ADVERTISEMENT
home / Periods
मासिक पाळीमुळे वजनात वाढ होते का, काय आहे सत्य

मासिक पाळीमुळे वजनात वाढ होते का, काय आहे सत्य

तुम्ही स्वतःला कितीही निरोगी राखण्यासाठी डाएट करत असाल अथवा व्यायाम करत असाल पण कधी कधी तुम्ही महिन्याच्या शेवटी अथवा मासिक पाळी दरम्यान आपलं वजन वाढल्यासारखं वाटतं का? तुमचे कपडे मासिक पाळीच्या वेळेला घट्ट होतात का? असा काहीसा तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला घाबरण्याची नक्कीच गरज नाही. कारण हे केवळ तुमच्यासह घडत नाही. मासिक पाळीदरम्यान वजनात वाढ होणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. तर काही महिलांचे वजन मासिक पाळीच्या कारणामुळे वाढल्याचेही ऐकिवात येते. पण असं काही काळापुरतं होतं. काही जणांना अगदीच त्रास असेल तर वजनामध्ये खूप वाढ होते. पण याची नक्की कारणं काय आहेत आणि यासंदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी, ते आपण या लेखातून पाहणार आहोत.

वजन वाढण्याचे खरे कारण

वजन वाढण्याचे खरे कारण

Shutturstock

मासिक पाळीदरम्यान वजन वाढणे आणि वजन घटणे या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. याचे खरे कारण रिटेंशन आहे. हे अॅस्ट्रॉजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोन्समुळे हे घडतं, जे मासिक पाळीच्या दिवसात त्वरीत घटते. या हार्मोन्सच्या लेव्हलमध्ये होणारी घट तुमच्या शरीरामध्ये मासिक पाळी सुरू होण्याची वेळ असते. वॉटर रिटेंशन्या प्रक्रियेमुळे बरेचदा तुमचे स्तन आणि पोटात सूज निर्माण होते. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान वजन वाढते. मात्र वजन वाढण्यामागे चरबी हे कारण नसून वास्तविक कारण पाणी हे असते. तुमचे मासिक पाळीचे पाच दिवस संपले की हार्मोन आपल्या सामान्य पातळीवर येतात आणि तुमचं वजन आपोआप कमी होते.

ADVERTISEMENT

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय

वजन वाढण्याचे अन्य कारण

शरीरातील हार्मोन्स हे तुम्हाला फुलल्यासारखे जाणवून देते आणि तुम्हाला तुमचे कपडे त्यावेळी अधिक घट्ट वाटू लागतात. मासिक पाळी दरम्यान पोट फुगणे हे अत्यंत सामान्य आहे आणि त्यामुळेच तुम्हाला तुमचं वजन वाढलं आहे अथवा तुम्ही जाड झाले आहात असं जाणवतं. मासिका पाळीदरम्यान अनहेल्दी आणि बरंच काही खाण्याची इच्छा वाढते. यावेळी आपली भूक मिटविण्यासाठी बऱ्याच महिला दिवसभर खात राहतात. यावेळी प्रोजस्ट्रॉनची पातळी खाली जाते आणि भूक अधिक वाढते.  हाय शुगर अथवा अधिक चरबीयुक्त खाण्याने कॅलरीचे प्रमाण वाढते आणि यावेळी व्यायाम करण्याइतकी शक्ती नसल्याने वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. 

मासिक पाळीच्या स्वच्छतेचे महत्त्व माहीत आहे का तुम्हाला

मासिक पाळीदरम्यान साधारण किती वजन वाढते

ADVERTISEMENT

Shutterstock

अधिकांश महिलांचे मासिक पाळीदरम्यान दोन  ते तीन किलो वजन वाढते. पण हे वजन पाण्याचे असते. मासिक पाळी संपल्यानंतर हे वजन आपोआप कमी होते. हा बदल साधारण मासिक पाळीच्या तीन ते चार दिवस आधी दिसून येतो आणि मासिक पाळी संपल्यानंतर साधारण दोन ते  तीन दिवसात हा परिणाम निघून जातो. त्यामुळे या गोष्टीची अधिक काळजी करायची अजिबातच गरज नाही. यावेळी घाबरणे, चिडचिड होणे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना चावण्यासारखे वाटणे,  झोप न येणे, थकवा, त्वचेची समस्या, पोटात दुखणे, तहान आणि भूकेमध्ये बदल, स्न सुजणे अशी अनेक लक्षणे दिसून येतात. 

कसे कमी करावे वजन

मासिक पाळीच्या दरम्यान वाढलेले वजन कमी करण्याची चिंता करण्याची गरज नाही. हे अतिशय सामान्य  आहे. तुम्हाला अनहेल्दी, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांपासून यावेळी दूर राहण्याची गरज आहे. वजन वाढणाऱ्या पदार्थांपासून तुम्हाला दूर राहायचे आहे. तसंच यावेळी अधिकाधिक पाणी प्या आणि शरीरामध्ये इलेक्ट्रोलाईट लेव्हल राखण्यासाठी अधिक लिक्विड जमविण्याची गरज आहे. 

फायबरयुक्त पदार्थ खा – फायबरयुक्त पदार्थ खाऊन यावेळी होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्ही थांबवू शकता.  फायबरयुक्त पदार्थ अशावेळी तुमचं वजन नियंंत्रणात राखण्यासाठी मदत करतात. तसंच यामुळे तुमचा ओव्हरइंटिंगचा त्रासही कमी होतो. 

ADVERTISEMENT

मिठाचे सेवन कमी करा – यादरम्यान अधिक मीठ खाल्ल्याने वॉटर रिटेंशन वाढते.  त्यामुळे तुम्हाला पोट अधिक फुगल्यासारखे वाटते. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान जितके कमी मीठ खाता येईल तितके कमी मीठ खा 

व्यायाम – मासिक पाळी दरम्यान तुम्ही तुमचा नियमित व्यायाम करू शकता.  तुम्ही हेव्ही व्यायाम न करता तुमचा नियमित आणि योग्य व्यायाम करत राहा. तो थांबवू नका. 

मासिक पाळी लवकर येण्यासाठी सोपे उपाय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT