जाणून घ्या 1 मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो तरी कसा

जाणून घ्या 1 मुलांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव असतो तरी कसा

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो हे आपण सगळेच जाणतो. राशीप्रमाणे व्यक्तींचे स्वभाव वेगळे असतात हे आपल्याला माहीतच आहे. उदा. मेष राशीच्या व्यक्ती या आली अंगावर घेतली शिंगावर स्वभावाच्या असतात. कर्क राशीच्या व्यक्ती या थोड्या रडक्या आणि चिंताग्रस्त स्वभावाच्या असतात. मीन राशीच्या व्यक्ती शांत असतात. असा साधारणपणे प्रत्येकाचा स्वभाव हा थोडा का असेना वेगळा असतो. मुलांक हा देखील तुमचा स्वभाव सांगत असतो. ज्यांचा मुलांक 1 आहे त्यांचा स्वभावही थोडा वेगळा असतो. ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज ही 1 येते त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो ते जाणून घेऊया.

2021 मध्ये व्यवसाय करायचा विचार करत असाल तर असं असेल तुमच्यासाठी हे वर्ष

freepik

 • 1,10,19,28 ही जन्म तारीख असलेल्यांचा मुलांक हा 1 असतो. एक हा अतिशय चांगला असा मुलांक असतो. कारण कोणत्याही क्रमांकाची सुरुवात ही या अंकापासून होत असते. त्यामुळे साहजिकच या क्रमांकाशी निगडीत अनेक गोष्टींची सुरुवात अवलंबून आहे.
 •  मुलांक  1 असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण अधिक असते. अशा व्यक्ती राजकारणात अधिक दिसून येतात. एखाद्या गटात जर ही व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींच्या विचाराशी अनेक जण प्रभावित होतात. त्यामुळे नेतृत्व गुण हा सगळ्यात महत्वाचा गुण त्यांच्याकडे असतो. 
 • मुलांक असलेल्या व्यक्ती या फार महत्वाकांक्षी असतात. त्यांची स्वप्न, ध्येय ही फार मोठी असतात. पण ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्नही तेवढाच असतो. त्यांना इच्छित असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये ते हमखास यश मिळवतात.
  दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणे या लोकांना मुळीच आवडत नाही. त्यांना आपल्यावर सत्ता गाजवलेली अजिबात आवडत नाही. त्यामुळे ते कुठेही गेले तरी बॉसी स्वभावाचे असतात. 
 • खिशात पैसा नसला तरी चालेल पण अशा लोकांचे राहणीमान  फार उच्च असते. त्यांच्यातील टापटीपपणा हा इतका चांगला असतो की अशा व्यक्तींना पाहिल्यानंतर आपोआपच त्याची स्तुती करावीशी वाटते. 
 • मुलांक 1 असलेल्या व्यक्ती या फार समजूतदार असतात. कोणालाही कोणत्याही परिस्थिती समजून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये जास्त असते. त्यांचा शत्रू जरी असला तरी देखील त्यांना ते समजून घेतात.

जाणून घ्या जानेवारीमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती कशा असतात

 

 

freepik

 • या व्यक्तींना कोणावरही झालेला अन्याय अजिबात चालत नाही. अगदी शत्रू जरी असला तरी त्यांच्यावरही झालेला अन्याय त्यांना चालत नाही. त्यामुळे ते न्याय मिळवण्यासाठी झटतात. 
 • परफेक्ट हिरो आणि परफेक्ट व्हिलन अशा दोन्ही क्वालिटी यांच्यामध्ये असतात. जर त्यांनी हिरो बनवायचे ठरवले असेल तर ते तसे वागतात आणि जर व्हिलन व्हायचे ठरवले तर अगदी तसेच वागतात. 
 • दगाफटका केलेला या लोकांना मुळीच चालत नाही. जो दगाफटका करेल त्याला ते चांगलाच धडा देतात.
  अति महत्वाकांक्षी असल्यामुळे यांच्या आयुष्यात अनेक शत्रू निर्माण होतात. त्यामुळे महत्काकांक्षी असताना तुम्ही त्यांना प्रयत्नांची जोड देणेर फारच गरजेचे असते. 
 • शत्रूने कितीही हरवले तरी ते खचून जात नाही. उलट शत्रूची प्रशंसा करुन आयुष्य पुढे घेऊन जाण्यास या व्यक्ती फारच हुशार असतात. 

बड्या असामी: शिवाजी महाराज,अॅनी बेझंट, मार्टिन ल्युथर किंग इंदिरा गांधी,प्रिन्सेस डाएना


असा असतो  1 मुलांक असलेल्या व्यक्तीचा स्वभाव. टॅग करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांचा मुलांक असतो 1

डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव