DIY - डागविरहित त्वचेसाठी करा घरातील कापूराचा वापर

DIY - डागविरहित त्वचेसाठी करा घरातील कापूराचा वापर

आपली बदलती लाईफस्टाईल आणि सततच्या प्रदूषणामुळे विशेषतः महिलांना चेहऱ्यावर मुरूमांचा आणि पुळ्यांचा त्रास होत असतो. चेहऱ्यावर एकदा मुरूमांचा त्रास सुरू झाला की, तो लवकर जाण्याचे नाव काही घेत नाही. चेहऱ्यासह मुरूमं आणि पुळ्या या पाठीवर, खांद्यावरही होतात. मुरूमं होण्याची खरं तर कारणं अनेक असतात. पण धूळ, माती आणि प्रदूषण हे सर्वात महत्वाचे कारण आहे. यामुळे महिलांच्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. यापासून सुटका मिळविण्यासाठी महिला काय काय नाही करत. मुरूमं एकदा चेहऱ्यावर आले की त्याचा त्रास लवकर संपत नाही. त्याशिवाय त्याला काही ना काही कारणाने हातही लागतो आणि त्यामुळे त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. या सर्वात तुम्हाला अति त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी बाजारातील अनेक उत्पादनांचाही वापर करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठी तुम्ही बाजारातील विविध उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरातील कापूर तुम्हाला अधिक चांगला फायदेशीर ठरेल. कापराच्या वापराने चेहऱ्यावरील पिंपल्स अर्थात मुरूमं जातात. याचा योग्यरित्या कसा वापर करायचा ते आपण या लेखातून जाणून घेऊया.

मुरूमांसाठी उत्कृष्ट क्रिम्स, वापरून समस्या करा दूर (Best Creams For Pimples In Marathi)

मुलतानी माती आणि कापूरचा फेसपॅक

Freepik.com

डागविरहित आणि चमकदार त्वचा हवी असेल तर कापूर आणि मुलतानी मातीचा फेसपॅक हा  अत्यंत उपयुक्त आहे. बऱ्याचदा चेहऱ्यावरून मुरूमं निघून जातात पण मुरूमांचे  काळे डाग मात्र चेहऱ्यावर तसेच राहतात. तुम्हीही चेहऱ्यावरील मुरूमांनी त्रस्त असाल तर तुम्ही मुलतानी माती आणि कापराचा फेसपॅक वापरून त्याचा फायदा करून घेऊ शकता. मुलतानी माती हा चेहऱ्यासाठी उत्तम आणि नैसर्गिक घटक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कोणत्याही केमिकलयुक्त उत्पादनापेक्षा मुलतानी मातीचा चेहऱ्यासाठी वापर हा अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यातही कापूर घातला की त्याचा अधिक चांगला फायदा मिळतो. 

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

फेसपॅक बनविण्याची पद्धत

Shutterstock

याचा फेसपॅक बनविण्यासाठी सर्वात पहिले कापूर आणि मुलतानी माती घ्या. दोन चमचे मुलतानी मातीमध्ये तुम्ही एक तुकडा कापूर मिक्स करा आणि त्यात गुलाबपाणी मिक्स करून व्यवस्थित त्याची पेस्ट तयार करून घ्या. कापराच्या जागी तुम्ही कापराचे तेलही वापरू शकता. ही पेस्ट तयार केल्यावर तुम्ही चेहऱ्यावर लावा. 15 मिनिट्सनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्हाला याचे फायदे दिसून येतील.

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

कापूर आणि मुलतानी मातीचा लाभ

Beauty

Manish Malhotra Kesar Face Pack Gel

INR 945 AT MyGlamm

कापरामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात जे त्वचेवरील किटाणू आणि मुरूमांमधील बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत  करतात. मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. मुलतानी मातीचा वापर यासाठीही केला जातो की, त्यामुळे शरीरावरील टॅन कमी होईल. त्यामुळे या दोन्हीच्या मिश्रणाने शरीराला अधिक फायदा होतो. मुरूमांची समस्या ही केवळ महिलांनाच होते असं नाही तर पुरूषांनाही होते. त्यामुळे आपल्या त्वचेसाठी मुलंही याचा वापर करून घेऊ शकतात. या फेसपॅकमुळे त्वचेवरील असणारी घाण निघून जाण्यास मदत मिळते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक