बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना या गोष्टी ठेवा लक्षात

बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना या गोष्टी ठेवा लक्षात

घरात लहान बाळाचे आगमन झाल्यामुळे सर्वांनाच आनंद होतो. मात्र लहान बाळ घरात येणं म्हणजे आईवडील या नात्याने तुमची जबाबदारी नक्कीच वाढत असते. बाळाल स्तनपान देण्यापासून ते  त्याला मालिश आणि अंघोळ घालेपर्यंत अनेक गोष्टी सावधपणे कराव्या लागतात. बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालणं हे तर एखाद्या टास्कपेक्षा कमी नाही. एवढंच काय तर नवमातांना पहिल्यांना आपल्या तान्ह्या बाळाला हातात घेणं ही कठीण वाटत असतं मात्र सरावाने कोणतीही माता मुलांचे संगोपन व्यवस्थित करू शकते. यासाठीच तुमच्या नवजात बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालणार असाल तर त्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जरूर वाचा.

बाळाच्या जन्मानंतर लगेच त्याला अंघोळ घालण्याची घाई करू नका -

बाळाच्या जन्मानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये स्पंजिंग केलं जातं. शिवाय काही दिवस त्याला अंघोळ न घालण्याचा सल्लाही दिला जातो. त्यामुळे ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. बाळाला लगेच  अंघोळ घालण्याची घाई करण्याची गरज नाही. त्याला जन्मानंतर लगेचच काही लस दिल्या जातात ज्यामुळे बाळाला कोणतेही इनफेक्शन होत नाही. 

Instagram

असं करा बाळाचं स्पंजिंग -

जन्मानंतर बाळाला लगेच अंघोळ घालण्यापेक्षा डॉक्टर तुम्हाला स्पंजिंग करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पहिले काही दिवस स्पंज बाथ हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण त्यामुळे बाळाची स्वच्छताही राखली जाते आणि तुम्हाला  बाळाला हाताळण्याचे  तंत्रही समजते. शिवाय या काळात बाळाच्या पोटाला गर्भनाळ चिकटलेली असते. ज्यामुळे त्याला ओल्या फडक्याने पुसून काढणे हा अतिशय योग्य मार्ग असतो. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या  त्यामध्ये स्वच्छ कापड बूडवा ते घट्ट पिळून घ्या आणि त्याने तुमच्या बाळाला पुसून अंघोळ घाला. 

Instagram

बाळाला अंघोळ घालताना या गोष्टी ठेवा लक्षात

  • बाळाची गर्भनाळ गळून पडल्यावर तुम्ही बाळाला पाण्याने अंघोळ घालू शकता. मात्र त्याआधी त्याचे ज्ञान आत्मसात करा
  • बाळाला मालिश केल्यावर अंघोळ घालणार असाल तर बाळाला हाताळताना सावध रहा.
  • बाळाचे अंघोळीचे पाणी जास्त गरम असता नये यासाठी हाताने ते आधी चेक करा आणि मगच बाळाला अंघोळ घालण्यास सुरूवात करा
  • बाळाच्या अंघोळीसाठी लागणारे बाथटब, बेबी सोप, टॉवेल असे सर्व साहित्य आधी जवळ करून ठेवा
  • बाळाला बाथ टब अथवा पायाच्या मांडीत घ्या आणि हळू हळू अंघोळ घालण्यास सुरूवात करा
  • बाळाच्या तोंडावरून पाणी टाकताना नीट काळजी घ्या
  • अंघोळ झाल्यावर लगेचच मऊ टॉवेलने बाळाला गुंडाळा
  • बाळाला दररोज अंघोळ घालण्याची मुळीच गरज नाही, आठवड्यातून दोन ते तीन वेळा अंघोळ घाला आणि बाकीचे दिवस स्पंज बाथ द्या

सूचना -

बाळाला पहिल्यांदा अंघोळ घालताना नेहमी एखाद्या तज्ञ, अनुभवी व्यक्तीची मदत घ्या. त्याचप्रमाणे बाळाला कधीपासून अंघोळ घालण्यास सुरूवात करावी याबाबत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm