शॅम्पूच्या वापरानंतर तुमचेही गळतात का केस

शॅम्पूच्या वापरानंतर तुमचेही गळतात का केस

केस गळण्याची असंख्य कारणं आहेत. अपुरा आहार, अपुरी काळजी, चुकीच्या प्रॉडक्ट्सचा वापर अशी कित्येक कारणं केसांच्या गळतीसाठी कारणीभूत असतील. पण शॅम्पूच्या वापरानंतर तुमचे कधी केस गळले आहेत का? केस धुतल्यानंतर केस गळण्याची अनेकांची तक्रार असते. म्हणूनच काही जणांना केस धुवू नये असे वाटू लागते. अशा केसगळतीमुळे टक्कल पडेल अशी भीती तुम्हालाही वाटत असेल तर केसगळती का होते या मागचे कारण जाणून घ्या. तुमच्या केसगळतीसाठी तुमचा शॅम्पू कारणीभूत असतो की नाही  हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही महत्वाची माहिती वाचावी लागेल

केस पांढरे का होतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

आंघोळीनंतर गळतात केस

Instgram

केसांवरुन आंघोळ केल्यानंतर म्हणजेच शॅम्पूचा प्रयोग करुन काही जणांचे खूप केस गळतात. केसांचा पुंजकाच्या पुंजका हातात येतो. असे केस गळाल्यामुळे केस पुन्हा धुण्याची इच्छा होत नाही. पण शॅम्पूनंतर केसांचे गळणे हे अगदी स्वाभाविक आहे. केस धुतल्यानंतर ज्या ठिकाणी केसांची मूळ नाजूक झालेली असतात तिथे केसांचे गळणे अगदी स्वाभाविक आहे. पण 100 हून अधिक केस गळत असतील तर ही धोक्याची घंटा आहे असे समजून जा. कारण एकावेळी इतके केस गळणे तुमच्या डोक्याला टक्कल पाडण्यासही कारणीभूत ठरु शकतात

शॅम्पू बदला

काही शॅम्पूच्या वापराने केसगळतीला सुरुवात होते ही गोष्टही नाकारता येणार नाही. केसगळती होण्यासाठी अनेक केमिकल्स कारणीभूत असतात. काही जणांना प्रॉडक्टमधील काही घटक हे त्रासदायक ठरतात.त्यामध्ये असलेले केमिकल्स काही जणांच्या स्काल्पसाठी फारच त्रासदायक असतात. जर पूर्वी तुमचे केस गळत नसतील पण शॅम्पूच्या वापरामुळेच जर केस गळत असतील हे तुमच्या निदर्शनास आले असेल. तर तुम्ही आजच त्याचा वापर करणे टाळा.

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

शॅम्पूची निवड

Instagram

एखादा शॅम्पू तुमच्यासाठी योग्य आहे क, नाही हे तुम्हाला लगेच कळू शकत नाही. शॅम्पूमधील घटक जाणून घेऊन त्यातील कोणत्या घटकांचा तुम्हाला त्रास होतो हे जाणून घ्या. काही जणांना नैसर्गिक घटकांचा देखील त्रास होता. शिकेकाई, आवळा, रिठा हे घटक काहींच्या केसांवर म्हणावा तितका चांगला परिणाम करत नाहीत. त्यामुळे तुम्ही शॅम्पूची  निवड त्यापद्धतीने करा. जर एका वापरात शॅम्पू तुमच्या केसांवर विपरीत परिणाम करत असेल तर तुम्ही तो शॅम्पू तुमच्या यादीतून काढून टाका. एखाद्याच्या केसावर चांगल्या पद्धतीने काम करणारा शॅम्पू तुमच्या केसांवर तशाच पद्धतीने काम करु शकेल असे मुळीच होणार नाही. ज्या शॅम्पूने तुम्हाला त्रास होत असेल तर तो तुम्ही यादीतून तसाच काढून टाका. 

कमीत कमी शॅम्पूचा वापर

शॅम्पूच्या वापरामुळे केस गळतीचे कारण असते ते म्हणजे त्याचा अति वापर. जर तुम्ही आठवड्यातून चार ते पाचवेळा केस धुत असाल तर केस धुण्याची ही सवयही केसांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. आठवड्यातून दोनवेळाच केस धुवा. त्यामुळे तुमचे केस चांगले राहतील. शिवाय केमिकल्सचा कमीत कमी वापर केसांवर होईल.त्याने केसगळतीही नियंत्रणात येईल. 


आता शॅम्पूनंतर केसगळती होत असेल तर या गोष्टींचीही विचारात घ्या. योग्यवेळी शॅम्पूचा वापर करा आणि विपरित परिणामांच्यावेळी हा वापर टाळा

मऊ आणि मुलायम केस मिळविण्यासाठी अशी भिजवावी मेंदी