रामनवमीनंतर चैत्रपौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. या दिवशी बजरंग बली हनुमानाचा जन्म झाला होता. भारतात या दिवशी मारूती रायाच्या मंदिरात मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा आणि जन्मोत्सव साजरा केला जातो. रामनवमी नंतर हनुमान जयंती येते. यंदा 27 एप्रिल 2021 रोजी हनुमान जयंती आहे. अशा या पवित्र आणि शुभ दिवशी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मेजेस आणि शुभेच्छा देण्यासाठी मारूतीरायाचे शुभेच्छा संदेश पाठवले जातात. यासाठीच आम्ही देखील तुमच्यासोबत अशाच काही हनुमानजयंतीसाठी मराठीतून भक्तिपूर्ण शुभेच्छा (hanuman jayanti wishes in marathi) शेअर करत आहोत.
हनुमान जयंतीनिमित्त जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे शुभेच्छा संदेश तुमच्या नक्कीच उपयोगाचे आहेत
१. भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
२. रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरी... हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा
३. अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान...एक मुखाने बोला... जय जय हनुमान...हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
४. पवनतनय संकट हरन, मंगल मूर्त रूप राम लखन, सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
५. राम लक्ष्मण जानकी... जय बोलो हनुमान की... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
६. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाला हनुमान जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
७. चरण शरण में आयें के धरू, तिहारो ध्यान, संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
८. प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
९. भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
१०. ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
याचप्रमाणे अक्षयतृतीयेला द्या हे शुभेच्छा संदेश
हनुमान जयंतीला व्हॉटसअपवर मेसेज पाठवण्यासाठी हे काही शुभेच्छा संदेश तुम्ही नक्कीच वापरू शकता.
१. अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली, अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम... हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा (hanuman jayanti shubhechha in marathi)
२. रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम... अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
३. सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
४. ध्वजांगे उचली बाहो, आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळरूद्राग्नी देखता कापती भये... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
५. बोला बजरंगबली की जय, बोला रामभक्त हनुमान की जय... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
६. पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारूती रायाचा विजय असो... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
७. सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
८. भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
९. मनोजवं मारूततुल्य वेगं जितेद्रिंयं बुद्धिमतां वरिष्ठम् ... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
१०. मारूतीरायाच्या जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभकामना
त्याचप्रमाणे वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा संदेश
हनुमान जयंतीसाठी सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यासाठी हे संदेश परफेक्ट आहेत.
१. जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।।
२. कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे, मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें
३. अंजनीसूत, पवनपुत्र श्री बजरंग बली की जय
४. श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
५. लंका जाळून सीता मातेला सोडवली, रामभक्त जय जय बजरंग बली... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
६. जय जय बजरंग बली, तोड दुश्मन की नली... हॅपी हनुमान जयंती
७. मुखी राम नाम जपी, योगी बलवान लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान, आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान, ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
८. महारूद्र अवतार हा सुर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला, नमस्कार माझा तया मारूती रायाला.. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
९. भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही, नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
१०. जर तुमचे मन शांत असेल तर तुमच्या मनासारखा बलवान कोणीही नाही कारण खरी शक्ती शरीर नाही तर मन लावत असतं... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
हनुमान जयंतीनिमित्त पूजाअर्चा करण्यासाठी आणि हनुमानाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आरती आणि स्तोत्र
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ||
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ||
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी || १ ||
जय देव जय देव जय हनुमंता ||
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता || जय || धृ ||
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ||
थरथरिला धरणीधर मानीला खेद ||
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ||
रामी रामदासा शक्तपचा शोध ||
जय देव जय देव जय हनुमंता || २ ||
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा| पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम॥