कोणत्याही वयात जाड दिसायला कोणालाच आवडणार नाही. कपडे घातल्यानंतर त्यामध्ये बांधा सुडौल आणि चांगला दिसावा असे प्रत्येकाला वाटते. पण सगळ्यांचीच शरीरयष्टी एकसारखी नसते. त्यामुळे एखाद्या लेटेस्ट फॅशनला फॉलो करताना ते कपडे तुम्हाला मॉडेलने घातल्याप्रमाणे दिसतीलच असे नाही. पण ते कपडे तसे दिसणार नसले तरी देखील ती फॅशन तुम्ही करु शकत नाही असे मुळीच नाही. कपड्यांची ती स्टाईल करताना त्याची फिटिंग कशी असावी हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कितीही जाड असला तरी देखील तुम्हाला ते कपडे छान दिसू शकतात. तुम्हीही थोडे चबी आणि गुबगुबीत असाल तर तुम्ही कपड्यांच्या फिटिंग बाबत नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
जयपूर साड्यांचा वाढता ट्रेंड, आकर्षक आणि अप्रतिम साड्या
जीन्सची फिटिंग हवी अशी
जाड असणाऱ्या व्यक्तींना स्किनी जीन्स घातलाना बरेचदा अडचणी येतात.कारण अशा पँट शरीराला एकदम घट्ट बसतात. जर तुम्हाला स्किनी जीन्समध्ये पाय जास्त जाड वाटू द्यायचे नसतील अशावेळी तुम्ही हाय वेस्टेड जीन्सची निवड करा. हायवेस्टेड प्रकारातील जीन्स घातल्यामुळे कंबर लहान दिसते आणि मांड्यांना एक छान आकार मिळतो. बाजारात अशा जीन्स मिळतात. ज्यांच्यामुळे तुमची कंबर सुबक दिसते. अशा जीन्सची निवड करा. रोजच्या फिटिंगपेक्षा थोडी सैल जीन्स निवडली की, तुम्हालाही त्यामध्ये एकदम रिलॅक्स वाटेल.
बाह्या असू द्या मोठ्या
स्लिवलेस ड्रेस तुम्हाला चांगले दिसत नाही असे मुळीच नाही. पण कधीकधी हात जाड असतील तर स्लिवलेस ड्रेसमध्ये थोडे बल्की दिसायला होते. असे दिसायचे नसेल तर कोणत्याही कपड्यांचे हात थोडे लांब निवडा. ते फार घट्ट असायला नको. जर तुम्ही कपडे शिवून घेत असाल तर कुडत्यांचे हात हे लांब किंवा अगदीच स्लिवलेस असण्यापेक्षा ते कोपरापर्यंत असू द्या. अशा बाह्यांमुळे ड्रेस छान शोभून दिसतात. अगदी ब्लाऊज असू दे किंवा ड्रेस हात थोडे लांब आणि सैल असतील तर ते जास्त चांगले दिसतात.
कुडता असू द्या घेरदार
स्ट्रेट फिट प्रकारातील कुडते हे कितीही स्टाईलमध्ये असले तरी देखील असे कुडते बारीक चण वगळता सगळ्यांनाच थोड्याजास्त फरकाने जाड दिसण्यास भाग पडतात. जर तुमच्या नितंबाचा आकार तुमच्या शरीराच्या इतर अवयांच्या तुलनेत मोठा असेल तर तुम्ही कुडत्याचा घेर थोडा जास्त घ्या. त्यामुळे मांड्याचा भाग फार मोठा दिसत नाही. घेर जास्त असल्यामुळे तुम्ही त्यात छान बारीक दिसता. तुमची उंची कमी असली तरी देखील तुम्हाला घेरदार कुडता घेण्यास काहीच हरकत नाही. अगदी कट टू कट स्ट्रेट फिट कुडता निवडण्यापेक्षा थोडा घेरा जास्त शिवा. तुम्ही अधिक सुडौल आणि चांगल्या दिसाल.
हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड
क्रॉप टॉप निवडताना
हल्ली अनेक तरुण मुलींना क्रॉप टॉप घालायला आवडतात. क्रॉप टॉप दिसायला नक्कीच छान दिसतात. पण जाड मुलींना हे टॉप कसे स्टाईल करायचे कळत नाही किंवा क्रॉप टॉप कसे निवडायचे हे देखील कळत नाही. पण तुम्ही कितीही जाड असला तरी देखील क्रॉप टॉप घालू शकता. फक्त असे टॉप वरुन अंगालगत असतील तर पँट थोडी हाय वेस्टेड घाला. आणि क्रॉप टॉप फ्लोई असेल हाय वेस्टेड किंवा जॉगर्स स्टाईल पँटस घाला. ती तुम्हाला अधिक चांगली दिसेल.
स्किनीपेक्षा फ्लेअर्ड ड्रेस दिसतील सुंदर
स्किनी कपडे सगळ्यांनाच चांगले दिसतीलच असे नाही. त्यामुळे वनपीस निवडताना तुम्ही स्किनी किंवा बॉडीकॉन ड्रेस घालण्यापेक्षा तुम्ही थोडा फ्लेअर असलेला वनपीस निवडा. असे वनपीस तुम्हाला अधिक चांगले दिसतात. त्यात तुम्हाला अगदी सहज वावरता येते. त्यामुळे मोठ्या डिझाईन न निवडता थोडे सैल असे वनपीस निवडा. ज्यामध्ये तुम्ही अधिक चांगले दिसाल.
आता कपड्यांची फिटिंग निवडताना तुम्ही या गोष्टींचा विचार करा.
महागडा शालू टाकण्यापेक्षा असा करा त्याचा उपयोग, पैसै होतील वसूल