वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिताय? तर मग वाचाच

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिताय? तर मग वाचाच

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पित असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासोबत ग्रीन टीचे अनेक फायदे आहेत. पण ग्रीन टीचे फायदे मिळवण्यासाठी काही जण ग्रीन टीचे फार चुकीच्या पद्धतीने सेवन करतात. त्यामुळे ग्रीन टीचे फायदे तर सोडाच त्यांना त्याचे तोटे अधिक जाणवू लागतात. तुम्ही ही एक चांगली सवय म्हणून ग्रीन टी प्यायला घेतली आहे. पण त्यामुळे काहीच फायदा होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचे सेवन योग्य पद्धतीने करत नाही. ग्रीन टी पिण्याची एक पद्धत असून ती त्याचवेळी शरीरासाठी काम करते ज्यावेळी ती योग्य अशा पद्धतीत प्यायली जाते. तुम्ही ही हल्लीच ग्रीन टी प्यायला घेतली असेल तर तुम्ही ग्रीन टी पिण्यासंदर्भातील काही मुद्दे लक्षात घ्या.

रिकाम्या पोटी खा कडुलिंबाची पानं, शरीरासाठी होतो अफलातून उपयोग

उपाशी पोटी ग्रीन टी नुकसानकारक

Instagram

हल्ली चहाला सोडचिठ्ठी देत अनेक जण ग्रीन टी पिण्याकडे वळले आहेत. दिवसातून दोन वेळा ग्रीन टी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते असे सांगितले जाते. मग लोक आपल्या हिशोबाने ग्रीन टीचे सेवन करतात. सकाळी उठल्यानंतर झोपेतून जागे होण्यासाठी ग्रीन टी पीत असाल तर ती उपाशी पोटी पिऊ नका. ग्रीन टी उपाशी पोटी प्यायली की, त्यामुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता असते.  काही जणांना ग्री टी कधी पिता हे विचारल्यानंतर त्यांनी जे उत्तर दिले त्यानंतर  ग्रीन टी त्यांच्यावर का परिणाम करत नाही हे लक्षात आले. काही जण ग्रीन टी ही वजन कमी करते म्हणजे त्यावर काहीच खायला नको असे समजतात. ग्रीन टी चे सेवन केल्यानंतर ते दुपारपर्यंत काहीच खात नाही. पण असे करत असाल तर ग्रीन टी फायदा करण्याऐवजी नुकसानच करेल. ग्रीन टी तेव्हाच प्या ज्यावेळी तुम्ही भरपेट नाश्ता किंवा संध्याकाळचा काही खाऊ खात असाल म्हणजे ती तुमची पचनशक्ती वाढवते. अन्न पचवण्यास मदत करते.

 

चुकीचा आहार ठरतो नुकसानकारक

अनेक जणांना असे वाटते की, ग्रीन टी प्यायलामुळे अगदी पहिल्या घोटापासून वजन कमी होण्यास मदत मिळते. असा तुमचा समज असेल तर ते अगदी चुकीचे आहे. तुम्ही सतत बाहेरचा आहार घेत असाल आणि त्यावर ग्रीन टी पिऊन जर उतारा घेत असाल तर त्यामुळे तुमचे वजन अजिबात कमी होत नाही. ग्रीन टी पिताना तुम्हाला त्याचा उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी उत्तम आहार घेणेही गरजेचे असते. त्यामुळे आहार चौकस असू द्या. ग्रीन टीमुळे अन्न पचन होऊन भूक वाढते. पण भूक वाढताना उत्तम आहार असेल तर तुमचा बांधा सुडौल होतो. 

नितंब आणि मांड्या सुटतायत? हे पदार्थ टाळलेत तर व्हाल बारीक

ग्रीन टी अति पिणे धोकादायक

Instagram

‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये’ असं म्हणतात ते उगाच नाही. कारण कोणत्याही गोष्टीच्या अति सेवनामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. ग्रीन टीच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. ग्रीन टी च्या अति सेवनामुळे त्याचे फायदे कमी आणि तोटेच जास्त दिसायला सुरुवात होते. दोन कप ग्रीन टी पेक्षा अधिक ग्रीन टीचे सेवन करु नये. ग्रीन टी मध्ये असलेले हर्ब्स शरीरामध्ये अॅसिडीटी वाढवतात. ग्रीन टीमध्ये आलं, लिंबू या घटकांचा समावेश असतो जे पोटाला जड पडू शकते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अल्सर असे काही त्रास होऊ शकतात. खाण्याची इच्छाही त्यामुळे कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रीन टीचे अति सेवन मुळीच करु नका. 


टॅग करा तुमच्या ग्रीन टी पिणाऱ्या मित्रांना कारण ग्रीन टीबद्दल काही गोष्टी जाणून घेणे त्यांच्यासाठी फारच गरजेचे आहे. 

सेक्समुळे पिरेड्सवर खरचं होतो का परिणाम, जाणून घ्या