ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
डार्क सर्कल्स नको असतील तर आय मेकअप करताना घ्या ही काळजी

डार्क सर्कल्स नको असतील तर आय मेकअप करताना घ्या ही काळजी

डोळे हा एक अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे. मात्र एवढंच नाही डोळ्यांमुळे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य अधिक वाढतं. डोळ्यांमधून तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व झळकत असतं. मात्र जस जसं तुमचं वय वाढू लागतं तस तसं तुमच्या डोळ्याजवळ डार्क सर्कल्स, फाईन लाईन्स दिसू लागतात. डोळ्यांजवळील त्वचा नाजूक असल्यामुळे एजिंगच्या खुणा सर्वात लवकर डोळ्यांजवळ दिसू लागतात. यासाठी दैनंदिन जीवनशैलीमध्ये आणि विशेषतः आयमेकअप करताना तुम्ही डोळ्यांची काळजी  घ्यायला हवी. यासाठीच डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या टिप्स जरूर फॉलो करा.

आय मेकअप करताना ही काळजी घ्या –

डोळ्यांखाली फाईन लाईन्स आणि डार्क सर्कल्स येत असतील आय मेकअप करताना विशेष काळजी घ्यायला हवी. कारण मेकअप लावताना अथवा मेकअप काढताना केलेल्या काही चुकांमुळे तुमच्या त्वचेचं अधिक नुकसान होऊ शकतं. डोळ्यांच्या जवळील त्वचा अधिक संवेदनशील असते. जर ती मेकअप करताना अथवा काढताना घासली गेली तर तुमची त्वचा खराब होण्याची अधिक शक्यता असते. यासाठी मेकअप लावण्यासाठी चांगले ब्रश, ब्युटी ब्लेंडर, पफ यांचा वापर करा आणि मेकअप काढतानाही तो कॉटन पॅड आणि रिमूव्हरनेच काढा. 

Shutterstock

ADVERTISEMENT

डोळ्यांजवळील त्वचा मॉईस्चराईझर करा –

डोळ्यांखाली डार्क सर्कल्स, सुरकुत्या दिसण्यामागे एक महत्त्वाचं कारण कारणीभूत असतं ते म्हणजे कोरडी त्वचा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तिच्यावर लवकर फाईन लाईन्स दिसू लागतात. यासाठीच नियमित त्वचा मॉईस्चराईझ करणं खूप आवश्यक आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर एखाद्या चांगल्या क्रिमने त्वचा मॉईस्चराईझ करा. त्यासोबतच त्वचा जास्त कोरडी होऊ नये यासाठी चेहरा साबणाने न धुता तो फेसवॉशने धुवा. त्वचेसाठी चांगल्या दर्जाचं फेस सीरम वापरा. रात्री झोपताना स्लीप मास्क लावल्यासही चांगला फायदा होऊ शकतो. 

Shutterstock

उन्हात फिरताना त्वचेची काळजी घ्या –

उन्हाळा असो वा हिवाळा सुर्यप्रकाशात जाण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. कारण सुर्यप्रकाशातील हानिकारक किरणांमुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. जेव्हा सुर्यप्रकाश तुमच्या चेहऱ्यावर पडतो तेव्हा त्याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या डोळ्यांखालील त्वचेवर दिसून येतो. कारण ही त्वचा इतर त्वचेच्या मानाने खूपच नाजूक असते.

ADVERTISEMENT

Shutterstock

पुरेशी झोप घ्या –

डार्क सर्कल्स दिसण्यामागचं महत्त्वाचं कारण असतं झोप पूर्ण न होणं. जर तुम्ही रात्री उशीरा झोपत असाल तर तुमची झोप पूर्ण होत नाही. माणसाला निरोगी राहण्यासाठी आठ तास शांत आणि सलग झोपेची गरज असते. असं  न झाल्यास तुमच्या डोळ्यांखालील काळसरपणा वाढू लागतो. पफी आणि सूजलेले डोळे मुळीच चांगले दिसत नाहीत. यासाठी शक्य असल्यास पूर्ण झोप घ्या ज्यामुळे तुम्ही सकाळी फ्रेश आणि सुंदर दिसाल. 

ADVERTISEMENT

Shutterstock

व्यसनांपासून दूर राहा –

सुंदर दिसण्यासाठी काही गोष्टी सक्त ताकदीने फॉलो करायला हव्यात. यापैकीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनांच्या आहारी न जाणं. धु्म्रपान, मद्यपानामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. अती व्यसन केल्यामुळे डार्क सर्कल्स, फाईन लाईन्स, सुरकुत्या दिसू लागतात. शिवाय व्यसन करणं तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये नेमका काय असतो फरक

नाक आणि कपाळ होते तेलकट, करा हे सोपे उपाय

कोरड्या त्वचेसाठी बेस्ट फेशिअल किट (Best Facial Kits For Dry Skin In Marathi)

19 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT