तहानच नाही या कारणांमुळेही पडू शकते घशाला कोरड, जाणून घ्या कारण

तहानच नाही या कारणांमुळेही पडू शकते घशाला कोरड, जाणून घ्या कारण

शारीरिक कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. जेव्हा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. पाणी आणि पेयांद्वारे शरीराला पुरेसे पाणी मिळत असतं. शरीर डिहाड्रेट झालं की तोंड आणि घशाला कोरड पडते. शरीरावर हिडायड्रेशनचे अनेक दुष्परिणाम होतात. मात्र फक्त तहान लागल्यावर अथवा  डिहायड्रेशन झाल्यावरच घसा कोरडा होतो असं नाही तर या व्यतिरिरक्तही अशी अनेक कारणं आहेच ज्यामुळे तुमचा घसा कोरडा पडू शकतो. 

घसा कोरडा पडण्यामागची कारणं

घसा अथवा तोंड कोरडं पडण्याची अनेक कारणं आहेत. यासाठी जाणून घ्या कोणकोणत्या कारणांमुळे तुमच्या घशाला कोरड पडू शकते. 

 • डिहाड्रेशनमुळे तुमचा घसा कोरडा पडू शकतो
 • जर तुम्ही डोकं अथवा मानेशी संबधित एखादी थेरपी घेत असाल तर तुमच्या घशाला कोरड पडू शकतो. कारण या थेरपीमुळे तुमच्या लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर दुष्परिणाम होतो
 • लाळ निर्माण करणाऱ्या नसांमध्ये समस्या झाली तर त्यामुळे त्यांचे  कार्य बिघडते आणि तोंड सुकते
 • किमो थेरपीचा एक दुष्परिणाम म्हणजे घशाला कोरड पडणे. कारण यामुळे लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे नुकसान होते.
 • ऑटो इम्युन सिस्टिमध्ये समस्या, एचआयव्ही एड्स, मधुमेह, अल्झायमर अशा आजारपणात घशाला कोरड पडण्याची शक्यता असते.
 • ट्यूमर अथवा एखाद्या इनफेक्शनमुळे तुमच्या घशाला कोरड पडू शकते.
 • तंबाखू, ड्र्ग्ज, दारूच्या आहारी लोकांच्या तोंडाला घशाला कोरड पडण्याचा त्रास होऊ शकतो

घशाला कोरड पडण्याची लक्षणे

घशाला कोरड पडण्याची समस्या असेल तर यामुळे तुम्हाला  ही काही लक्षणे जाणवू शकतात

 • सतत ओठ कोरडे पडून फुटणे
 • तोंडाची चव जाणे
 • घसा खवखवणे
 • जीभ सुकणे आणि खरखरीत होणे
 • सतत तहान लागल्यासारखं वाटणे
 • घसा कोरडा झाल्यामुळे बोलण्यास त्रास होणे
 • तोंडात जळजळ होणे
 • तोंडात झिणझिण्या येणे
 • अन्न चावणे आणि गिळणे या क्रिया करता न येणे
 • तोंड येणे

घशाला कोरड पडली असेल तर करा हे घरगुती उपाय

जर तुमच्या तोंडाला सतत कोरड पडत असेले तर त्याचे कारण जाणून घ्या आणि हे काही घरगुती उपचार करा

आलं

आल्याचा रस घशाच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरतो. यासाठी एक आल्याचा तुकडा बारीक चिरून घ्या. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा आणि त्यामध्ये आल्याचे तुकडे अथवा आलं किसून टाका. पाणी चांगलं उकळल्यावर ते गाळून घ्या आणि त्यामध्ये चमचाभर मध मिसळा. घशाला कोरड पडल्यावर हे  पाणी सतत प्यायल्यामुळे तुम्हाला चांगला आराम मिळू शकतो. याशिवाय आलं नुकतंच मीठ लावून चावणे आणि त्याचा रस पोटात घेतल्यामुळे तुमच्या घशाच्या समस्या कमी होऊ शकतात. आल्यामध्ये लाळ ग्रंथीना प्रोत्साहन देणाऱे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचं घसा कोरडा होण्याची समस्या लवकर बरी होते. 

shutterstock

ग्रीन टी -

ग्रीन टी पिण्यामुळे तुमच्या घशाला कोरड पडण्याच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. यासाठी गरम पाण्यात ग्रीन टीचे पाऊच बुडवा आणि तुम्हाला हवी तशी ग्रीन टी बनवून घ्या. या ग्रीन टी मध्ये मध मिसळा आणि गरम गरम ग्रीन टीने घसा शेकवा. ग्रीन टीमध्ये पॉलीफॅनॉल्स, अॅंटि ऑक्सिडंट आणि अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचा घसा कोरडा पडणे कमी होऊ शकते. मात्र यासाठी अती प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करू नका. दिवसभरात एक ते दोन कप ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. 

shutterstock

बडीसोप -

भारतीय खाद्यसंस्कृतीत जेवणानंतर मुखवास म्हणून बडीसोप खाण्याची प्रथा आाहे. जेवणानंतर बडीसोप खाण्यामुळे तुमचा घसा कोरडा पडणे कमी होऊ शकते. बडीसोपमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते. ज्यामुळे तुमच्या तोंडात ताळ निर्माण होण्याचे प्रमाण वाढते. सहाजिकच यामुळे घशाला कोरड पडण्याची समस्या  कमी होते. यासाठीच जेवणानंतर नियमित थोड्या प्रमाणात बडीसोपचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक