ADVERTISEMENT
home / Fitness
रिकाम्या पोटी खा कडुलिंबाची पानं, शरीरासाठी होतो अफलातून उपयोग

रिकाम्या पोटी खा कडुलिंबाची पानं, शरीरासाठी होतो अफलातून उपयोग

आपल्याकडे अनेक औषधी वनस्पती आहेत. त्यामध्ये शरीरासाठी सर्वात उपयुक्त ठरणारे आणि  औषधीय वनस्पती म्हणजे कडुलिंब. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हेच आहे की, याची केवळ पानंच नाही  तर याची फळं, तेल, मूळ, साल या सगळ्याच गोष्टी औषधीय आहेत. कडुलिंबाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग कोणत्या ना कोणत्या तरी शारीरिक औषधासाठी करता येऊ  शकतो. पण याचा उपयोग करताना तुम्ही जर रिकाम्या पोटी करत असाल तर तुम्हाला काळजी घेणे आवश्यक आहे. रिकाम्या पोटी कडुलिंबाचा उपयोग करायचा असेल तर तो कसा आणि किती प्रमाणात करायचा याची माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतच काही महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून तुम्हाला देत आहोत. 

घरच्या घरी फेसपॅक करण्याआधी तयार करा या फेसपॅक पावडर

कडुलिंबाच्या पानाचा होणारा उपयोग

Shutterstock

ADVERTISEMENT
  • कडुलिंबाची पाने जर रिकाम्या  पोटी खाल्ली तर कॅन्सर होण्यापासून तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने हे कोणत्याही प्रकारे शरीरासाठी त्रासदायक ठरत नाहीत आणि शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो. याच कारणमुळे तुमच्या शरीरातील रक्त स्वच्छ राहते आणि कॅन्सरपासून बचाव होतो
  • कडुलिंंबाची पाने खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रिकाम्या पोटी जर काही पाने रोज तुम्ही सकाळी खाल्लीत तर शरीरासाठी याचा खूपच चांगला उपयोग होतो कारण यामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुण आढळतात
  • कडुलिंबाच्या बारीक काड्यांचा उपयोग तुम्ही दातूनप्रमाणे करू शकता. दातामध्ये कीड लागली असेल तर ती यामुळे निघून जाण्यास  मदत  मिळते. त्यामुळे जुन्या काळात याचा ब्रशप्रमाणेही उपयोग केला जात होता.  याशिवाय तुमच्या हिरड्या मजबूत करण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे रिकाम्या पोटी तुम्ही हे दातून म्हणून उपयोग करू शकता 
  • कडुलिंबाची पाने रिकाम्या पोटी खाणे नक्कीच चांगले आहे. पोटातील पचनक्रिया चांगली राखण्यासाठी याची मदत होते.  तसंच जळजळ, गॅस यासारख्या समस्या असतील तर  त्या दूर करण्यासही याचा उपयोग होतो. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो. कडुलिंबामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर येण्यास मदत मिळते आणि पोट स्वच्छ राहते 
  • तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पावडरचे सेवन करणे योग्य आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी किमान तीन महिने या पावडरचे  सेवन केल्यास, तुम्हाला मधुमेहापासून सुटका मिळू शकते. तसंच हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात तुम्ही खावे
  • वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही कोमट पाण्यातून रोज कडुलिंबाच्या पावडरचे सेवन केल्यास, काही महिन्यातच तुम्हाला योग्य परिणाम दिसून येईल. मात्र याचे प्रमाण अधिक असू नये हे लक्षात ठेवा. तसंच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
  • प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही गरम पाण्यातून हळद पावडर आणि कडुलिंबाची पावडर मिक्स करून प्यायलात तर कफ आणि सर्दीपासून दूर राहता आणि प्रतिकारशक्तीही वाढते. तसंच याच्या सेवनाने मलेरिया आणि पोटातील जंत यासारख्या समस्याही दूर होतात हे लक्षात घ्या

टीप – कडुलिंबाच्या पानाचा रिकाम्या पोटी उपयोग करताना तुम्ही अशा प्रकारे करू शकता. पण तुम्हाला जर नियमित वापर करायचा असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच याचा उपयोग करा 

केसांसाठी कडुलिंबाचे फायदे (Benefits Of Neem For Hair In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

 

ADVERTISEMENT

 

31 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT