ADVERTISEMENT
home / Planning
लग्नासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना या गोष्टी ठेवा लक्षात

लग्नासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना या गोष्टी ठेवा लक्षात

 

 

लग्नासाठी अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची शॉपिंग करावी लागते. लग्नघरात यासाठी खास लग्न खरेदी लिस्ट बनवल्या जातात. नववधू आणि वराचे कपडे, फूटवेअर, दागदागिने, आहेराच्या साड्या आणि वस्तू या व्यतिरिक्तही अनेक लहानसहान गोष्टी सतत खरेदी कराव्या लागतात. कोणती गोष्ट कधी केव्हा लागणार याची नोंद आधीच करून ठेवावी लागते. मात्र सध्या कोरोनामुळे मार्केट अथवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊन खरेदी करणं वाटतं तितकं सुरक्षित नाही त्यामुळे अनेकजण लग्नासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडतात. तुम्ही देखील लग्नासाठी अशी ऑनलाईन खरेदी करणार असाल तर या काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.

नियोजन करा –

 

लग्नाची खरेदी ऑनलाईन असो वा दुकानात करून केलेली खरेदी करण्यापूर्वी नीट नियोजन करणं खूप गरजेचं आहे. खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूंची यादी तयार करा. त्या कुठे मिळतात, कुठे तुम्हााला त्यावर डिस्काऊंट मिळू शकतो याबाबत रिसर्च करा. तुमचं बजेट ठरवा आणि मगच खरेदीचा निर्ण घ्या. ज्यामुळे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला चांगल्या वस्तू खरेदी करता येतील.

ADVERTISEMENT

Shutterstock

डिस्क्रिप्शन नीट वाचा –

 

ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही निवडलेल्या वस्तूची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते. ज्यामुळे तुम्हाला वस्तूचे मटेरिअल, किंमत, साईज याची माहिती मिळू शकते. समजा तुम्ही एखादा ड्रेस खरेदी करत असाल तर तो कोणत्या कापडाचा आहे, त्याची साईज काय आहे या सर्व गोष्टी नीट पडताळून घ्या. कारण नाहीतर तुम्हाला ते पुन्हा बदली करून घ्यावे लागतील. आणि लग्नाच्या गडबडीत तुमच्याजवळ इतका वेळ नक्कीच नसेल.

मेकअपचे साहित्यासाठी ट्राय ऑन पर्याय निवडा –

 

लग्नासाठी नववधूला मेकअपचं अनेक साहित्य खरेदी करावं लागतं. कारण साखरपुडा, लग्नाचे विधीला तुम्हाला तुमची मेकअप आर्टिस्ट मदत करते मात्र लग्नाआधी आणि नंतर असे अनेक प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला स्वतःचा मेकअप करावा लागतो. नववधूचं रूप खुलून दिसण्यासाठी तुम्हाला तुमचं मेकअप किट सुसज्ज ठेवावं लागतं. यासाठी ऑनलाईन मेकअप खरेदी करत असाल तर ट्राय ऑन पर्याय वापरा. आजकाल बऱ्याच ब्युटी अॅपमध्ये ही सुविधा दिलेली असते. कारण त्यामुळे तुम्ही निवडत असलेले मेकअप प्रॉडक्ट तुम्हाला सूट होतील का हे पडताळून पाहता येऊ शकतं. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा की बऱ्याचदा स्क्रिनवर दिसणारा रंग आणि खरा रंग यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे तुम्हाला हव्या असणाऱ्या रंगाशी मिळते जुळते प्रॉडक्ट खरेदी करा. 

सेलवर लक्ष ठेवा –

ऑनलाईन खरेदीसाठी वस्तू विकणाऱ्या वेबसाईटवर बऱ्याचदा मेगा सेल असतात. त्यांच्या तारखा वेबसाईटवर सतत जाहीर केल्या  जातात. म्हणूनच ऑनलाईन खरेदी करताना घाई करू नका. वेळ राखून या सेलमध्ये  खरेदी करा. ज्यामुळे तुमचा शॉपिंगवरचा पैसा वाचेल. जर असे पैसे वाचले तर तु्म्हाला लग्नासाठी भरपूर शॉपिंग करता येईल. 

ADVERTISEMENT

रिसर्च , रिसर्च आणि रिसर्च –

लग्नासाठी तुम्हाला खूप साड्या खरेदी कराव्या लागतात. मात्र ऑनलाईन शॉपिंग करताना तुम्हाला थोडं  सावध राहावं लागेल. फक्त सेल सुरू आहे अथवा डिस्काऊंट आहे म्हणून कोणत्याही अॅपवरून साडी खरेदी करू नका. त्याआधी साड्यांचे प्रकार, त्यांची किंमत, कापड याबाबत थोडा रिसर्च करा. कारण ऑनलाईन खरेदी मध्ये फसवलं जाण्याची जास्त शक्यता असते. मात्र नीट रिसर्च करून खरेदी केली तर ऑईलाईन खरेदीमध्ये तुमचा चांगला फायदा होण्याची  शक्यता आहे. 

Instagram

फोटोसौजन्य – शटरस्टॉक आणि इन्स्टाग्राम 

ADVERTISEMENT

अधिक वाचा  –

नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या

ऑनलाईन शॉपिंग करताना साईज नेहमी चुकते, मग वाचाच

ऑनलाईन फाऊंडेशन आणि कन्सीलर खरेदी करताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी

ADVERTISEMENT

 

31 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT