केसांसाठी आहे फायदेशीर आहे अंड्याचं तेल, असा करा वापर

केसांसाठी आहे फायदेशीर आहे अंड्याचं तेल, असा करा वापर

केसांसाठी आजवर तुम्ही अनेक हेअर ऑईल वापरली असतील. शिवाय आहारातही अनेक खाद्यतेलांचा वापर केला असेल मात्र तुम्ही कधी अंड्याचे तेल वापरले आहे का? नसेल तर ही माहिती अवश्य वाचा कारण अंड्याचे तेल तुमच्या केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. अंड्यांच्या तेलात नारळाचे तेल, बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल यांचाही समावेश असल्यामुळे ते तुमच्या केसांसाठी एक बहुगुणी औषध ठरू शकते. शिवाय या तेलात अंड्याचे प्रोटिन्स असल्यामुळे तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होतात. यासाठीच घरच्या घरी हे हेअर टॉनिक तयार करा आणि केसांच्या समस्या दूर करा. यासाठी जाणून घ्या अंड्याचे तेल कसे तयार करावे, कसे वापरावे आणि त्याचे फायदे काय काय आहेत. 

अंड्याचे तेल कसे तयार करतात

अंड्याचे तेल बनवण्यासाठी अंड्याचा पिवळा बलक वेगळा करावा आणि त्यात तुमच्या आवडीची तेल मिसळावी. अंड्याचा हा पिवळा बलक केसांसाठी फायदेशीर ठरतो. यात कोलेस्ट्रॉल, फॉस्फोलिपीडस, ट्रायग्लिसराईड भरपूर असतात. यातील ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटि अॅसिड आणि पॉलि सॅच्युरेटेड अॅसिडमुळे केस आणि स्काल्प निरोगी होतो. बाजारात विविध प्रकारचे अंड्याचे हेअर ऑईल विकत मिळते. अंड्याचे तेल घरी तयार करण्यासाठी दोन ते तीन उकडलेला अंड्याचा  पिवळा बलक  घ्या. तो शिजवून त्यापासून तेल काढून घ्या.  त्यामध्ये चमचाभर नारळाचे तेल, एक चमचा बदामाचे तेल, एक चमचा ऑलिव्ह तेल मिसळा आणि एकजीव करा. हे तेल तुम्ही  तुमच्या केसांसाठी नियमित वापरू शकता. 

shutterstock

अंड्याच्या तेलाचे फायदे

अंड्याच्या तेलात प्रोटिन्स असतात ज्यामुळे केसांच्या मुळांना मजबूती मिळते. सफेद केस काळे करण्यासाठी, केसांची चमक वाढवण्यासाठी, केस गळणे थांबावे यासाठी तुम्ही अंड्याचे तेल केसांवर वापरू शकता. 

पांढरे केस कमी होतात

केस पांढरे  होणं ही समस्या आजकाल अनेकांना जाणवत आहे. जर तुमचे केस वयाआधीच पांढरे होत असतील तर अंड्याचे तेल तुम्ही केसांसाठी वापरू शकता. कारण अंड्याचे तेल जर तुम्ही नियमित केसांवर लावलं तर पांढरे केस काळे होतात. या तेलामुळे तुमच्या स्काल्पला पुरेसा ऑक्सिजन मिळतो शिवाय केसांची मुळे मजबूत होतात. केसांचे योग्य पोषण झाल्यामुळे केस पांढरे होणे थांबते आणि केस काळे दिसू लागतात. तरूणपणी केस पांढरे होण्याच्या समस्येवर हा एक चांगला उपाय आहे.

केसांचा गुंता कमी होतो

जर तुमचे केस फ्रिझी अथवा गुंतलेले असतील तर ते निस्तेज आणि कोरडे दिसतात. अशा निस्तेज आणि फ्रिझी केसांसाठी अंड्याचे तेल फायदेशीर ठरते कारण या तेलात कोलेस्ट्रॉल असते. ज्यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळते. या तेलामुळे तुमच्या कोरड्या, निस्तेज केसांना मऊ आणि मुलायमपणा येतो. शिवाय केसांची मुळं मजबूत होतात आणि तुमचे केस सिल्की आणि शाईनीदेखील होतात.

केस हायड्रेट राहण्यास मदत होते

केस कोरडे होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केसांना पोषण न मिळते आणि बाहेरील वातावरणाचा केसांवर परिणाम होणे हे आहे. अंड्याच्या तेलात अॅंटि ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे त्यातील काही विशिष्ठ घटकांमुळे केसांचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. याचा केसांवर परिणाम असा होतो की केसांच्या समस्या हळू हळू कमी होतात. केस हायड्रेट राहिल्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते आणि केस लांब आणि घनदाट होतात. 

shutterstock