मास्कमुळे पिंपल्सचा होतोय त्रास, तर अशी घ्या काळजी

मास्कमुळे पिंपल्सचा होतोय त्रास, तर अशी घ्या काळजी

तोंडाला मास्क लावणे आता अनिवार्य असल्यामुळे पुढील काही काळासाठी तरी या मास्क पासून आपल्या कोणाालाच सुटका नाही. पण मास्क लावल्यामुळे त्वचेसंदर्भातील अनेक तक्रारींनी अनेक जण त्रस्त आहेत.  मास्क सतत लावल्यामुळे पिंपल्सचा त्रास तुम्हाला होऊ लागला आहे का? या पिंपल्सपासून सुटका मिळवायची असेल तर काही गोष्टींची खबरदारी राखणे फारच गरजेचे आहे.  जाणून घेऊया अशा प्रकारे पिंपल्स आल्यानंतर नेमकं काय करायला हवं ते

कोरोनाच्या काळात मास्क वापरताना कशी घ्याल त्वचेची काळजी

मेकअप करुन लावू नका मास्क

घराबाहेर पडल्यानंतरच मास्क लावण्याची गरज भासते. त्यामुळे साहजिकच चेहऱ्यावर थोडासा मेकअप करुन मगच आपण घराबाहेर पडतो. पण जर तुम्हाला या काळात जास्त पिंपल्स येत असतील आणि त्यामागचे कारण मास्क असू शकतो असे वाटत असेल तर तुम्हाला पिंपल्स कुठे आलेत ते बघा. ज्या ठिकाणी तुम्ही मास्क लावला आहे त्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आले असतील तर मास्क हे त्यामागचे कारण असू शकते.  हेवी मेकअप केल्यानंतर बरेचदा होते असे की, बाहेर जाताना तोंडाची वाफ हे त्वचेवर जाते. त्यामुळे गाल आणि तोंडाच्या आजुबाजूच्या परीसरात असणारे पोअर्स ओपन होऊन त्यामध्ये घाण साचण्याची शक्यता वाढते. या कारणामुळे तुम्हाला हमखास पिंपल्स येऊ शकतात. त्यामुळे खूप हेव्ही मेकअप करुन मास्क घालू नका. त्या ऐवजी खूप लाईट मेकअप आणि बेस न लावता कमीत कमी मेकअप करा. पिंपल्सचा त्रास नक्कीच कमी होईल.

मास्क हवा स्वच्छ

Instagram

मास्क हा काळजी म्हणून लावयचा असतो. याचा विसर खूप जणांना पडतो. कापडाचा मास्क खूप जण रोजच्या रोज धूत नाही. जर तुम्ही तुमचा मास्क रोजच्या रोज धूत नसाल तर कोरोनाची काळजी म्हणून आणि त्वचेसाठीही असा अस्वच्छ मास्क वापरणे चांगले नाही. मास्क हा तुमच्या तोंडाच्या इतका जवळ असतो की, तुम्ही जे काही खाता त्याचे अन्नकण ओठांच्या माध्यमातून मास्कला लागतात. मेकअप, लिपस्टिक, अन्नकण आणि थुंकी या सगळ्याचा त्रास  त्वचेला होण्याची शक्यता ही जास्त असते. सतत या गोष्टी तुमच्या त्वचेला लागत राहिल्या की, त्वचेच्या पोअर्समधून त्या आत जातात आणि त्यामुळे पिंपल्स येण्याची या शिवाय रॅशेश येण्याचीही दाट शक्यता निर्माण होते.

घरीच बनवा फेस मास्क आणि कोरोनापासून राहा सुरक्षित

मेकअप योग्य वेळी काढा

जर एखाद्या दिवशी तुम्हाला मेकअप गरजेचा नसेल तर तुम्ही मेकअप करु नका. मेकअपशिवाय शक्य असेल तर तुम्ही मास्क तसाच लावा. मास्क लावायचा असेल तर तुम्ही चेहऱ्याला सीरम किंवा टोनर लावा त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते. एखाद्या दिवशी हेवी मेकअप करुन मास्क लावला असेल तर तुम्ही आल्यानंतर मेकअप तातडीने काढून टाका. कारण सतत मेकअप लावणे ही चांगली गोष्ट नाही.  तुम्ही घरी आल्यानंतर मेकअप काढून टाका. त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहील.

तेलकट मेकअप टाळा

Instagram

मेकअप प्रॉडक्टची निवडही त्वचेसाठी फारच महत्वाची असते.चांगल्या प्रतीचे मेकअप प्रॉडक्ट वापरताना मास्कच्या आतमध्ये तेलकट प्रॉडक्ट हे जास्त तेलकट होतात. असे मेकअप हे पोअर्सच्या आत गेल्यामुळे त्वचा तेलकट होण्याची शक्यता असते.चेहऱ्यावर सतत तेलकट प्रॉडक्टसचा वापर झाला तर त्यामुळेही पिंपल्स येऊ शकतात. 


आता मास्कमुळे पिंपल्सचा त्रास होत असेल तर त्वचेची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

मास्क लावूनही असा टिकवता येईल मेकअप, मेकअप हॅक्स