परमनंन्ट हेअर कलर हटवा घरच्या घरी, सोपे उपाय आणि ट्रिक्स

 परमनंन्ट हेअर कलर हटवा घरच्या घरी, सोपे उपाय आणि ट्रिक्स

केसांना कलर देण्याचा सध्या ट्रेंडचा आला आहे.. कधी कधी केसांना स्टायलिश लुक केल्यानंतर उबग येतो. कलर केल्यावर कधीतरी आवडतही नाही. परमनंन्ट कलर करताना अगदी उत्साहात केला जातो. पण काही काळानंतर त्यांचा कंटाळा येतो. पण मग असा रंग पटकन निघून जात नाही. मग अशावेळी नक्की काय करायचं असा प्रश्न पडतो. केसांचा रंग काढण्यासाठी अत्यंत महागडे ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करण्यात येतो. तुम्ही जर नुकताच केसांना कलर केला असेल आणि तुम्हाला तो आवडला नसेल तर तुम्ही पार्लरमध्ये पुन्हा खर्च न करता नैसर्गिक गोष्टींचा वापर करूनही केसांचा हा रंग काढून टाकू शकता. घरगुती उपाय वापरल्याने कोणताही वाईट परिणामही होत नाही. परमनंन्ट हेअर कलर घालवायचा असेल तर तुम्ही आम्ही या लेखात सांगितलेले घरगुती उपाय करू शकता. या गोष्टी योग्य पद्धतीने कशा वापरायच्या याबद्दलही तुम्हाला या लेखातून माहिती आम्ही देत आहोत.

अॅपल साईड व्हिनेगर

Shutterstock

केसांंचा परमनंन्ट कलर घालविण्यासाठी तुम्ही अॅपल साईड व्हिनेगरचा उपयोग करून घेऊ शकता. अॅपल साईडी व्हिनेगरमधील अॅसिड स्काल्पचे नुकसान न करता केसांमधील कलर काढून टाकतो. त्याचा कसा वापर करायचा हे जाणून घेऊया.

वापरण्याची पद्धत 

4 चमचे अॅप्पल साईड व्हिनेगर घ्या. त्यामध्ये  एक कप पाणी मिक्स करा. त्यानंतर हे मिक्स्चर तुम्ही केसांना लावा. 15 मिनिट्स शॉवर कॅप घालून केसांना झाकून ठेवा.  त्यानंतर माईल्ड शँपूने केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही केसांवर हा प्रयोग करू शकता. 

कलर हेअरची स्टाईल टिकवण्यासाठी वापरा 'हे' 15 बेस्ट शॅम्पू (Best Shampoo For Colored Hair)

बेकिंग सोडा

Shutterstock

सुंदर आणि स्टायलिश लुकसाठी मुली ट्रेंडी आऊटफिटसह ट्रेंडी हेअर कलरही करून घेतात. हेअर कलर केल्यानंतर बऱ्याचदा हा रंग आपल्यावर चांगला दिसत नाही असंही मुलींंना वाटतं. मग त्यानंतर हा केसांचा रंग काढायचा कसा असाही पेच समोर निर्माण होतो. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी बेकिंग सोड्याचा वापर करून घेऊ शकता. बेकिंग सोड्याचा वापर डाग काढण्यासाठी सहसा केला जातो. त्यामुळे केसांचा रंग काढण्यासाठीही याचा उपयोग होतो. अँटिडँड्रफ शँपूमध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. शँपूमध्ये सेलिनिअम सल्फाईड असते जे केसांचा रंग फिका करण्यासाठी उपयोगी ठरते. बेकिंग सोड्यामुळे केसांचा रंग निघून जाण्यास मदत मिळते. 

वापरायची पद्धत 

बेकिंग सोडा आणि अँटिडँड्रफ शँपू एकत्र मिक्स करा.  त्यानंतर केसांना लावा. 5 मिनिट्सनंतर हलक्या कोमट पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोन वेळा केसांना हे मिश्रण लावा. यामुळे तुमच्या केसांचा रंग फिका होईल. तसंच लवकरात लवकर हा रंग जाण्यास तुमची मदत होईल.

हेअर टाईप बघून निवडा हेअर मास्क, मिळवा बाऊन्सी आणि चमकदार केस

ऑलिव्ह ऑईल

Shutterstock

ऑलिव्ह ऑईलचा वापर करून केसांची काळजी घेता येते.  ऑलिव्ह ऑईलचा वापर तुम्ही परमनंन्ट हेअर कलर काढण्यासाठी आणि कलर फिका करण्यासाठी करता येतो.  

वापरण्याची पद्धत 

एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन ते गरम करा.  आपल्या हातांनी केसांचे मालिश करा. त्यानंतर केस शॉवर कॅपने झाकून घ्या.  अर्धा तास तसंच ठेवा आणि मग केस धुवा. यामुळे तुमच्या केसांना रंग निघण्यास  मदत  मिळते. तसंच लवकरात लवकर तुम्ही परमनंन्ट कलर काढू शकता. 

ग्लोबल हेअर कलर म्हणजे काय आणि तो कोणी करावा?

विटामिन सी

Beauty

WIPEOUT Sanitizing Wipes 25 Wipes Pack

INR 159 AT MyGlamm

बऱ्याचदा हेअर कलर करण्यापेक्षा हेअर कलर काढण्यासाठी जास्त पैसे घालवावे लागतात.  पण तुम्हाला जर घरच्या घरी याचा उपाय करायचा असेल तर तुम्ही विटामिन सी चा वापर करून घेऊ शकता. विटामिन सी हे केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. 

वापरण्याची पद्धत 

गरम पाण्यामध्ये विटामिन सी च्या गोळ्या घाला. त्यानंतर आपल्या केसांना हे लावा. केसांना शॉवर कॅपने कव्हर करा. एका तासाने माईल्ड शँपू केसांना लावा आणि धुवा.  आठवड्यातून एक वेळा तुम्ही विटामिन सी च्या गोळ्यांचा वापर करू शकता. यामुळे तुमचा हेअर कलर निघून जाईल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक