का कीडतात लहान मुलांचे दुधाचे दात, करा हे उपाय

का कीडतात लहान मुलांचे दुधाचे दात, करा हे उपाय

लहान मुलांना सर्वात पहिले जे दात येतात त्यांना दुधाचे दात असं म्हणतात. साधारणपणे दोन ते अकरा वर्षांच्या मुलांचे दात हे दुधाचे असतात. सहा सात वर्षानंतर ते हळू हळू पडून जातात आणि नवीन दात त्यांना येतात. मात्र आजकाल लहान मुलांचे दुधाचे दात कीडणे हा प्रकार खूपच वाढत आहे. यामागे मुलांचे चॉकलेट, कॅंडी,आईस्क्रीम असे गोड पदार्थ खाणे, दात वेळेवर न घासणे, खाल्यानंतर चुळ न भरणे अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. मात्र यासाठी  लहान मुलांनाही योग्य डेंटल केअरची गरज असते. कारण दात कीडण्यामुळे मुलांच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. यासाठीच जाणून घ्या दुधाचे दात कीडण्याची लक्षणे, कारणे आणि उपाय

दुधाचे दात कीडण्याची लक्षणे

लहान मुलांचे दुधाचे दात कीडत आहेत का हे ओळखण्याची  काही सोपी लक्षणे जाणून घ्या

  • मुलं जर तुम्हाला सतत दातांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असतील
  • मुलांच्या वरच्या दातांचा रंग बदलणे आणि  हिरडीजवळ पांढरे डाग पडणे
  • लहान मुलांच्या ताळेचे प्रमाण वाढणे
  • मुलं चिडचिडी होणे
  • मुलांना सतत काहीतरी चावण्याची इच्छा होणे
  • जर तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणं जाणवत असतील तर त्यांना डेस्टिस्टकडे नेण्याची गरज आहे

 

दुधाचे दात कीडण्याची कारणे

लहान मुलांचे दात कीडण्याचा प्रकार एक प्रकारच्या सामुहिक जीवजंतूंमुळे होतो. हे जीवजंतू दातात अडकलेले गोड पदार्थ खातात. ज्यामुळे तोंडात एक प्रकारचे अॅसिड निर्माण होते. या अॅसिडमुळे दातांमधील कॅल्शिअम कमी होते. यासोबतच दातांच्या रचनेवरही यामुळे परिणाम होतो. दोन वर्षानंतर मुलांच्या तोंडात निर्माण होणाऱ्या ताळेमुळे जे जीवजंतू निर्माण होतात. त्याचप्रमाणे मोठ्यांचे उष्टे पदार्थ खाणे त्याचा टुथब्रश वापरणे अशा गोष्टींमुळेही लहान मुलांचे दात कीडू शकतात. 

लहान मुलांचे दुधाचे दात कीडू नयेत करा हे उपाय

जर तुमच्या मुलांचे दुधाचे दात कीडू नये असं वाटत असेल तर या टिप्स फॉलो करा आणि मुलांच्या दातांची काळजी घ्या.

  • लहान मुलांना दूध अथवा इतर पदार्थ खाऊ घातल्यास त्यांना पाणी पिण्यास द्या अथवा एखाद्या ओल्या आणि स्वच्छ फडक्याने त्यांचे तोंड पुसून घ्या
  • एक वर्षाच्या वरील मुलांना छोट्या ब्रशने दात घासण्याची सवय लावा
  • मुलांना आडवं करून भरवल्यामुळे त्यांचे दात कीडण्याची शक्यता अधिक वाढते यासाठी मुलांना बसवून भरवा
  • आईने स्वतःच्या दातांची योग्य काळजी घ्यावी कारण आईचे उष्टे अन्न  अथवा लाळेचा स्पर्श झाल्यास मुलांचे  दात कीडू शकतात.

काही घरगुती उपचार करून तुम्ही तुमच्या लहान मुलांचे दात कीडणे रोखू शकता. पण जर तुमच्या मुलांचे दुधाचे दात कीडले असतील तर ते पडण्याची वाट पाहत बसू नका. योग्य वेळी डेस्टिस्टचा सल्ला घ्या आणि मुलांचे आरोग्य राखा. कारण असं केलं नाही तर मुलांच्या दातांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण  आरोग्यावर पडू शकतो. शिवाय ही गोष्ट साधारण आहे असं समजल्यामुळे मुलांच्या दातांचं नुकसान होऊ शकतं. कारण दुधाचे दात एकत्र पडत नाहीत. काही दुधाचे दात पडण्यापूर्वी जर तुमच्या मुलांना नवीन दात आले असतील तर त्यामुळे त्यांचे चांगले दातही कीडू शकतात. यासाठीच वेळीच सावध व्हा आणि मुलांना डेस्टिस्टकडे न्या. 

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm