ट्रॅव्हल पॅकेज बूक करण्यापूर्वी ट्रॅव्हल कंपनीकडून जाणून घ्या ही माहिती

ट्रॅव्हल पॅकेज बूक करण्यापूर्वी ट्रॅव्हल कंपनीकडून जाणून घ्या ही माहिती

वर्षभर घरात अडकून पडल्यामुळे मागच्या वर्षी अनेकांचे ट्रॅव्हल प्लॅन चांगलेच रखडले होते. मात्र नव्या वर्षाची दमदार सूरूवात करत अनेकांनी फिरण्याचे खास बेत नक्कीच आखले असतील. ट्रॅव्हल पॅकेज बूक करण्यासाठी तुम्ही एकतर ऑनलाईन अॅप्सचा वापर करता किंवा मग एखाद्या चांगल्या ट्रॅव्हल कंपनीची मदत घेता. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर आणि आरामाचा होतो. फिरताना ट्रान्सपोर्ट पासून अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्यापर्यंत ते अनेक टुरिस्ट पॉईंटचं प्री बुकींग करण्यापर्यंत अनेक गोष्टींचं निजोयन करावं लागतं. अशा वेळी हे ऑनलाईन ट्रॅव्हल अॅप अथवा ट्रॅव्हल कंपनी तुम्हाला योग्य ती सेवा पुरवतात. यासाठी काही ट्रॅव्हल कंपनी ग्राहकांसाठी खास ट्रॅव्हल पॅकेज तयार करतात. जे बूक केलं की तुम्हाला कोणत्याच गोष्टींची काळजी करावी लागत नाही. तुम्हीदेखील फिरण्यासाठी असं एखादं ट्रॅव्हल पॅकेज बूक करणार असाल तर थोडं थांबा आणि त्याआधी ही माहिती नीट वाचा. 

पॅकेजमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे -

ऑनलाईन अॅप अथवा ट्रॅव्हल कंपनीने जाहीर केलेल्या टूर पॅकेजमध्ये प्रवासाचा प्रत्येकी खर्च, तारखा, किती दिवस आणि  कोणकोणत्या गोष्टी त्यात असणार ते कोणकोणत्या गोष्टी समाविष्ठ नसणार या सर्व गोष्टींचा तपशील असतो. आधी त्या सर्व गोष्टी बारकाईने वाचा. त्याबाबत मनात काही प्रश्न असतील तर ते प्रश्नोत्तरे अथवा  फोन कॉलवर विचारून घ्या. ज्याामुळे पॅकेज बूक केल्यावर अथवा फिरायला जाण्यासाठी निघताना तुमची पंचाईत होणार नाही. 

प्रवास लहान मुलं आणि वृद्धांसाठी सोयीचा आहे का -

जर तुम्ही कुटुंबासोबत फिरणार असाल तर तुम्ही बूक केलेलं ट्रॅव्हल पॅकेज तुमच्या लहान मुलांसाठी अथवा घरातील वृद्धांसाठी सोयीचं आहे का ते आधीच तपासून घ्या आणि मगच बूकिंग करा. कारण त्यानुसार तुम्हाला तुमचं फिरण्यासाठी योग्य ते डेस्टिनेशन ठरवावं लागेल. अती थंडी अथवा अॅडवेन्चर गोष्टी असलेल्या ठिकाणी तुम्ही लहान मुलं आणि वृद्धांना घेऊन जाऊ शकत नाही. चुकून पॅकेजमध्ये या गोष्टी असतील तर तुमचा वेळ आणि पैसा वाया जाईल यासाठी तुमच्या सोयीनुसार पॅकेजमध्ये  बदल करून घ्या.

Shutterstock

पिकअप आणि ड्रॉपची काय व्यवस्था आहे -

बऱ्याचदा ट्रॅव्हल कंपनीने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये पिकअप आणि ड्रॉपची व्यवस्था लिहीलेली असते. मात्र तसं लिहिलेलं नसेल तर अशा वेळी तुम्हाला प्रवास सुरू करण्यासाठी कुठे पिकअप केलं जाणार, किती  वाजता प्रवास सुरू होणार, पुन्हा तुम्हाला कुठे सोडलं जाणार आणि ती वेळ नेमकी काय हे आधीच माहीत असायला हवं.

पर्यंटन स्थळी काही आपात्कालीन परिस्थिती झाल्यास काय व्यवस्था असेल -

कोरोनामुळे झालेल्या अचानक लॉकडाऊनमुळे मागच्या वर्षी अनेक लोक अनेक पर्यंटन स्थळांवर अडकून पडले होते. परदेशात अडकलेल्या लोकांना मायदेशी आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले होते. त्यामुळे तुमच्या ट्रॅव्हल कंपनीकडून याबाबत काय व्यवस्था केली जाणार आहे याची आधीच माहिती घ्या. शिवाय जर एखाद्या पर्यंटन स्थळी वातावरणात खराब झाले तर ते तुम्हाला कोणत्या सुविधा देणार याचीही माहीती तु्म्हाला जाणून घ्यावी लागेल.

Shutterstock

जेवणाची व्यवस्था कशी असेल -

भारतातील अनेक ट्रॅव्हल कंपन्या पॅकेजमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि चहा अथवा इतर पेय यांचा समावेश करतात. असे जेवण बऱ्याचदा सर्व समावेशक असते. कारण इतर प्रांतात गेल्यावर तिथली खाद्यसंस्कृतीत आचरणात आणायला थोडा वेळ लागू शकतो. एखादा दिवस असे वेगळे जेवण बरे वाटते पण आठ ते दहा दिवस ते अन्न तुमच्या शरीराला मानवेलच  असे नाही. यासाठीच ट्रॅव्हल कंपनीकडून तुमच्या भोजन व्यवस्थेची योग्य ती माहिती घ्या. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखाचा होईल.

कॅन्सलेशन पॉलिसी काय आहे -

समजा तुम्हाला काही कारणांमुळे पॅकेज रद्द करावं लागलं तर तुम्हाला ट्रॅव्हल कंपनी रिफंड देणार का हे बूकिंग करण्याआधीच विचारून घ्या. जर तुम्ही कंपनीच्या कॅन्सलेशन पॉलिसीशी सहमत असाल तरच तुमचे ट्रॅव्हल पॅकेज बूक करा. नाहीतर तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. 

Shutterstock

ट्रॅव्हल करण्यासाठी कोणते कागदपत्र जवळ बाळगणं गरजेचं आहे -

परदेशात जाताना अथवा काही ठिकाणी जाताना तुम्हाला तुमचं ओळखपत्र, बॅंक स्टेटमेंट, हेल्थ रिपोर्ट गरजेचा असतो. अशा वेळी बूकिंग करण्यापूर्वीच तुम्हाला या गोष्टींची माहिती असायला हवी. जेणेकरून तुम्ही आवश्यक असणारे कागदपत्र जवळ बाळगू  शकता. असे न केल्यास तुम्हाला प्रवासात अनेक अडचणी येऊ शकतात. त्या टाळण्यासाठी आधीच सर्व गोष्टी जाणून घ्या आणि मगच तुमचे ट्रॅव्हल पॅकेज बूक करा. 

Beauty

WIPEOUT SANITIZING SPRAY

INR 199 AT MyGlamm