कसे जाईल 2021 हे वर्ष, कोणत्या राशींसाठी आहे लाभदायक घ्या जाणून (Rashi Bhavishya 2021)

rashi bhavishya 2021 in marathi

मागचे वर्ष अर्थात 2020 अत्यंत वाईट आणि निराशाजनक होते यात कोणतेही दुमत असणार नही. पण जे गेलं त्याचा विचार करत बसण्यात अर्थ नाही. येणारे नवे वर्ष कसे जाईल याचा विचार करायची आणि त्याप्रमाणे पाऊल उचलायची गरज आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना रोज सकाळी (today rashi bhavishya in marathi) भविष्य वाचायची सवय असते. बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये अथवा अनेक संकेतस्थळांवरही रोजचे भविष्य आपण वाचतो. वार्षिक राशीभविष्यदेखील आपल्याला जाणून घ्यायचं असतं. वार्षिक भविष्य (rashi bhavishya in marathi) नक्की काय आहे हे मराठीत वाचलं की मनालाही समाधान मिळतं. सकाळ उजाडली की पेपरचं पहिलं पान उघडलं जातं ते राशीभविष्याचं (sakal rashi bhavishya). अनेक जणांना हा छंद नक्कीच असतो. बरेचदा मागचं वर्ष खराब गेलं असेल तर किमान यावर्षी तरी नक्की काय काय घडणार ते जाणून घेऊया असाही विचार असतो. राशीफळ जाणून घेण्यात आपला इतकाच विचार असतो की,  बघूया तरी काय आहे नशिबात. त्यामुळे वार्षिक भविष्य नक्की काय आहे हे आम्ही तुम्हाला लेखातून सांगणार आहोत. आरोग्य, नातेसंबंध आणि पैसा या तिन्ही गोष्टी तुमच्या राशींसाठी कशा असतील ते वार्षिक भविष्यफळ घ्या जाणून. 

Table of Contents

  2021 चे वार्षिक राशिफळ (Yearly Rashi Bhavishya In Marathi)

  2021 या वर्षाची सुरूवात कन्या लग्न, कर्क राशी आणि पुष्य नक्षत्राने झाली आहे आणि हे वर्ष संपताना कर्क लग्न असेल. वर्षाच्या सुरूवातीलाच मंगळ असणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य चांगली घडतील. तसंच यासह करिअर, वित्त आणि शिक्षणाच्या कार्यातही हळूहळू प्रगती घडेल आणि व्यक्तींना त्यामध्ये जास्त बाधा येताना दिसणार नाही. पण मार्चमध्ये मंगळ ग्रहासह राहू सातव्या घरामध्ये प्रवेश करत असल्याने कौटुंबिक जीवन आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी जास्त लाभदायी नसेल. एप्रिलपासून जुलै महिन्यापर्यंत अनेकांच्या आयुष्यात चढउतार होताना दिसतील आणि ऑगस्टपासून व्यापार आणि वित्त स्थिरावतील. तसंच वर्षाच्या शेवटी सुख आलेले दिसेल. मात्र यावर्षातही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  मेष राशीचे वार्षिक भविष्य 2021

  मेष राशीच्या (21 मार्च - 19 एप्रिल) व्यक्तींसाठी नवे वर्ष हे संतुलित असेल. वर्षाच्या सुरूवातीला कदाचित तुम्हाला समाधान मिळणार नाही. पण मार्चनंतर तुमचा चांगला कालावधी चालू होईल. यावर्षी वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला पैसे येत राहतील आणि कुटुंबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या बौद्धिक शक्तीचाही विकास होईल आणि तुम्हाला करत असलेल्या कामामध्ये यश मिळेल. प्रेमाच्या आणि नातेसंबंधाच्या बाबत हे वर्ष अत्यंत लाभदायक आहे. लग्न ठरणाऱ्या व्यक्तींची लग्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्न झाले नाही तरी ठरण्याची शक्यता नक्कीच आहे. मात्र आपल्या तब्बेतीची काळजी नक्कीच करायला हवी. त्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. बाकी सर्व कुशलमंगल राहील. 

  वृषभ राशीचे वार्षिक भविष्य 2021

  वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी (20 एप्रिल - 20 मे) हे वर्ष अत्यंत उत्साहवर्धक ठरेल. यावर्षी तुमची आर्थिक स्थिती मागच्यावर्षीच्या तुलनेत अधिक चांगली होईल. तसंच यावर्षी वेगवेगळ्या ठिकाणी काम करून बुद्धी वापरून कसा पैसा अधिक कमावायचा याची योजना तुम्ही करू शकाल. बिझनेस असो अथवा नोकरी असो तुम्हाला यातून पैसा नक्की मिळेल. नातेसंबंधाच्या बाबतीत मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण यावर्षी तुमचे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. पण तुम्ही योग्यरित्या समतोल साधलात तर नात्यामध्ये जोडीदारबरोबर तुमचे संबंध चांगले टिकून राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही अगदी फिट राहाल पण यावर्षी आपल्या खाण्याची सवयी बदला आणि निरोगी राहण्यासाठी योग्य आणि उत्तम खा. 

  मिथुन राशीचे वार्षिक भविष्य 2021

  मिथुन राशीच्या (21 मे - 21 जून) व्यक्ती या खरं तर हरफनमौला असतात. यांना स्वच्छंदी आयुष्य जास्त आवडते. या राशीच्या व्यक्तींसाठी नवे वर्ष दोन्ही स्वरूपाचे असेल. शुभ आणि अशुभ असे दोन्ही परिणाम या वर्षी या व्यक्तींना जाणवतील. मोठे निर्णय घेण्यासाठी हे वर्ष नक्की योग्य नाही. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. गुरू आणि शनि दोन्हीचा प्रभाव असल्याने आर्थिक हानी पोहचू शकते. तसंच आरोग्याच्या दृष्टीनेही या व्यक्तींना थोडं लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात योग आणि चालणे या दोन्हीचा समावेश करून घ्या. पैशांच्या बाबतीत नातेवाईकांसह खटके उडण्याची शक्यता आहे. पण नातेसंबंधात कडवटपणा येणार नाही याची खात्री नक्की करून घ्या. बाकी या राशीच्या व्यक्ती मनमौजी असल्याने कितीही संकट आले तरीही त्यावर मात करून बाहेर येतातच. 

  कर्क राशीचे वार्षिक भविष्य 2021

  कर्क राशीच्या (22 जून - 22 जुलै) व्यक्तींसाठी नव्या वर्षाची सुरूवात अप्रतिम होणार आहे. ज्या ज्या गोष्टींची अपेक्षा केली होती त्या अपेक्षा यावर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या सुरूवातीला मंगळ ग्रह हा कर्क राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये चांगली साथ देणार आहे. त्यामुळे नोकरीमध्ये बढती होण्याची शक्यता आहे. तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत एखादी चिंता मागच्या वर्षभर ज्या कर्क राशीच्या व्यक्तींना त्रासदायक ठरत होती त्यांना यावर्षी नक्कीच दिलासा मिळेल. हे वर्ष तुमच्यासाठी भरपूर सरप्राईजसह भरलेले असेल. तसंच संपूर्ण वर्षभर तुम्हाला मान सन्मान, यश, धन आणि पराक्रम या सर्वामध्ये वृद्धीच मिळणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. 

  सिंह राशीचे वार्षिक भविष्य 2021

  वर्ष 2021 हे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी (23 जुलै - 22 ऑगस्ट) आर्थिकदृष्ट्या अप्रतिम ठरणार आहे. मात्र कौटुंबिक कलह विशेषतः जोडीदाराशी रुसवे फुगवे होण्याची शक्यता अधिक आहे. हे संपूर्ण वर्ष तुम्ही घरातील गोष्टींमध्येच अडकून पडणार आहात. घराचे नियोजन करण्यातच संपूर्ण वर्ष संपेल. करिअरच्या दृष्टीने यावर्षी तुम्हाला चढउतार बघायला मिळेल. सतत चिंताग्रस्त राहू नका. तसंच आरोग्याच्या बाबतीत लक्ष द्या. सतत चालढकलपणा करणं तुम्हाला महागात पडू शकेल. त्यामुळे यावर्षी आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. मात्र तुमच्या कामात अडथळा येईल असं हे वर्ष नाही. चढउतार सतत येत राहिले तरीही त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही तुम्हाला मिळतील हे नक्की. पण हार मानू नका आणि विचारपूर्वक पाऊल उचला. 

  कन्या राशीचे वार्षिक भविष्य 2021

  हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर) सामान्य असेल. तुमच्यासाठी वर्षाची सुरूवात आणि वर्षाचा शेवट दोन्ही अप्रतिम ठरतील. यावर्षी नव्या योजना बनविण्यात तुम्हाला यश मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला कधी, कुठे आणि कशा प्रकारे तडजोड करावी लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की काय हवंय आणि कशाप्रकारे परिस्थिती हाताळायची आहे ते पाहून मगच पाऊल उचला. तुम्ही यावर्षी नव्या नात्याची सुरूवात करू शकता. तसंच लग्न योग्य वय असेल तर तुमचे यावर्षी लग्न होण्याचीही शक्यता आहे. त्यादृष्टीने तुम्ही पावलं उचलण्याची गरज आहे. करिअरदेखील सामान्य राहील. यावर्षी जास्त अपेक्षा करू नका. जे आहे त्यातच समाधान मानण्याचे हे वर्ष आहे.

  तूळ राशीचे वार्षिक भविष्य 2021

  तूळ राशीच्या व्यक्ती या समतोल असतात असे म्हटले जाते. पण या व्यक्तींसाठी (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर) हे वर्ष एकदमच नवीन असणार आहे. कारण यावर्षात या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल घडणार आहेत. जून - जुलैच्या मध्यात तुमच्या राशीमध्ये मंगळाचा प्रभाव असून कुंडलीप्रमाणे तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. यावर्षी एखादी मोठी समस्या सोडविण्यात तुम्हाला यश मिळेल. तसंच ज्या व्यक्तींचे लग्न  झालेले नाही त्यांच्या लग्नाचा योग यावर्षी आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुम्हाला अत्यंत चांगले असून यावर्षी तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत. तसंच तुम्ही अनेक नव्या गोष्टींनाही सुरूवात करणार असल्याचे योग आहेत. त्यामुळे यादृष्टीने तुम्ही पावलं  उचला. 

  वृश्चिक राशीचे वार्षिक भविष्य 2021

  गेले कितीतरी वर्ष काहीतरी चांगलं होण्याची वाट वृश्चिक राशीच्या व्यक्ती पाहात आहेत. 2011 पासून मागे लागलेली साडेसाती संपली तरीही काही ना काही विचित्र चालूच आहे. पण हे वर्ष वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर) बऱ्याच बाबतीत लाभदायक ठरू शकते. घर, पैसे आणि वाहन या तिन्ही बाबतीत तुम्हाला काहीतरी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. घराच्या बाबतीत तुम्ही विचार करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम आहे.  तसंच या व्यक्ती स्वतःमध्येच मशगुल राहतील. मागच्या वर्षी थांबलेली सर्व कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे वर्ष उत्तम आहे. सर्व कामं मार्गी लाऊ शकतात.  आरोग्याच्या बाबतीतही हे वर्ष चांगले राहील. यावर्षाच्या शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या तक्रारीतून सुटका मिळू शकते. तसंच तरूणांनाही हे वर्ष लाभदायी आहे. प्रेमात तुम्हाला नवा मार्ग सापडू शकतो. 

  धनु राशीचे वार्षिक भविष्य 2021

  धनु राशीच्या व्यक्तींसाठी (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर) हे वर्ष चढउताराचा ठरणार आहे. यावर्षी तुमच्या राशीवर शनिचा जास्त प्रभाव राहील. यामुळे तुम्हाला अनेक त्रास होण्याची  शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या मात्र तुमची बाजू स्थिर राहील. पण नातेसंबंधाच्या बाबतीत अनेक अप्रिय घटना घडण्याची शक्यता  आहे. आरोग्याच्या  बाबतीतही तुम्हाला अनेक त्रास सहन करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आधी विचार करा आणि मगच पाऊल उचला. हे वर्ष त्रासदायक जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

  मकर राशीचे वार्षिक भविष्य 2021

  वर्ष 2021 हे मकर रास असणाऱ्या (22 डिसेंबर- 19 जानेवारी) व्यक्तींसाठी ना जास्त चांगले आहे ना जास्त वाईट.  अगदी मध्यम स्वरूपाचे हे वर्ष असेल. दोन्ही स्वरूपातील परिणाम तुम्हाला यावर्षी बघायला मिळतील. शनि आणि गुरूच्या युतीमुळे तुम्हाला करिअरमध्ये  चांगला ब्रेक मिळेल. अर्थात तुम्हाला हवी ती पोस्ट तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. पण तुम्ही यामध्ये स्वतः विघ्न उत्पन्नही करू शकता. त्यामुळे योग्य माहिती घेतल्याशिवाय काहीही पाऊल उचलू नका. सुरूवातीच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात. पण जून नंतर तुमची स्थिती पूर्ववत होईल.  विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका. 

  कुंभ राशीचे वार्षिक भविष्य 2021

  कुंभ राशीच्या व्यक्तींनाही (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी) 2021 या वर्षामध्ये मिश्र परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.  यामध्ये तुम्हाला काही आव्हानांनाही सामोरं जावं लागेल. पण तुम्ही हार न मानता या आव्हांनाचा सामना करत नक्कीच त्यातून  बाहेर याल. कोणत्याही गोष्टीत विजय मिळवूनच तुम्ही पुढे जाल हे निश्चित. प्रेमासाठी ज्या व्यक्ती आतुर आहेत त्यांना यावर्षी प्रेम मिळण्याची आणि नातेसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. विवाहयोग आणि संतानयोगही आहे. आरोग्याच्या दृष्टीने मात्र तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा एखाद्या रोगाच्या आहारी तुम्ही जाऊ शकता हे लक्षात घ्या. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.  

  मीन राशीचे वार्षिक भविष्य 2021

  मीन राशीच्या व्यक्तींसाठी (19 फेब्रुवारी - 20 मार्च) हे वर्ष अनुकूल आहे. लहान मोठे त्रास येतील पण त्याने आयुष्यावर काही जास्त परिणाम होणार नाही. एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी चांगले आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही प्रयत्न करत राहायला हवा. प्रयत्न  सोडू नका.  ज्या व्यक्ती अनेक वर्षांपासून प्रेमाच्या शोधात आहेत त्यांना यावर्षी हा आनंद उपभोगायला मिळणार आहे. नवा जोडीदार मिळेल. तुम्हाला सुखसमाधान मिळेल पण त्यासह पैसेही भरपूर खर्च होतीलल. पण तुम्हाला हवं तर तुम्ही पैशावर नियंत्रणही ठेऊ शकता. 

  प्रश्नोत्तरे (FAQs)

  1. भविष्याच्या दृष्टीने 2021 हे चांगलं वर्ष आहे का?

  वर्षाच्या सुरूवातीला शनि आणि गुरू हे सहाव्या घरात असतील. यावर्षी यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी चांगले वर्ष आहे. बऱ्याच राशींसाठी हे वर्ष लाभदायी ठरेल.

  2. 2021 हे वर्ष कोणत्या राशीसाठी उत्तम ठरेल?

  ग्रह आणि ताऱ्यांच्या दृष्टीने हे वर्ष मागच्या वर्षीचे सर्व घाव भरणारे ठरेल. सर्वच राशींना काही ना काही लाभ होणार असून यावर्षी वृषभ, तूळ आणि वृश्चिक या राशींना याचा अधिक फायदा मिळणार आहे. या राशीच्या व्यक्ती अधिक नशिबवान ठरतील.

  3. 2021 मध्ये कोणत्या राशींच्या व्यक्ती राहतील गरोदर?

  कर्क, तूळ आणि मकर राशीच्या व्यक्ती यावर्षी गरोदर राहण्याची शक्यता आहे. यावर्षी या व्यक्तींच्या आयुष्यात नव्या घटना घडतील.

  4. कोणती रास सर्वात जास्त मूर्ख आणि शांत ठरते?

  मीन रास सर्वात जास्त शांत आणि मूर्ख ठरते. अतिशय संवेदनशील असल्यामुळे या व्यक्तींना कोणीही कधीही मुर्ख बनवून जाऊ शकते.

  5. सर्वात जास्त दयाळू रास कोणती?

  ज्योतिषशास्त्रानुसार तूळ ही सर्वात जास्त दयाळू रास आहे. प्रत्येक गोष्टीत समतोल साधायला या व्यक्ती पुढे असल्याामुळे या राशीच्या व्यक्ती जास्त दयाळू वाटतात.

  तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक