चाळीशीनंतर करा या हेअरस्टाईल, दिसणार नाही वयस्कर

चाळीशीनंतर करा या हेअरस्टाईल, दिसणार नाही वयस्कर

हेअरस्टाईलचा तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. हेअरकटमुळे बऱ्याचला लुक बदल्यावर तुम्हाला लोकांकडून चांगल्या कंमेट्सही मिळतात. हेअरस्टाईल ही नेहमी तुमच्या फेसशेपप्रमाणे असायला हवी. चाळीशीनंतरही तरूण दिसण्यासाठी काही हेअरस्टाईल तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरू शकतात. ज्यामुळे तुमचं वाढणारं वय झाकलं जाईल आणि तुम्ही पंचविशीतल्या तरूणीसारख्या दिसाल.

चाळीशीनंतर कशी असावी हेअरस्टाईल

तुम्हाला वाचून थोडं आश्चर्य वाटेल कारण आम्ही तुम्हाला फ्रिंज अथवा थोड्या कमी उंचीच्या हेअरस्टाईलचा सल्ला देणार आहोत. कारण यामुळे तुमच्या केसांचा व्हॉल्युम वाढलेला दिसेल. चाळीशीनंतर वय, हॉर्मोन्स, औषधे, चिंताकाळजी यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. ज्यामुळे तुमचे केस थोडे पातळ झालेले असतात. अशावेळी चेहऱ्यावर फ्रिंज आल्यामुळे तुम्ही सुंदर आणि आकर्षक दिसाल. तुम्ही हेअरस्टाईसोबत काही प्रमाणात हेअर एक्सेंटेशनचा पर्यायही निवडू शकता. त्याचप्रमाणे केसांना नियमित तेल मालिश, शॅम्पू आणि कंडिशनर करा. 

शोल्डर लेंथ हेअरस्टाईल

जर तुम्हाला फार लहान केस ठेवणं आवडत नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या केसांची उंची तुमच्या खांद्याएवढी नक्कीच ठेवू शकता. या उंचीचे अनेक हेअरकट तुम्हाला हेअर स्टायलिस्ट सजेस्ट करू शकतात. विशेष म्हणजे असा हेअरकट कलर अथवा हायलाईट केल्यावर खूपच छान दिसतो. चाळीशीनंतरच्या महिलांवर हा हेअर कट शोभून दिसतो आणि त्यामुळे त्या वयस्करही दिसत नाहीत. 

instagram

चिन लेंथ बॉब कट हेअरस्टाईल

जर तुमचं वय चाळीशीच्या पुढे गेलं असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण फोर्टी प्लस महिलांसाठी हा एक उत्तम हेअरकट आहे. तुमच्या हनुवटीच्या उंचीचा बॉब कट केल्यामुळे तुम्ही वयाने खूप लहान दिसाल. हवं तर अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही  तुमच्या स्किन टोननुसार हेअर कलर अथवा केस हायलाईट करू शकता. आजकाल सिल्व्हर कलरची फॅशन आहे. त्यामुळे तुमचे पांढरे झालेले केसही झाकले जातील. शिवाय तुमच्या चेहऱ्यावर तारूण्याची झलकही दिसेल. 

instagram

कॉलरबोन लेंथ हेअरस्टाईल

मानेपर्यंत उंची ठेवून तुम्ही तुमच्या केसांची हेअरस्टाईल केली तर तुमचं वय चाळीशीतही कमी दिसेल. अशा हेअरस्टाईलला साईड पार्टिशन खूप छान दिसतं. शिवाय यामुळे तुमचा लुकही मस्त दिसेल. थोडासा आणखी बदल करण्यासाठी तु्म्ही तुमचे फक्त पांढरे झालेले केस हायलाईट करून लपवू शकता. शिवाय अशा हेअरस्टाईलवर हायलाईट केल्यावर तुम्हाला एक वायब्रंट लुक मिळू शकतो.

instagram

रेझर हेअरकट

फोर्टी प्लस महिलांमध्ये रेझर कट सध्या खूपच लोकप्रिय होत आहे. याचं कारण या हेअर स्टाईलमुळे तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वामध्ये बदल होऊ शकतो. अशा स्टाईलवर हायलाईट अथवा कलर केला तर तुमचा लुक पूर्ण बदलेल. वय लपवण्यासाठी आणि तरूण दिसण्यासाठी ही हेअरस्टाईल एकदा करून पाहायला काहीच हरकत नाही. रेझर कटमुळे तुमच्या चेहऱ्यामध्येही बदल झालेला दिसून येतो.

instagram

कुरळ्या केसांची हेअर स्टाईल -

जर तुमचे केस नैसर्गिक कुरळे असतील तर तुम्ही खूप लकी आहात असं समजा. कारण काही जणी त्यांच्या सरळ केसांना कर्ली करून हटके लुक करत आहेत. तुमच्याजवळ तर तुमचे नैसर्गिक कर्ली केस आहेत. चाळीशीनंतर अधिक तरूण दिसण्यासाठी अशा केसांचा एक शॉर्ट हेअर कट एक चांगला ऑप्शन आहे. ज्यामुळे तुमचे वय आहे त्यापेक्षा नक्कीच कमी दिसू शकते. 

 

instagram

लक्षात ठेवा वयामुळे होणारा फरक घालवण्यासाठी आणि नेहमीच तरूण  दिसण्यासाठी तुम्हाला सतत तुमच्या हेअरस्टाईलमध्ये काहीतरी बदल करत राहायला हवं. एकसारखा लुक पाहून तुम्हीदेखील कंटाळू शकता. हेअरस्टाईलमुळे झालेल्या या छोट्याशा बदलामुळे तुमचे व्यक्तिमत्व तर बदलेच पण तुमच्यात नवा उत्साहदेखील संचारतो. या वयात तरूण दिसण्यासाठी तो जास्त महत्त्वाचा आहे. 

Beauty

Ultimatte Long-Stay Matte Lipstick - Foxy

INR 699 AT MyGlamm