हा भाताचा थर घालून त्यावर कोथिंबीर भुरभुरा आणि बारीक आचेवर कोळंबी बिर्याणी बंद करुन दम लावून घ्या आणि तुमची कोळंबी बिर्याणी सर्व्ह करा.

कोळंबी भजी (Kolambi Bhaji)

कोळंबी भजी

Instagram

 

बारीक बारीक कोळंबी तुमच्याकडे असेल तर तुम्ही मस्त कोळंबीची भजी बनवू शकता. बारीक बारीक असलेल्या कोळंबीला फ्राय करण्याचा फारच कंटाळा येतो. अशावेळी ही रेसिपी एकदम बेस्ट आहे.

साहित्य:
दोन वाट्या कोळंबी, तांदुळाचे पीठ, बेसन, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, मीठ, तळण्यासाठी तेल

ADVERTISEMENT

कृती:

  • एखाद्या भजीप्रमाणेच तुम्हाला याचे बॅटरही बनवायचे आहे. कोळंबी त्यात मीठ,हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, तांदूळाचे पीठ आणि त्याहून कमी बेसन घालावे.
  • तांदूळाच्या पीठामुळे एक क्रिस्पी टेक्श्चर मिळते. जे चवीला छान लागते.
  • आता बेताने पाणी घालून भजीचे बॅटर तयार करुन घ्या.
  • तेल गरम करुन त्यामध्ये भजी सोडायला घ्या. छान कुरकुरीत तळून भजी मस्त चटणी किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता.

कोळंबी कालवण (Kolambi Kalwan)

कोळंबी कालवण

Instagram

 

खूप ठिकाणी कोळंबीचे कालवण करण्याची पद्धत आहे. गरम गरम भातासोबत हे कालवण खाल्ले जाते. असे कालवण करायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कालवण करु शकता.

साहित्य:
कोळंबी, सुकं खोबर, लसणीच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, कडीपत्ता, लाल तिखट, हळद, तेल

ADVERTISEMENT

कृती :

  • कोळंबीचे वाटप आधी करुन घ्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या, कांदा, सुकं खोबरं आणि कोथिंबीर असे सगळे भाजून वाटून घ्या.
  • टोमॅटोची प्युरी करुन घ्या. आता फोडणी करण्यासाठी तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्ता चुरचुरु द्या. त्यामध्ये मसाला घालून खोबऱ्याचे वाटप घाला. खोबऱ्याचे वाटप चांगले परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घाला. चांगले भाजून घ्या. तेल सुटेपर्यंत तुम्ही हे सगळे वाटून घ्या.
  • मसाला चांगला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही कोळंबी घाला. आता चांगले शिजू द्या. छान तर्री आल्यानंतर तुम्ही मस्त कोळंबी खा.

कोळंबी मसाला फ्राय (Kolambi Masala Fry)

कोळंबी मसाला फ्राय

Instagram

 

कोळंबी मसाला फ्राय हा प्रकार कोळंबी फ्रायचाच एक प्रकार आहे. फक्त त्याला अधिक चुरचुरीत करण्यासाठी तुम्ही रव्यामध्ये घोळवून कोळंबी तळू शकता.

साहित्य: 
कोळंबी, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट, गरम मसाला, तेल, रवा- तांदूळाचे पीठ

ADVERTISEMENT

कृती :

  • एका भाडंयात रवा, तेल आणि तांदुळाचे पीठ सोडून सगळे एकजीव करुन घ्या.
  • आता कोळंबी रवा- तांदुळाच्या पीठात घोळवून ती छान क्रिस्पी तळून घ्या. यासाठी मोठी कोळंबी निवडाल तर फारच उत्तम
  • क्रिस्पी अशी कोळंबी तुम्ही मस्त चपातीसोबत खा.

केरळापद्धतीची कोळंबी (Kerala Style Prawns Curry)

केरळापद्धतीची कोळंबी

Instagram

 

कोळंबी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. केरळमध्येही कोळंबी अगदी सर्रास खाल्ली जाते. त्याची मासे करण्याची ही पद्धत थोडी वेगळी आहे. पण तितकीच चविष्ट आहे.

साहित्य:
कोळंबी, लाल सुकी मिरची, कांदा,टोमॅटो कडीपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल , कोथिंबीर, नारळाचे दूध

ADVERTISEMENT

कृती:

  • एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्ता, सुकी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. त्यामध्ये सहळे सुके मसाले घालून त्यामध्ये परतून घ्या. पाणी घालून त्यामध्ये कोळंबी घाला. कोळंबी चांगली शिजवून घ्या.
  • कोळंबी शिजल्यानंतर त्यामध्ये नारळाचे दूध घालून उकळी काढून घ्या. चिंचेचा कोळ घालून उकळी काढून घ्या. केरळापद्धतीची कोळंबी तयार

कोळंबी कांदा-लसूण मसाला (Kolambi Kanda- Lasun Masala)

कोळंबी कांदा-लसूण मसाला

Instagram

कोळंबी कांदा-लसूण मसाला ही देखील एक ड्राय पण मस्त डिश आहे. जी मस्त पोळीसोबत खाता येते. जर तुम्हाला कोळंबीचा असा सुका प्रकार खायचा असेल तर तुम्ही असा प्रकार करु शकता.

साहित्य:
एक वाटी कोळंबी,बारीक चिरलेला कांदा, कडीपत्ता, लसणीच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या, मीठ, तेल, कोथिंबीर, हळद, तिखट

ADVERTISEMENT

कृती:

  • कोळंबी स्वच्छ करुन घ्या. एका भांड्यात तेल गरम करुन त्यामध्ये कडीपत्ता,कांदा आणि लसणीच्या पाकळ्या घालून छान परतून घ्या. त्यामध्ये कांदा, हळद, तिखट घाला. कांदा चांगला परतून घेतला आणि मसाले चांगले भाजून झाले की, त्यामध्ये कोळंबी घाला.
  • आंबटपणा येण्यासाठी त्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा कोकमाचे पाणी घाला. कोथिंबीर भुरभुरून कोळंबी- कांद-लसूण मसाला सर्व्ह करा.

वाचा – खेकडा खाण्याचे फायदे (Khekada Khanyache Fayde)

कोळंबीचे वेगवेगळे प्रकार (Different Types Of Kolambi)

कोळंबीचे वेगवेगळे प्रकार

Instagram

ADVERTISEMENT

कोळंबीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला मासळी बाजारात दिसतील. कोळंबीचे हे प्रकार त्याच्या रंग आणि आकारावरुन अगदी चटकन ओळखता येतात. बाजारात एक फेरफटका मारल्यानंतर तुम्हाला कोळंबीचा प्रकार नक्कीच ओळखता येईल.

टायगर कोळंबी (Tiger Prawns)

हल्ली सगळ्या हॉटेलमध्ये मिळणारा कोळंबीचा हा प्रकार फारच प्रचलित आहे. आकाराने मोठ्या असलेल्या या कोळंबीला टायगर प्रॉन्झ असे म्हणतात. टायगर प्रॉन्झ ही फक्त आकाराने मोठी असते. म्हणून तिला टायगर प्रॉन्झ असे म्हणतात. कोळंबींच्या प्रकाराची शेती देखील केली जाते. ही कोळंबी मोठी असल्यामुळे त्याची मागणीही खूप आहे.

खाडीतले कोळंबी (Khadi Prawns)

खाडीमध्ये वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात. त्यामध्ये कोळंबी देखील मिळते. जर तुम्ही खाडीतली कोळंबी कधी पाहिली नसेल तर खाडीतील कोळंबी ही थोडीशी काळपट रंगाची असते. खाडीमध्ये टायगर कोळंबी नावाचा प्रकारही मिळतो. खाडीतली कोळंबी ही देखील चविष्ट लागते. खाडीतली कोळंबी बाजारात अगदी सहज मिळतात. खाडीतल्या कोळंबीची शेतीही करण्यात येते. या कोळंबीपासून स्टाटर्स बनवता येतात.

लाल कोळंबी (Red Prawns)

तुम्ही बाजारात जर लाल रंगाची कोळंबी पाहिली असेल तर ही कोळंबी समुद्री कोळंबी म्हणून ओळखली जाते. समुद्रातील या कोळंबीचा आकार हा फार मोठा नसतो आणि फार लहानही नसतो. या कोळंबीचे तोंड आणि शेपटी लाल रंगाची असते. ही कोळंबी तुम्हाला अगदी सहज ओळखता येते. समुद्रातील कोळंबीची चव ही थोडी वेगळी असते असे म्हणतात. जर तुम्ही सराईत मासे खाणारे नसाल तर तुम्हाला त्याची चव फारशी ओळखता येणार नाही. कारण साधारणपणे कोळंबीची चव ही एकसारखीच असते. 

ADVERTISEMENT

कोळंबी कशी स्वच्छ करावी? (How To Clean Kolambi)

कोणतेही मासे बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ करणे गरजेचे असते. मासे स्वच्छ करण्याची पद्धत ही थोडी वेगळी असत कोळंबी साफ करण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. कोळंबीचे वेगवेगळे प्रकार आणि आकार असतात. त्यानुसार कोळंबी स्वच्छ करायची असते. पण तरीदेखील कोळंबी स्वच्छ करताना साधारण ही स्टेप्स नक्की फॉलो करा. 

  • कोळंबी पाणी असलेल्या भांड्यामध्ये काढून घ्या. कोळंबी स्वच्छ करताना वरचे कडक कवच काढून मगच कोळंबी शिजवण्यात येते (काही ठिकाणी हे कडक कवच देखील तसेच ठेवून देतात) 
  • कोळंबीची शेपटी पकडून तिचे त्याचे कडक कवच काढून घ्या. कोळंबीचे कडक कवच काढल्यानंतर कोळबींचा दोरा. अर्थात त्याचा पोटातील घाण काढून घ्या. ते काढण्यासाठी कोळंबीच्या पाठीवर एक चीर द्या. सुरीच्या टोकाने किंवा टुथपीकने तो काळा दोरा काढून घ्या. 
  • कोळंबी स्वच्छ करणे तसे सोपे वाटले असले तरी ते काढण्यासाठी तसा बराच वेळ लागतो. मध्यम आकाराच्या कोळंबी सोलताना इतका त्रास होत नाही. पण बारीक कोळंबी सोलताना बराच त्रास होतो.

अशा पद्धतीने मस्त चमचमीत कोळंबी रेसिपी बनवा आणि त्याचा आनंद घ्या. 

28 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT