घरात यीस्ट संपलं असेल तर या पदार्थांनी बनवा पाव

घरात यीस्ट संपलं असेल तर या पदार्थांनी बनवा पाव


बेकिंगचे पदार्थ तयार करताना विशेषतः ब्रेड अथवा पाव तयार करताना यीस्टचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. पिझ्झा, बर्गर अथवा स्लाईस ब्रेड असा कोणताही पाव चांगला फुलण्यासाठी पीठात यीस्ट टाकण गरजेचं असतं. यीस्टमुळे पीठ फुलून वर येतं ज्यामुळे ब्रेड सॉफ्ट आणि लुसलुशीत होतो. पाव तयार करण्यासाठी इन्संट अथवा अॅक्टिव्ह यीस्टचा वापर केला जातो. ड्राय यीस्ट हे पावडर स्वरूपात असते तर स्लाईज स्वरूपातही ताजे यीस्ट बाजारात विकत मिळते. यीस्ट आणि पीठाचा संपर्क झाल्यावर पीठ फुलून डबल होते. ज्यामुळे बेक केल्यावर पाव सॉफ्ट होतो. ज्यांना घरी पाव तयार करण्याची सवय असते  त्यांच्या घरी नेहमीच यीस्ट असतं. मात्र पहिल्यांदा पाव तयार करणारे अथवा ज्यांच्या घरातील यीस्ट संपलं आहे ते यीस्टशिवाय पाव बेक करू शकतात. यासाठीच जाणून घ्या ब्रेड बेक करण्यासाठी यीस्टला पर्यायी काही पदार्थ जे तुम्हाला तुमच्या किचनमध्ये नक्कीच मिळतील.

बेकिंग पावडर -

केक, डोकळा असे पदार्थ करण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा बेकिंग पावडर विकत आणता. यात बेकिंग सोडा आणि सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे तुम्ही पाव तयार करण्यासाठीही बेकिंग पावडरचा वापर करू शकता. बेकिंग पावडरने पॅन केक, बिस्किट आणि केकचे विविध प्रकार तयार करता येतात. त्यामुळे बेकिंगचे पदार्थ तयार करण्यासाठी तुम्ही यीस्टऐवजी बेकिंग पावडरचा वापर नक्कीच करू शकता. 

Shutterstock

बेकिंग सोडा -

जर पाव तयार करतााना अचानक तुमच्या लक्षात आलं की घरातील यीस्ट संपलं आहे. तर काहीच हरकत नाही तुम्ही एखाद्या वेळी यासाठी बेकिंग सोडा नक्कीच वापरू शकता. बेकिंग सोड्यामुळेही पाव हल्का आणि  सॉफ्ट होऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा बेकिंग सोड्याला सक्रिय करण्यासाठी सायट्रिक अॅसिडची गरज असते. यासाठी वापरण्यापूर्वी त्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाका. ज्यामुळे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तुम्ही पदार्थ बेक करू शकता. 

Instagram

घरच्या घरी यीस्ट बनवण्याची सोपी पद्धत

जर समजा तुमच्याकडे बेकिंग पावडर अथवा बेकिंग सोडा नसेल आणि तुम्हाला बेकिंगसाठी यीस्टच हवं असेल तर थोडा वेळा काढा आणि घरच्या घरी असं यीस्ट बनवा.

साहित्य - 

 • एक कप मैदा
 • एक चमचा दही
 • एक चमचा साखर
 • एक चमचा बडिशेप पावडर

बनवण्याची कृती -

 • एका भांड्यात मध्यम आंचेवर अर्धा कप पाणी गरम करा 
 • एका दुसऱ्या भांड्यांत मैदा घ्या आणि त्यात गरम पाणी टाका
 • या मिश्रणात दही आणि बडिशेपची पावडर मिसळा
 • सर्व साहित्य व्यवस्थित एक्र करा. 
 • हे मिश्रण एकाच पद्धतीने फेटत राहा
 • जितकं जास्त फेटाल तितकं छान यीस्ट तयार होईल
 • फेटलेलं मिश्रण एका हवाबंद डब्यात भरून ठेवा
 • वीस ते बावीस तासांनी या मिश्रणामध्ये बुडबुडे निर्माण  होतील
 • मिश्रण आंबल्यामुळे तुमचं यीस्ट घरच्या घरी तयार होईल
 • हे यीस्ट तुम्ही आठवडाभर फ्रीजमध्ये टिकवून ठेवू शकता
Instagram