त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहेत आवळ्याच्या बिया, असा करा वापर

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहेत आवळ्याच्या बिया, असा करा वापर

आवळा आरोग्यासाठी उत्तम असतो हे तर तुम्हाला माहीत असेलच. ज्यामुळे आयुर्वेदात अनेक आरोग्य समस्यांवर आवळा खाण्याचा उपाय सांगितला जातो. आवळ्यात भरपूर अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे आवळा खाण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय आवळ्यात कॅल्शिअम, बीटा कॅरोटीन, लोह, फायबर्स, प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन  ए, बी, सीदेखील असतं. ज्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला फायदा होतो. आवळ्याची पान, फळं,मुळं याप्रमाणेच फळांमधील बी देखील आरोग्यासाठी लाभदायक असते. आवळ्याप्रमाणेच आवळ्याच्या बियांचाही अनेक आरोग्य समस्यांवर उपाय करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. यासाठीच जाणून घ्या फायदे

त्वचा होते चमकदार

आवळा खाण्याने तुमची प्रतिकार शक्ती वाढते, रक्त शुद्ध होतं, शरीर डिटॉक्स होतं ज्यामुळे तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम दिसू लागतो. यासोतबतच आवळ्याच्या बियांची पावडरही तुम्ही तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी वापरू शकता. कारण या पावडरचा फेसपॅक लावण्यामुळे तुमच्या त्वचेची खाज, अॅलर्जी कमी होते. आवळ्याच्या बियांची पावडर नारळाच्या तेलात मिक्स करून त्वचेवर लावण्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या बऱ्या होऊ शकतात. एवढंच नाही तर यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने चमकदारही होते.

केस मजबूत होतात

त्वचेप्रमाणे आवळ्याच्या बियांची पावडर तुम्ही हेअर मास्कसाठी वापरू शकता. कारण आवळ्यामधील व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटकांमुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात. केस गळणे, फाटे फुटणे, केस निस्तेज होणे, केस पांढरे होणे, कोंडा अशा केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आवळ्याच्या बिया उपयुक्त ठरतात. यासाठीच आवळ्याच्या बिया सुकवून त्याची पावडर तयार करा आणि हेअर ऑईलमध्ये मिसळून ती केसांमध्ये एखाद्या हेअर मास्कप्रमाणे वापरा. ज्यामुळे काहीच दिवसांमध्ये तुमचे केस मजबूत आणि सिल्की दिसू लागतील. 

पित्तापासून आराम मिळतो

आयुर्वेदानुसार आवळा पित्त दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी तुम्ही आवळ्याच्या बियांची पावडर ताप अथवा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी वापरू शकता. यासाठी आवळ्याची पावडर पाण्यात टाकून प्या. हे पाणी पिल्यास घशाला लागलेली कोरड कमी होते. रोग प्रतिकारशक्ती वाढते, सर्दी , खोकला होत नाही आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.

मूत्राशयाचे खडे कमी होतात

काही संशोधनानुसार आवळ्याच्या बियांची पावडर किडनी, पित्त अथवा मू्त्राशयात होणारे खडे कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या पावडरचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावरच चांगला परिणाम होतो. विशेष म्हणजे मूत्राशयाच्या खड्यांमुळ जर तुम्ही हैराण झाला असाल तर आवळ्याच्या बियांचे पाणी प्या. ज्यामुळे मू्त्राशयाचे खडे विरघळतील आणि तुम्हाला आराम मिळेल. 

डोळ्यांसाठी आहे फायदेशीर

आजकाल वयोमानानुसार येणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांप्रमाणेच लहानपणी अथवा तरूणपणी डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे. याला कारण आधुनिक आणि डिजिटल युगात वाढत चाललेला मोबाईल अथवा लॅपटॉपचा वापर असू शकतो. स्क्रिनमधून येणाऱ्या लाईटचा डोळ्यांवर घातक परिणाम होऊ शकतो. मात्र जर तुम्ही नियमित आवळ्याच्या बिया सुकवून वाटलेली पावडर पाण्यासोबत घेतली तर तुमच्या डोळ्यांच्या समस्या कमी होऊ शकतात. आवळ्याचा रसही घरगुती उपचारासाठी डोळ्यात टाकतात. मात्र असं करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

Beauty

Molten Matte Liquid Lipstick- Bia

INR 645 AT MyGlamm