लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त दिवस टिकते का, जाणून घ्या तथ्य

लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त दिवस टिकते का, जाणून घ्या तथ्य

सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी महिलांकडे अनेक ब्युटी आणि मेकअप प्रॉडक्टस असतात. मात्र बऱ्याचदा हे प्रॉडक्ट कसे साठवून ठेवावे अथवा त्याबद्दल पुरेशी माहिती प्रत्येकीकडे असतेच असं नाही. ज्यामुळे या बाबत अनेक समज आणि गैरसमज निर्माण होऊल शकतात. काही वेळी कुणीही काही सांगितलं तर त्यावर पटकन विश्वास ठेवला जातो. लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवावी की बाहेर हाही एक प्रश्न अनेकींच्या मनात निर्माण होत असतो. यासाठीच जाणून घ्या सौंदर्यप्रसाधनांबाबत मनात असलेले काही समज आणि गैरसमज

लिपस्टिक अथवा काजळ फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होत नाही

फ्रीजमध्ये सौंदर्य प्रसाधने अथवा मेकअपचं साहित्य ठेवण्याची अनेकींना सवय असते. लिपस्टिक, काजळ, नेलपॉलिश फ्रीजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य याबाबत अनेक समज आहेत. मात्र शक्य असल्यास लिपस्टिक आणि इतर मेकअपचं साहित्य ड्रेसिंग टेबलवरच ठेवावं. कारण लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती जास्त दिवस टिकू शकत नाही. तुमच्या लिपस्टिकमध्ये कोणते घटक आहेत यावर ती किती दिवस टिकणार अथवा किती दिवस वापरावी हे ठरत असतं. साधारणपणे दोन वर्षांपेक्षा जास्त दिवस लिपस्टिक वापरू नये. त्यामुळे जरी तुम्ही तुमची लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवली तरी ती दोन वर्षांपेक्षा जास्त काळ वापरणं आरोग्यासाठी  योग्य नाही. 

Beauty

Molten Matte Liquid Lipstick- Bia

INR 645 AT MyGlamm

त्वचा कोरडी असेल तरच त्वचेवर सुरकुत्या पडतात

त्वचेवर सुरकुत्या येण्याची खरंतर अनेक कारणं आहेत. मात्र अनेकींना असं सांगण्यात येतं की तुमची त्वचा कोरडी आहे म्हणून तुम्हाला लवकर सुरकुत्या येतात. मात्र हे एवढंच कारण नक्कीच पुरेसं नाही. शिवाय ज्यांची त्वचा कोरडी नाही त्यांनाही सुरकुत्या येऊ शकतात. म्हणजेच जेव्हा तुमच्या त्वचेतील कोलेजीनची निर्मिती कमी होते तेव्हा तुमच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. म्हणूनच फक्त कोरड्या त्वचेवर उपचार करून तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होणार नाहीत. त्यावर वेळीच योग्य उपचार करायला हवेत

केस वारंवार विंचरल्यास अधिक चमकदार होतात

केसांबाबत हा एक खूप मोठा गैरसमज अनेकींमध्ये असतो. काळे, घनदाट आणि चमकदार केस मिळवण्यासाठी ते सतत विंचरणाऱ्या महिला आहेत. मात्र असं केल्यामुळे तुमचे केस चमकदार होतातच असं नाही. केस नियमित विंचरण्यामुळे फक्त केसांचा गुंता कमी होतो. केस चमकदार होण्यासाठी ते सिल्की आणि शायनी होणारे घटक असलेले हेअर प्रॉडक्ट अथवा घरगुती उपाय करायला हवे. 

shutterstock

सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरावे

उन्हाच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी  सनस्क्रीन लोशन अथवा क्रीम वापरलं जातं. मात्र याचा अर्थ असा मुळीच नाही की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरावे. हिवाळा अथवा पावसाळ्यातही उन्हामुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कोणत्याही सीझनमध्ये उन्हात जाण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीनने सुरक्षित करणं गरजेचं आहे. एवढंच नाही घरातही भरपूर प्रकाश येत असेल अथवा बराच काळ लॅपटॉपवर काम असेल तरी सनस्क्रीन लावण्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

कंडिशनर लावण्यामुळे केसांना फाटे फुटत नाहीत

बरेच लोक सांगतात की केसांना फाटे फुटू नयेत यासाठी कंडिशनर वापरा. कंडिशनरमुळे केसांना योग्य पोषण मिळतं आणि केस मुलायम होतात. हे जरी खरं असलं तरी यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या नक्कीच कमी होत नाही. केसांना फाटे फुटत असतील तर योग्य वेळीच केस ट्रिम करणं आणि केसांसाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे.