ADVERTISEMENT
home / Fitness
Brain Tumor Symptoms In Marathi

जाणून घ्या ब्रेन ट्यूमरची लक्षणे (Brain Tumor Symptoms In Marathi)

ब्रेन ट्युमर हा मेंदूशी निगडीत असा गंभीर आजार आहे. या आजाराविषयी योग्य माहिती असणे हे गरजेचे आहे. चित्रपटातून अनेकदा ब्रेन ट्युमर या आजाराविषयी अनेकांनी ऐकले असेल. ब्रेन ट्युमर झाले की, माणसाचे आयुष्य संपले आता पुढे काहीच होऊ शकत नाही असे दाखवले जाते. पण विज्ञानाने बरीच प्रगती केली असून आता या आजाराविषयी बरीच माहिती आता दिली जाते. ब्रेन ट्युमरचे प्रकार त्याचा कॅन्सरशी असलेला संबंध या सगळ्या गोष्टी योग्य वेळी जाणून घेणे गरजेचे असते. ब्रेन ट्युमर म्हणजे काय? ब्रेन ट्यूमरची लक्षणे (brain tumor symptoms in marathi) कोणती? या गोष्टी जरी आपण जाणून घेतल्या तरी देखील आपल्याला या आजाराविषयी थोडी माहिती मिळू शकेल. चला करुया सुरुवात

ब्रेन ट्युमर म्हणजे काय? (Brain Tumor Meaning In Marathi)

Brain Tumor Meaning In Marathi

ब्रेन ट्युमर हे नाव जरी घेतले तरी अनेकांचा थरकाप उडतो. पण या आजाराला घाबरण्याआधी हा आजार काय ते जाणून घेणे गरजेचे आहे. मानवी शरीरातील अत्यंत महत्वाचा अवयव म्हणजे ‘मेंदू’. मेंदू हा जरी शरीरातील सगळ्यात छोटा अवयव असला तरी संपूर्ण शरीराचे कार्य त्याच्यावर अवलंबून असते. ब्रेन ट्युमरमध्ये मेंदूच्या आजुबाजूला अनेक वेगवेगळ्या गाठी तयार होऊ लागतात. ब्रेन ट्युमरचे दोन प्रकार असतात. बेनाईल आणि मॅलिग्नंट असे दोन प्रकार यामध्ये प्रामुख्याने असतात. बेनाईल हा ब्रेन ट्युमरचा प्रकार फारसा धोकादायक नसतो. पण मॅलिग्नंट हा प्रकार अधिक धोकादायक असतो. कारण यामध्ये मेंदूमध्ये कॅन्सर होतो. ही गाठ वाढत जाते. पहिल्या प्रकारातील गाठीच्या तुलनेत ही गाठ जास्त वेगाने वाढते. या दोन्ही गाठी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढता येतात. 

ADVERTISEMENT

ब्रेन ट्यूमरची लक्षणे (Brain Tumor Symptoms In Marathi)

ब्रेन ट्युमरची माहिती आणि प्रकार जाणून घेतल्यानंतर त्याची लक्षणे जाणून घेऊया. जर तुम्हाला असा काही त्रास सातत्याने होत असेल तर तुम्हाला त्याची लक्षणे जाणून घेणेही गरजेचे आहे. सर्वसामान्यपणे ब्रेन ट्युमरची ही लक्षणे (brain tumor symptoms in marathi) अगदी हमखास जाणून येतात.

डोकेदुखी (Headache)

डोकेदुखी

डोकेदुखी ही वेगवेगळ्या कारणाने होऊ शकते. पण ब्रेन ट्युमरच्या एका लक्षणापैकी डोकेदुखी ही देखील आहे. मेंदूत आलेल्या गाठीमुळे सतत डोकेदुखी होत राहते. ही डोकेदुखी अॅसिडिटी किंवा इतर वेळी होणाऱ्या डोकेदुखीसारखी होत नाही. ही त्यापेक्षा अधिक आणि सतत त्रास देणारी ठरते. जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना तातडीने दाखवून घ्या. सतत होणारी डोकेदुखी ही अजिबात चांगली नाही. यामुळे तुम्हाला इतर काही समस्याही होऊ शकतात. 

ADVERTISEMENT

झोपेच्या तक्रारी (Sleep Problems)

उत्तम आरोग्यासाठी झोप ही महत्वाची असते. जर ही झोप पूर्ण झाली नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो. ब्रेन ट्युमरमध्ये झोपेसंदर्भात अनेक तक्रारी जाणवू लागतात. जरझोप न येणे, झोप तुटणे असा काही त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्हाला योग्य वेळी इलाज करणे गरजेचे असते. ब्रेन ट्युमरच्या एका लक्षणांपैकी झोपेच्या तक्रारी हे देखील आहे.

सतत विसर पडणे (Memory Changes)

मेंदूशी संदर्भात हा आजार असल्यामुळे कमी वयात सगळ्या गोष्टींचा विसर पडणे हा त्रासही अनेकांना होऊ लागतो. जर तुम्हाला सतत काही गोष्टी विसरण्याचा त्रास होत असेल आणि तुम्ही सतत काहीही ना काही विसरत असाल तर ब्रेन ट्युमरच्या एका लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. याकडे मुळीच दुर्लक्ष करुन नका.

उलटी (Vomiting)

उलटी

सतत उलटया होणे हे देखील ब्रेन ट्युमरचे एक लक्षण (brain tumor symptoms in marathi) आहे. यामध्ये तुम्हाला सतत उलट्या होत राहतात. काहीही कारण नसताना अशा उलट्या होत राहणे हे फारच गंभीर असे लक्षण आहे. जर अशा उलट्या तुम्हाला सतत होत असतील तर तुम्ही त्याकडे लक्ष द्यायला हवे. बऱ्याच वेळी मेंदूला दुखापत झाल्यानंतरही अशाप्रकारने उलट्या येण्याचा त्रास होऊ शकतो.

ADVERTISEMENT

आकडी (Seizures)

आकडी येण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. मेंदूला रक्तपुरवठा योग्य पद्धतीने झाला नाही तरी देखील आकडी येऊ शकते. पण तुम्हाला सतत आकडी येत असेल तर तुम्हाला मेंदू संदर्भात काही त्रास असण्याची शक्यता आहे. ब्रेन ट्युमरमध्येही अशापद्धतीने आकडी येण्याची शक्यता असते. आकडीचा त्रास तुम्हाला सतत होत असेल तर याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका.तातडीने डॉक्टर गाठा आणि योग्य काळजी बाळगा.

थकवा (Fatigue)

थकवा

थकवा हे देखील  ब्रेन ट्युमरच्याा लक्षणापैकी एक आहे. खूप काम केल्यावर थकवा येणे आणि काहीही काम न करता सतत थकवा जाणवणे यामध्ये फरक आहे. तुम्ही जरासे चाललात किंवा काही बोललात तरी शरीरात इतका थकवा येतो की, त्यामुळे शरीराचे संपूर्ण संतुलन बिघडते. उगाचच धडपडल्यासारखे होते. काहीही करण्याची इच्छा होत नाही. हा थकवा इतका त्रासदायक असतो की, अजिबात उठावेसेही वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला काहीही झालेले नसताना असा थकवा जाणवत असेल तर तुम्हाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असा थकवा जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे जा.

संवेदना कमी होणे (Reduce The Sensation Of Touch)

मेंदूवर संपूर्ण शरीराचे कार्य अवलंबून असते. ज्यावेळी मेंदूचे कार्य बिघडते. त्यावेळी शरीराचे कार्य योग्य पद्धतीने होत नाही. ब्रेन ट्युमरमध्ये शरीराच्या संवेदनाही कमी होतात. एखादी गोष्ट लागली किंवा तुम्हाला काय टोचले आहे हे कळायचे बंद होते. त्यामुळे अशापद्धतीने संवेदना बंद झाल्या असतील तर तुम्ही अधिका काळजी घ्यायला हवी.

ADVERTISEMENT

दृष्टीदोष (Blurred Vision)

दृष्टीदोष

मेंदूचे कार्य बिघडले की त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतो. इतेकच नाही तर हा परिणाम तुमच्या दृष्टीवरही होऊ लागतो. वयोमानानुसार नाही किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे तुमच्या दृष्टीवर परिणाम झाला असेल तर तुम्ही डोळे तपासून घ्या. पण त्याचबरोबर तुम्हाला त्रास ब्रेन ट्युमररच्या त्रासामुळे तर होत नाही ना हे देखील तपासून घ्या.

गोंधळ वाढणे (Confusion)

मेंदूचे कार्य योग्य पद्धतीने सुरु नसेल तर सतत गोंधळायला होते. जर असा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही योग्य वेळी काळजी घ्या.स्वभावात गोंधळेपणा असणे आणि तो अचानक येणे यामध्ये बरेच अंतर असते जर तुम्ही असे सतत गोंधळत असाल तर तुम्हाला मेंदू संदर्भात काही त्रास असेल तर असा त्रास होऊ शकतो.

सतत चिडचिड होणे (Personality Changes)

चिडचिड

ADVERTISEMENT

ब्रेन ट्युमरमधील आणखी एक लक्षण (brain tumor symptoms in marathi) म्हणजे तुमच्या वागण्या-बोलण्यात सतत बदल होत राहणे. कधी प्रेमळ तर कधी सतत चिडचिड करत राहणे असे काही त्रास होऊ लागतात. तुम्ही आहात त्यापेक्षा अधिक वेगळे वागू लागता. सतत बदलण्याचा हा स्वभाव जर तुम्हाला इतर दिवसांपेक्षा वेगळा वाटत असेल तर तुम्ही काही गोष्टींची खातरजमा करुन घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास पुढे होणार नाही.
 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. ब्रेन टयुमर आहे हे सतत जाणवत राहते का?

प्राथमिक पातळीवर ब्रेन ट्युमरची कोणतीही लक्षण फारशी दिसून येत नाही. पण जसा हा त्रास वाढू लागतो आणि जर त्यावर कोणताही योग्य इलाज केलेला नसेल तर कालांतराने ब्रेन ट्युमरची काही लक्षण सतत जाणवू लागतात. डोकेदुखी आणि मायग्रेन सारखी डोकेदुखी सतत होऊ लागते.

2. ब्रेन ट्युमर बरा होऊ शकतो का?

ब्रेन ट्युमर कोणत्या पातळीवर आता आहे. त्यावरुन तो बरा होणार की नाही ते कळते. ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करुन तो काढून टाकण्यात येतो. पहिल्या आणि दुसऱ्या पातळीवरब्रेन ट्युमर असेल तर तो योग्य वेळी काढता येतो. पण प्रत्येकाची प्रकृती आणि आरोग्य वेगळे असते. त्यामुळे ब्रेन ट्युमर कोणत्या प्रकारातील आहे आणि त्याने शरीराची किती हानी केली आहे त्यावरच इलाज आणि बरे होणे अवलंबून असते.

3. ब्रेन ट्युमरची चाचणी कशी करता येऊ शकते?

न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांकडून तुम्हाला न्युरोलॉजिकल टेस्ट करता घेऊ येऊ शकते.त्यांच्याकडे असलेल्या स्कॅनिंग मशीन्स आणि टेस्टच्या साहाय्याने तुम्हाला मेंदूचे परिक्षण करता येऊ शकते. जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचे परिक्षण करु शकता.

22 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT