ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
मिरची चावल्यास झाली तोंडाची जळजळ, तर करा त्वरीत उपाय

मिरची चावल्यास झाली तोंडाची जळजळ, तर करा त्वरीत उपाय

बऱ्याचदा तिखट आणि मसालेदार खाल्ल्यानंतर तोंडामध्ये एक प्रकारची जळजळ होते आणि हा तिखटपणा पटकन कमी होत नाही. विशेषतः जेवणातील मिरची पटकन चावली गेली तर अशी अवस्था होते. अशा परिस्थितीत तोंडाचा तिखटपणा आणि जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय पटकन करू शकता. या सोप्या टिप्स तुम्ही केल्यात तर तुम्हाला यातून पटकन सुटका मिळू शकते. नक्की कशाचा आणि कसा वापर करायचा ते आपण पाहूया.

टॉमेटो आणि लिंबू

टॉमेटो आणि लिंबू

Shutterstock

तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल की टॉमेटो आणि लिंबू ही मिरचीची अथवा तिखटपणाची जळजळ कशी काय मिटवू शकतात. पण याचा वैज्ञानिक आधार आहे. मसाल्याची अॅसिडिटी या एल्कालाईन फूड्समुळे निष्प्रभावी होतात. तुम्हाला जर त्वरीत जळजळीपासून सुटका मिळवायची असेल तर टॉमेटो चावून कावा. संत्र, अननस आणि लिंबाच्या रसात समान गुण असतात. त्यामुळे तुम्ही याचेही सेवन करू शकता. अन्यथा तुम्ही टॉमेटोच्या रसाचा उपयोग करून गुळण्याही करू शकता. यामुळे तुमच्या जिभेला लागलेला तिखटाचा चटका पटकन कमी होण्यास मदत मिळते. टॉमेटो अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरतो.

ADVERTISEMENT

मध, गुळ आणि साखर

मध, गुळ आणि साखर

Shutterstock

तुमच्याकडे शुगर क्यूब्स असतील तर तुम्ही पटकन साखरेचा हा खडा तोंडात घालावा. घरात प्रत्येकाच्या मध, साखर आणि गुळ उपलब्ध असतात. यापैकी काहीही तुम्ही पटकन तोंडात चघळा. यामुळे जिभेचा तिखटपणा कमी करण्यास फायदा मिळतो. तसंच तुम्हाला हाताशी हे पदार्थ पटकन मिळतात. अन्य गोष्टींप्रमाणे शोधावे लागत नाहीत. अगदी पटकन स्वयंपाकघरात मिळणारे हे पदार्थ असल्याने तुम्हाला मिरचीच्या जळजळीपासून पटकन सुटका मिळवून देतात.

स्टार्च

स्टार्च

ADVERTISEMENT

freepik.com

स्टार्च हे कॅप्साइसिन आणि तुमच्या तोंडाच्या दरम्यान एक नैसर्गिक बाधा निर्माण करते. तोंडात जळजळ होण्याच्या या प्रक्रियेला थांबविण्याचे काम करते. तांदूळ, बटाटा आणि ब्रेड या तीन पदार्थांमध्ये स्टार्च असते. तसंच या तिनही पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. तुमच्याद्वारे खाण्यात आलेल्या मिरचीपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा वापर करून घेऊ शकता. पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात टाकू शकता अथवा तुम्ही भात खाऊ शकता. यामुळे मिरचीचा तिखटपणा त्वरीत कमी होतो. 

दूध अथवा दही

दूध अथवा दही

Shutterstock

ADVERTISEMENT

दूध आणि दही हे दोन्ही पदार्थ एखाद्या जादूप्रमाणे काम करतात. तोंडाची जळजळ दूर करण्यासाठी थंड दूध अथवा एक चमचा दही खाल्ल्याने त्वरीत आराम मिळतो. तिखट पदार्थामध्ये  कॅप्साइसिन असते ज्यामुळे तोंडाची जळजळ होते. दूध आणि  दह्यामध्ये कॅसिइन नावाचे प्रोटीन असून कॅप्साइसिनचा त्रास कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे कोणताही पदार्थ तिखट लागल्यावर त्वरीत एक चमचा दही खाण्याचा सल्लाही मोठ्या व्यक्तींंकडून देण्यात येतो. तसंच तिखट पदार्थाने घशात होणारी जळजळ ही थंड दुधाने पटकन थांबते. त्यामुळे  कधीही मिरची अथवा तिखट पदार्थाने त्रास होत असल्यास सर्वात पहिल्यादा दही अथवा दुधाचा वापर करावा.  भेसळयुक्त दूध मात्र टाळा.

 

फ्रीजमधील थंड पाणी वा बर्फ तोंडात ठेवणे

फ्रीजमधील थंड पाणी वा बर्फ तोंडात ठेवणे

Shutterstock

ADVERTISEMENT

मिरची खाल्ल्यानंतर त्वरीत तुम्ही थंड पाणी प्यायलात अथवा  तुमच्या फ्रीजमध्ये बर्फ असेल तर तुम्ही पटकन बर्फाचा तुकडा तोंडात धरल्यास, तुमच्या जिभेची जळजळ त्वरीत थांबते. हादेखील एक सोपा उपाय आहे.  काही वेळ बर्फाचा तुकडा असाच तोंडात तुम्ही धरून ठेवा.  जेणेकरून तुमच्या जिभेला तिखटपणाचा चटका जाणवणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

08 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT