ADVERTISEMENT
home / Recipes
Panipuri Recipe In Marathi

3 सोप्या पद्धतीने घरच्या घरी पाणीपुरी बनवण्याची रेसिपी (Panipuri Recipe In Marathi)

पाणीपुरी, गोलगप्पा (Golgappa), पुचका (Puchka) अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा मात्र जिभेवर याची चव कायम राहणारा असा हा पदार्थ म्हणजे पाणीपुरी (Panipuri). कितीही पोट भरलेले असले तरीही पाणीपुरी म्हटलं की तोंडावर नकार येतच नाही. बाजारात काही जणांना पाणीपुरी खायला आवडत नाही. पण तुम्ही दुकानातून पुरी घेऊन घरी येऊन पाणीपुरी नक्की तयार करून खाता. पण तुम्हाला तेदेखील आवडत नसेल तर तुम्ही घरच्या घरी तीन पद्धतीने पाणीपुरीच्या या पुऱ्या नक्की करू शकता आणि मुळात तुम्हाला हवं तेवढं पोटभर खाताही येऊ शकतं. पाणी पुरीसाठी पाणी बनवणं नक्कीच सोपं आहे. पण पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या घरी बनवायच्या असतील तर खूपच मोठा घाट घालावा लागत असणार असं नक्कीच तुम्हाला वाटत असेल. पण अजिबात नाही. तसंच तुम्हाला वाटत असेल की पुऱ्या बाजारातील पुरीप्रमाणे कुरकुरीत होणार नाहीत. पण तुम्हाला या लेखातून आम्ही काही सोप्या टिप्स देत आहोत जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी पाणी पुरीच्या पुऱ्या करता येतील. यामध्ये कणकेच्या, रव्याच्या आणि मैद्याच्या अशा तिन्ही स्वरूपाच्या पुरीची रेसिपी (Puri Recipe) आम्ही देत आहोत. तुम्हीदेखील अगदी कमी वेळात या पुरी बनवू शकता.

गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या

आपण बटाटाच्या भाजीसह नेहमीच गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतो. पण गव्हाच्या पिठाच्या पाणीपुरीसाठी पुऱ्या करता येतात हे वाचून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हो तुम्ही घरच्या घरी या पुऱ्या करू शकता. 

साहित्य 

  • एक वाटी गव्हाचे पीठ 
  • अर्धी वाटी रवा 
  • 2 चमचे तेल 
  • अर्धा चमचा मीठ 
  • तळण्यासाठी तेल

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • गव्हाचे पीठ आणि रवा याचे प्रमाण जे  देण्यात आले आहे तसेच ठेवा याची काळजी घ्या. काहीही कमी जास्त होऊ देऊ नका 
  • बऱ्याचदा लोक हे एकत्र करून भिजवतात. ज्यामुळे हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित भिजू शकत नाहीत
  • तुम्हाला हे पीठ नीट भिजायला हवं असेल तर तुम्ही तुम्ही एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, रवा, मीठ आणि तेल एकत्र मिक्स करून घ्या. हे सर्व मिक्स्चर आधी नीट रगडून घ्या आणि मग त्यामध्ये पाणी मिक्स करून व्यवस्थित करून घ्या.  
  • पाणी घालून पीठ घट्टसर भिजवा आणि साधारण 20 मिनिट्स तसंच ठेवा. त्यावर फडकं ठेवा 
  • त्यानंतर पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्या
  • याचे गोळे बनवून लाटा. तुम्हाला लहान पुरी करता येत नसेल तर तुम्ही मोठी पुरी करा आणि गोल आकारात वाटीने कापा. त्यानंतर त्यावर नरम कपडा घालून तसंच पाच मिनिट्स ठेवा 
  • तेल गरम करून त्यात तळा

मी घरी बनवल्या बाजारापेक्षाही चांगल्या पाणीपुरीच्या पुऱ्या, जाणून घ्या कशा

रव्याच्या पुऱ्या

पाणीपुरीसाठी तुम्ही  रव्याच्या पुऱ्याही घरात करू शकता. बाजारामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला रव्याच्या पुऱ्याच मिळतात. या पुऱ्या पाणीपुरीसाठी  अधिक कुरकुरीत आणि चविष्ट लागतात.  

साहित्य 

  • एक कप रवा 
  • 4 लहान चमचे तेल 
  • चिमूटभर बेकिंग सोडा 
  • पाव चमचा मीठ 
  • तळण्यासाठी तेल  

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • रव्याची पुरी गव्हाच्या पुरीपेक्षा अधिक चांगली बनते 
  • रव्याची पुरी करताना जेव्हा रवा भिजवता तेव्हा गरम पाण्याचा वापर करायला हवा. ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. नाहीतर पुऱ्या चांगल्या होणार नाहीत
  • रवा भिजवताना पाणी हळूहळू खालून मग भिजवा. तसंच घट्ट भिजवा आणि साधारण 20 मिनिट्स भिजवून ठेवा
  • नंतर व्यवस्थित मळून घ्या आणि एका बाजूला कढईत तेल गरम करायला घ्या 
  • याच्या लहान लहान पुऱ्या तयार करून घ्या आणि त्या तळा
  • लक्षात  ठेवा की, तेल व्यवस्थित गरम असायला हवे. तसंच तळताना पुरी पटकन पलटा अन्यथा जळेल

गाजर हलवा बनविण्याची सोपी रेसिपी, असा होतो फायदा

रवा आणि मैद्याच्या पुऱ्या पाणीपुरीसाठी

आपण नुसत्या गव्हाच्या पिठाच्या आणि रव्याच्या पुऱ्या कशा करायच्या पाहिल्या. आता रवा  आणि मैदाच्या पुऱ्या कशा करायच्या जाणून घेऊया.  

साहित्य 

  • 1 कप मैदा 
  • 1 कप रवा 
  • स्वादानुसार मीठ
  • 1 चमचा तेल
  • चिमूटभर बेकिंग सोडा 
  • 1 कप कोमट पाणी 

बनविण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • यामध्ये आपण रव्याचा वापर करत असल्याने पाणी कोमट वापरायला हवे याची काळजी घ्या 
  • तुम्हाला सगळे सुके पदार्थ आणि तेल नीट मिक्स करा आणि हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • तयार झालेले पीठ साधारण अर्धा तास ओल्या कपड्याने झाकून ठेवा
  • त्यानंतर पुन्हा पीठ मळून घ्या 
  • मैद्याचे हे पीठ जास्त घट्ट अथवा जास्त मऊ होणार नाही याची काळजी घ्या 
  • याचे गोळे करून पुऱ्या लाटा आणि मग गरम तेलात तळा. आच मध्यम ठेवा

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

22 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT