कर्ली आयर्निंगशिवाय बनवा सोप्या पद्धतीने वेव्ही हेअरस्टाईल

कर्ली आयर्निंगशिवाय बनवा सोप्या पद्धतीने वेव्ही हेअरस्टाईल

वेव्ही हेअरस्टाईल (Wavy Hairstyle) सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्रींपासून ते अगदी सामान्य मुलींपर्यंत ही स्टाईल प्रत्येकाला आवडताना दिसत आहे. कोणत्याही आऊटफिटसह ही हेअरस्टाईल तुम्ही कॅरी करू शकता. पण बऱ्याचदा वेव्ही हेअरस्टाईल करण्यासाठी कर्लिंग आयर्नचा वापर केला जातो. पण यामुळे केसांना नक्कीच हानी पोहचते. तुम्ही सतत या कर्लिंग आयर्नचा वापर करू शकत नाही. पण तरीही तुम्हाला याचा वापर न करता अर्थात कर्लिंग आयर्न न वापरता वेव्ही हेअरस्टाईल करायची असेल तर त्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. वेव्ही हेअरस्टाईल करण्यासाठी बऱ्याचदा स्टायलिंग टूलचा वापर करण्यात येतो असं आपण पाहिलं आहे. पण या स्टायलिंग टूलच्या हिटने केस खराब होतात. तुटतात आणि रफही होतात. मग यापासून आपल्याला जर आपल्या केसांना वाचवायचे असेल तर हिटशिवायदेखील तुम्हाला नक्कीच तुमच्या केसांची अशी स्टाईल करता येते. त्यासाठी तुम्हाला आम्ही खाली ज्या काही स्टेप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतील. मग वाट कसली पाहताय. हा लेख वाचा आणि लगेचच केसांची वेव्ही स्टाईल करायला घ्या. या पद्धतीने तुम्ही वेव्ही हेअरस्टाईल केल्यास, तुमच्या केसांना नैसर्गिक वेव्ह येतात आणि केसही मुलायम राहतात. तुम्ही कोणत्याही कपड्यांवर ही स्टाईल करून तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. जाणून घेऊया कशा आहेत याच्या स्टेप्स.

कशी कराल वेव्ही हेअरस्टाईल

Freepik.com

Beauty

Manish Malhotra Cinnamon Ginger Night Gel

INR 945 AT MyGlamm

स्टेप 1 - वेव्ही हेअरस्टाईलसाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही मोठ्या दातांच्या फणीचा वापर करा. व्यवस्थित केसांचा गुंता सोडवून घ्या. ज्यामुळे तुमचे केस व्यवस्थित स्मूथ झालेले दिसतील

स्टेप 2 - त्यानंतर केसांना मधून भांग पाडून घ्या. त्यासाठी तुम्ही रॅट टेल कंगव्याचा उपयोग करा.  बाजारामध्ये तुम्हाला हा कंगवा सहज मिळेल. या कंगव्याने व्यवस्थित आणि उत्तमरित्या तुम्ही केसांंचा भांग पाडून घेऊ शकता 

स्टेप 3 - एका बाजूचे केस घ्या आणि ते केस ट्विस्ट करून तुम्ही त्याला रबर लावा. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूच्या केसांनाही ट्विस्ट करून रबर लावा. यासाठी हेअर स्प्रे वापरायचीही गरज भासत नाही.

स्टेप 4 - जेव्हा तुम्ही दोन्ही बाजूच्या केसांना ट्विस्ट करल तेव्हा रबर लावा आणि हे केस व्यवस्थित सुरक्षित ठेवा.  त्यानंतर दोन्ही बाजूला ट्विस्ट करा आणि आपल्या हनुवटीच्या समोर दोन्ही बाजू घ्या आणि मग एकत्र इलास्टिकने बांधा. त्यानंतर तुम्ही रात्री झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही हे केसांचे रबर काढाल तेव्हा तुमचे  केस तुम्हाला अगदी मऊ आणि मुलायम वेव्ही झालेले दिसून येतील. अगदी स्टायलिंग टूलचा वापर केल्याप्रमाणेच हे केस तुम्हाला दिसतील. 

तुम्हाला इतर कोणत्याही वेगळ्या गोष्टींची गरज नाही.  मात्र लक्षात ठेवा की, ही स्टाईल करण्यासाठी तुम्ही रात्रीचीच वेळ निवडा.  कारण रात्रभर हे केस व्यवस्थित बांधून राहिल्याने त्याला योग्य आकार मिळतो. या केसांना पाणी अथवा कोणतेही जेल लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे केसांना व्यवस्थित हवा तसा वेव्ह येऊ शकणार नाही. काही जणींना जेल लावल्यानंतर वेव्ह येतील असं वाटतं. तसंच ओल्या केसांवर आयर्निंग करायची काही जणांना सवय असते. पण तसं अजिबात करू नका. तुम्हाला नैसर्गिकरित्या वेव्ही हेअरस्टाईल हवी असेल तर तुम्ही हीच पद्धत वापरा आणि सोप्या पद्धतीने मिळवा अप्रतिम वेव्ही हेअरस्टाईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक