ADVERTISEMENT
home / Weight Loss
काय म्हणता, काहीही केल्या वजन होत नाही कमी… मग वाचाच

काय म्हणता, काहीही केल्या वजन होत नाही कमी… मग वाचाच

 

 

वजन वाढणे कमी होणे सगळे काही आपल्याच हातात असते.  खूप जण वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. जो काही चांगला सल्ला मिळेल तो सल्ला फॉलो करतात. पण इतके सगळे करुन काही जणांचे वजन काही केल्या कमी होत नाही.तुमच्याबाबतीतही अगदी तसेच होते का? पोटाला चिमटा काढून कमीत खाणं आणि जास्तीचा व्यायाम करताय पण म्हणावे तसे वजन कमी होत नसेल तर तुम्ही काही महत्वाचया गोष्टी चुकताय? या चुका सुधारल्या की, तुमचे वजन आपोआप कमी होईल आणि सोबत हेही लक्षात येईल की, वजन कमी करणे फार कठीण काम नाही. जाणून घेऊया वजन कमी करण्या मागते रहस्य

नियमित व्यायाम करूनही वजन होत नाही कमी, मग असू शकतं हे कारण

वेळेवर खा

 

वजन कमी करण्यासाठी कमी खाण्यापेक्षा वेळेवर खाणे हे फारच गरजेचे असते. जर तुम्ही तुमचा आहार वेळेवर घेतला तर तुम्हाला इतर गोष्टींचा त्रास फार जास्त होणार नाही. तुमची पचनक्रिया व्यवस्थित असेल तर तुम्हाला योग्यवेळी भूक लागते. काही जणांना अवेळी खाण्याची सवय असते. कधीही उठून खाणे काहीही पिणे, कधीही झोपणे या सगळ्यामुळे त्यांच्या आहाराचे गणित पूर्णत: बिघडून जाते. जर तुम्हाला वजन कमी खरंच कमी करायचे असेल तर सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत तुमचा नाश्ता व्हायला हवा. त्यानंतर साधारण तासाभराने दुसरा नाश्ता आणि दुपारी 2 च्या आत जेवण, रात्री 8 च्या आत रात्रीचे जेवण. असे टाईमटेबल असेल तर तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळेल.

ADVERTISEMENT

अपचनामुळे येतात का ढेकर? अशी मिळवा सुटका

क्वाटिंटी नाही क्वालिटी महत्वाची

क्वाटिंटी नाही क्वालिटी महत्वाची

Instagram

 

काही जणांना असे वाटते की, मी खूप कमी खाते. मी काहीच फारसं खात नाही तरी माझं वजन कसं काय वाढतं. पण तुमचा हाच गैरसमज तुमचे वजन वाढविण्यास कारणीभूत ठरतो. क्वाटिंटी नाही तर नेहमीच अन्नाची क्वालिटी महत्वाची असते. एखादी व्यक्ती तुमच्यापेक्षा जास्त खात असेल पण तरीही ती बारीक असेल याचे कारण इतकेच असते की. त्यांच्या पोटात आवश्यक असलेला आहार जात आहे.  त्यामुळे खाणं कमी करण्यापेक्षा चांगला आहार असू द्या. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल. आहारात कडधान्य,डाळी, भाज्या असे सगळे असेल तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल. 

ADVERTISEMENT

चुकीचा व्यायाम

 

अनेकांना जीम जॉईन केली म्हणजे असे वाटते की, आता आपले वजन कमी होणार! पण असे मुळीच नाही. तुम्ही जीम जॉईन केली आणि मनाला वाटेल तो व्यायाम केला तर तुमचे वजन कमी होईल याची खात्री मुळीच देता येत नाही. तुमचे वजन किती आणि तुम्हाला किती वजन कमी करायचे या नुसार वर्कआऊट प्लॅन तयार करा. त्यानुसार तुम्ही वर्कआऊट केला तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळू शकतो.  घरीच व्यायाम करत असाल तरी देखील तुमचे उद्दिष्ट लक्षात घेत वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. चुकीचा व्यायाम जर तुम्ही करत असाल तर त्याचा फायदा कमी नुकसान जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यायाम करताना तुमचे पोश्चर आणि व्यायाम प्रकार हा योग्य असू द्या. 

आता वजन कमी का होत नाही ? असा प्रश्न पडला असेल तर कदचित तुम्ही या चुका करत आहात. 

सुटलेल्या पोटाचा घेर सांगतो तुमच्या शरीरातील कमतरता

 

ADVERTISEMENT

 

 

 

20 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT