लग्नात हवी असेल डागविरहित त्वचा तर वापरा सोप्या टिप्स

लग्नात हवी असेल डागविरहित त्वचा तर वापरा सोप्या टिप्स

आपल्या लग्नात सर्वात सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. लग्नात आपल्याला सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती त्वचेची. त्वचेवर कोणताही डाग असू नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. पण जर तुम्ही आतून म्हणजेच शरीराच्या आतल्या भागातच योग्य आणि हेल्दी नसाल तर मग त्वचादेखील तुम्ही योग्य दिसणार नाही. त्वचेचे टेक्स्चर सुधारण्यासाठी तुम्हाला खूपच मेहनत घ्यावी लागते. पण त्यासाठी तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी पडतात ते म्हणजे न्यूट्रिशन्सच्या टिप्स. तुम्हाला या लेखातून त्वचा डागविरहित दिसावी यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देत आहोत. तुम्हीही या टिप्सचा वापर करा आणि लग्नात दिसा अधिक सुंदर. डागविरहित त्वचा दिसण्यासाठी शरीराला योग्य पोषक तत्व मिळणं अत्यंत गरजेचे आहे. यासाठी नक्की काय काय करायचे ते आम्ही या लेखातून तुम्हाला सांगत आहोत.

तांब्याच्या ग्लासातून प्या पाणी

Shutterstock

नेहमी तुम्हाला तांब्याच्या ग्लासातून पाणी पिणं शक्य नसेल पण तुम्ही दिवसातून किमान एकदा तरी हे नक्कीच करू शकता. तांबे अर्थात कॉपर हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक मिनरल आहे. शरीरातील मेलानिन बुस्ट करण्याचे काम तांबे करते. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी हे फायदेशीर ठरते. तुम्ही जर रात्रभर किंवा साधारण 8 तास तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले आणि सकाळी उठून ते रिकाम्यापोटी प्यायले तर तुमच्या शरीराला याचा फायदा मिळतो. त्वचेवर मुरूमं येत नाहीत आणि शरीरातील विषारी पदार्थ मारून टाकण्यास याची मदत होते. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढविण्यासाठी आणि कोलेजन प्रॉडक्शन उत्तम करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याशिवाय त्वचेला रोज मॉईस्चराईज करायला विसरू नका.

Beauty

GLOW Iridescent Brightening Moisturising Cream

INR 1,595 AT MyGlamm

विटामिन डी

विटामिन डी हे एक सर्वात उपयुक्त अँटिऑक्सिडंट आहे जे नैसर्गिक ग्लुटाथिऑन असून शरीरातच याचे निर्माण होत  असते.  या अँटिऑक्सिडंटमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात अँटिएजिंग पॉवर असते.  यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. विटामिन डी हे वयानुसार शरीरातून कमी होत जाते.  त्यामुळे जेवणात अथवा तुम्ही खात असलेल्या खाण्यामध्येही सल्फरचे प्रमाण जास्त असते. सल्फर या अँटिऑक्सिडंटच्या प्रॉडक्शनला वाढविण्यास मदत करते. तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अंडे,  लसूण, ब्रोकोली, मशरूम, कोबी, फ्लॉवर आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करून घ्यायला हवा.  सहसा बाहेरचे खाणे टाळा. यामुळे त्वचेवर पटकन परिणाम होऊन त्वचा अधिक तेलकट होते आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा येतो. 

चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार

हिरव्या भाजी

Shutterstock

तुम्ही नियमित आपल्या जेवणामध्ये हिरव्या  भाज्यांचा समावेश करून घ्या.  हिरव्या भाज्यांमुळे त्वचा अधिक चांगली होते.  त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळून चेहऱ्यावर अधिक चांगली चमक येण्यास मदत मिळते. तसंच आवश्यक पोषण  मिळाल्यामुळे चेहरा तजेलदार होण्यासह, चेहऱ्यावर मुरूमं अथवा पुळ्या येणे कमी होते. तुमच्या त्वचेसाठी आवश्यक अँटिऑक्सिडंट्स यामध्ये असल्याने त्वचा शुद्ध होण्यास मदत मिळते. 

चमकदार त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी प्या ‘हे’ ज्युस

हायड्रेशन

Shutterstock

हायड्रेशन वजन कमी करण्यासाठी आणि त्वचा डागविरहित करण्यासाठी महत्त्वाचे  आहे. आपल्या शरीरात 70% पाणी असते आणि एक टक्का फ्लूईड लॉस आपल्याला डिहायड्रेट करते. यामुळे तुम्ही थकलेले दिसता आणि त्याशिवाय डोक्यामध्ये दुखणेही चालू होते. तुम्ही एक एक घोट पाणी प्या आणि पूर्ण  दिवस यामुळे तुम्हाला हायड्रेट राहता येईल. अथवा तुम्ही दिवसभरात आठ ते नऊ ग्लास पाणी पिऊनही तुमची त्वचा अधिक चांगली राहते. याशिवाय  तुम्ही ताज्या भाज्यांचे ज्युस अर्थात काकडी, सेलेरी, बीट, हिरवे सफरचंद, स्ट्रॉबेरी अथवा आलं याच्या स्मूदींचाही समावेश करून घेऊ शकता. हे तुमच्या त्वचेला नेहमीच चांगले आणि तजेलदार ठेवते. लग्नाच्या  आधी तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

विटामिन सी

Shutterstock

सायट्रस फ्रूट्स अर्थात संत्रे, लिंबू, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, मोरिंगा, किवी यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते.  त्वचेला डागविरहित ठेवायचे  असेल तर तुम्हाला याचा नक्कीच तुमच्या रोजच्या खाण्यात समावेश करून घ्यायला हवा. विटामिन सी कोलेजन बनविण्यास मदत करते आणि ग्लुटाथिओन यामुळे वाढून त्वचेमध्ये उजळपणा येतो. तसंच तुम्ही हे खात असताना साखरेचे प्रमाणही आहारातून कमी करायला हवे. साखरेने वजन वाढते.  त्यामुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसू लागतो. आहारात तुम्ही विटामिन सी चा वापर जास्त करून घ्या. केवळ खाण्यातच नाही तर तुम्ही लिंबाची साल अथवा संत्र्याची साल ही तुमच्या चेहऱ्याला लावली तरीही तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदतच मिळते. 

गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार

आतडे चांगले राहील याची घ्या काळजी

आपल्या त्वचेची काळजी ही  आपल्या शरीरातील आतड्यांच्या स्वास्थ्याशी निगडीत असते.  फर्मेंटेड फूड्स आणि ड्रिंक्स हे डाएटमध्ये सामावून घ्या.  तुमची त्वचा लग्नात चांगली दिसायला हवी असेल तर त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तसंच त्वचेसाठी तांदळाचे पाणी, पेज, ताक, दुधाची साय या गोष्टीही अत्यंत चांगल्या आहे.  तुम्ही याचा वापर करूनही त्वचा अधिक तजेलदार आणि सुंदर ठेऊ शकता.  

व्यायामामुळेही त्वचा राहते चांगली

Shutterstock

तुम्ही नियमित आणि योग्य व्यायाम  केला तरीही  त्वचा उत्तम राहते.  प्राणायाम, मंत्रोच्चारण, योग्य व्यायाम तुम्ही रोज साधारण पाऊण तास केलात तरी तुमच्या  शरीराचा थकवा निघून जातो आणि चेहऱ्यावर त्याचा परिणाम नक्कीच दिसून येतो. यासाठी तुम्ही दिवसातून किमान पंधरा मिनि्ससाठी फेशियल योगा ट्राय करा. हे फेशियल मसल्याना टोन करतात आणि त्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसते. 

या टिप्सचा वापर करून तुम्ही लग्नासाठी जर सुंदर दिसण्याचा विचार करत असाल तर नक्कीच वापर करा. चेहऱ्यावर येईल चमकदारपणा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक