लस हे असे उत्पादन आहे जे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीस विशिष्ट रोगास प्रतिबंध करण्यास मदत करते. कोविड (Covid 19) लसींमध्ये संपूर्ण व्हायरस नसतो, परंतु त्यातील केवळ एक भाग असतो. लसीकरणानंतर ताप आणि इतर सौम्य दुष्परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामुळे उद्भवतात. काही लसींमध्ये निश्चितपणे जिवंत कोविड व्हायरस वापरला आहे, त्यापैकी दोन भारतात तयार केले गेले आहेत. गोवर, टीबी यांसारख्या आजारांसाठी आपण यापूर्वीच लस घेतलेली आहे.पण कोविडच्या लसीकरणाबाबत (Covid Vaccination) अजूनही अनेक जण साशंक आहेत. त्याबाबत काही महत्वाची माहिती आम्ही घेतली, डॉ तुषार राणे, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, मुंबई यांच्याकडून. तुमच्याही मनात काही लसीकरणासंदर्भात शंका असतील तर तुम्ही हा लेख नक्की वाचा.
· कोविड लसीमधील कोणत्या घटकाची एलर्जी होऊ शकते हे जाणून घेणे आवश्यक आहे. पॉलीथिलीन ग्लायकॉल आणि पॉलिसॉर्बेट सारखे घटक असल्याने कोविड लसीच्या पहिल्या डोसनंतर त्या व्यक्तीस एलर्जी निर्माण होण्याची शक्यता आहे.
· कमकुवत रोगप्रतिकारक यंत्रणा, दीर्घकालीन आरोग्याची समस्या, अवयव प्रत्यारोपण झालेला रुग्ण आणि रोगप्रतिकारक औषधांचा वापर केला जाणारा रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक
· वॉरफेरिनचा वापर करत असलेला रूग्णाने लस घेऊ नये. कोग्युलेशन डिसऑर्डर, क्लोटिंग फॅक्टरची कमतरता, कोगुलोपॅथी किंवा प्लेटलेट डिसऑर्डर असलेले रुग्ण ही लस घेऊ शकत नाहीत.
· १६ वर्षाखालील रुग्ण ही लस घेऊ शकत नाही.
· गर्भवती किंवा स्तनपान देणारी महिलादेखील लस घेऊ शकत नाही.
लसीकरण करणार असाल तर तुम्ही काही महत्वाची खबरदारी घेणे गरजेचे आहे. नक्की कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला हवी ते पाहूया
#COVID 2019: या काळात ध्यान साधना करुन मिळवा मन:शांती (Meditation Benefits In Marathi)
लसीकरणानंतरही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी नक्की कोणती काळजी घ्यायची याचीही माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ती जाणून घ्या.
सावधान! कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अशी घ्या काळजी (Corona Virus Easy Care)
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक