ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
जाणून घ्या मीठाचे निरनिराळे प्रकार आणि कसा करावा वापर

जाणून घ्या मीठाचे निरनिराळे प्रकार आणि कसा करावा वापर

मीठ हे जीवनाचे सार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण मीठामुळे स्वयंपाकाला चव येते. बिन मीठाचं अळणी जेवण कोणालाही खावसं वाटणार नाही. मीठाचा वापर स्वयंपाक चविष्ट करण्यासोबतच अन्नपदार्थांचा कडवटपणा कमी करण्यासाठी, पदार्थांचा आबंटपणा कमी करण्यासाठी आणि पदार्थ टिकवण्यासाठीही केला जातो. मीठ हे अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. मीठाच्या पाण्यात धुतल्यामुळे फळं आणि भआज्या निर्जंतूक होतात. अशा या मीठाचे अनेक प्रकार आहेत शिवाय त्याचा वापर निरनिराळ्या प्रकारे केला जातो. 

साधे मीठ ( Table Salt)

स्वयंपाकासाठी साधारणपणे आयोडीनयुक्त पांढऱ्या  रंगाचे साधं मीठ वापरण्याची पद्धत आहे. हे मीठ बारीक पूड केलेलं आणि चमकदार असतं. यात अॅंटि कॅकिंग घटक असल्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय ते आयोडीनयुक्त असल्यामुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत होतं. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूचे कार्य उत्तमरित्या होण्यासाठी मीठाचा वापर आहारात असणं गरजेचं आहे. हे मीठ जमिनीतून मिळतं आणि ते शुद्ध करून स्वयंपाकासाठी वापरलं जातं.

काळे मीठ ( Black Salt)

काळं मीठ हे आयुर्वेदिक असल्यामुळे ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीरअसतं. कारण पांढऱ्या मीठाच्या मानाने यात सोडिअमचे प्रमाण कमी असते.  या मीठाचा रंग काळसर असतो. काळं मीठ हिमायलात आढळतं. ते एका बरणीत कोळसा, आयुर्वेदिक वनस्पती आणि बिया तसंच झाडांच्या सालीसोबत पॅक केलं जातं. चार तास भट्टीत ठेवलं जातं. ज्यामुळे ते आरोग्यासाठी लाभदाक ठरतं. पचनाच्या समस्या, पोटदुखी अशा अनेक आरोग्य समस्या यामुळे कमी होतात.

सैंधव ( Himalayan Pink Salt)

सैंधव पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचं असतं. हे मीठ सर्वात जास्त शुद्ध समजलं जातं. हिमालयात ते जमीन खोदून काढलं जातं. बऱ्याचदा भारतीय संस्कृतीत उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी सैंधव वापरण्यात येतं. या मीठात अनेक नैसर्गिक घटक असल्यामुळे ते आरोग्यासाठी फारच उत्तम असतं. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे. खाण्यासोबतच बॉडी स्पासाठीही या मीठाचा वापर केला जातो. 

ADVERTISEMENT

समुद्री मीठ ( Sea Salt)

जे मीठ समुद्रातील खारट पाणी सुकवून केलं जातं त्या मीठाला समुद्री मीठ असं म्हणतात. या मीठाला जाडं मीठ अथवा खडे मीठ असंही म्हणतात. हे मीठ टेबल सॉल्टपेक्षा अशुद्ध स्वरूपात आणि जाड असतं. मात्र असं असलं तरी या मीठात झिंक, पोटॅशिअम अशी पोषक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. या मीठाची चव टेबल सॉल्टपेक्षा जास्त खारट असते. सांधेदुखीवर शेक घेण्यासाठी, सर्दी- खोकल्यावर शेक घेण्यासाठी हे मीठ फार उपयोगी ठरतं. शिवाय भाज्या अथवा फळं निर्जंतूक करण्यासाठी पाण्यातून हे मीठ वापरलं जातं. 

लो सोडिअम सॉल्ट (Low Sodium Salt)

हे मीठ बाजारात पोटॅशिअम या नावाने मिळतं. यामध्ये सोडिअम आणि पोटॅशिअम क्लोराइड कमी प्रमाणात असतं. मीठातील सोडिअम ह्रदयासाठी हानिकारक असतं. यासाठीच बाजारात हे नवं मीठ दाखल झालं आहे. रक्तदाब आणि ह्रदयाच्या समस्या असलेल्या लोकांना लो सोडिअम मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. 

हे झाले मीठाचे आहारात वापरले जाणारे मुख्य पाच प्रकार. मात्र या व्यतिरिक्तही मीठाचे अनेक प्रकार देशभरात आहेत. ज्यामध्ये कोशेर सॉल्ट, सेल्टिक सी सॉल्ट, प्लेक सॉल्ट, ब्लॅक हवाईयन सॉल्ट, रेड हवाईयन सॉल्ट, स्मोक्ड सॉल्ट, पिकलिंग सॉल्ट असे आणखी अनेक प्रकार आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

तुम्हालाही सवय आहे का जेवताना कच्चं मीठ खाण्याची

आहारात मीठाचा वापर कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

जेवणात मीठ जास्त झाले तर या सोप्या ट्रिक्स येतील कामी

21 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT