मेकअपसाठी असा करा कॉटन बड्सचा वापर

मेकअपसाठी असा करा कॉटन बड्सचा वापर

कॉटन बड्सचा वापर कान स्वच्छ करण्यासाठी अथवा कानात येणारी खाज कमी करण्यासाठी केला जातो. मात्र या व्यतिरिक्त मेकअप आणि ब्युटीसाठीही तुम्हाला या कॉटन बड्सचा वापर करता येतो. प्रत्येकाच्या घरात कॉटन बड्सचा पॅक असतोच. मेकअप किटमधील एखाद्या मिनी टुल प्रमाणे तुम्ही त्याचा वापरू शकता. याचं कारण असं की कॉटन बड्स अगदी मऊ आणि  निमुळते असतात. ज्यामुळे त्याच्या मदतीने तुम्हाला डोळे आणि ओठांकडील कडांचा मेकअप करणं सोपं जातं. परफेक्ट मेकअप करण्यासाठी या कॉटन बड्सचा नेमका कसा वापर करावा हे या टिप्समधून जाणून घ्या. शिवाय सोबत जाणून घ्या काही मेकअप हॅक्स ज्या तुम्ही कोणत्याही वेळी सहज करू शकता. 

आय मेकअप करताना

डोळे आणि डोळ्यांजवळील त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. जेव्हा तुम्ही डोळ्यांना मेकअप करताना तेव्हा आपसूक तुमची त्वचा ताणली जाते. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली सुरकुत्या पडू शकतात. यासाठीच डोळ्यांना आय क्रिम लावताना, काजळ लावताना, आयशॅडो अथवा हायलायटर लावण्यासाठी तुम्ही कॉटन बड्सचा वापर करू शकता. जर बाहेर असताना तुम्हाला अचानक आयमेकअप टच करायचा असेल आणि तुमच्याजवळ मेकअपचे ब्रश नसतील तर पर्समध्ये एक, दोन कॉटन बड्स अवश्य ठेवा. कॉटन बडस् कॅरी करण्यासाठी सोयीचे असतात. कारण ते तुमच्या छोट्याशा पर्समध्ये मावतात आणि वेळ पडल्यावर उपयुक्त ठरतात.

 

केसांना तेल लावण्यासाठी

केस गळण्याची समस्या असेल तर केसांच्या मुळांना तेलाने मालिश करणं गरजेचं आहे. मात्र जेव्हा तुम्ही हातच्या बोटांनी केसांना तेल लावता तेव्हा ते केसांच्या मुळांपर्यंत पोहचत नाही. यासाठी कॉटन बड्सच्या मदतीने केसांच्या मुळांना तेल लावा. असं केल्यामुळे प्रत्येक केसांच्या मुळांपर्यंत तेल लागेल आणि ते केसांमध्ये व्यवस्थित मुरेल. अशा प्रकारे तेल केसांना लावल्यास केस गळण्याची समस्या आपोआप कमी होईल. 

डोळे हायलाईट करण्यासाठी

डोळे हायलाईट करण्यासाठी आय मेकअपमध्ये योग्य पद्धतीने हायलायटरचा वापर करायला हवा. डोळ्यांच्या कोपऱ्यात हायलायटर लावण्यामुळे डोळे अधिक छान दिसतात. मात्र त्या कोपऱ्यावर हायलायटर लावताना ते डोळ्यांमध्ये जाण्याची शक्यता असते. डोळ्यांमध्ये मेकअप प्रॉडक्ट जाणं टाळायचं असेल तर यासाठी कॉटन बड्सचा वापर करा. तुम्ही तुमच्या नाकाच्या शेंड्यावरही या पद्धतीने हायलायटर लावू शकता. 

आयब्रोजनां शेप देण्यासाठी

कॉटन बड्सचा वापर आयब्रोजनां शेप देण्यासाठी नक्कीच करता येईल. यासाठी तुमच्या आयब्रोजच्या रंगानुसार शेड निवडा आणि आयब्रो पावडर कॉटन बड्सवर लावून ती तुमच्या आयब्रोजवर लावा. आयब्रोजमध्ये असलेली विरळ जागा कॉटन बड्सचा वापर करून रंगवा.

मेकअप सेट करण्यासाठी

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मेकअप बॅलंस करायला तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. अशा त्वचेवर मेकअप पटकन सेट होत नाही. तुम्ही यासाठी कॉटन बड्सचा वापर करू शकता. कन्सिलर, फांऊंडेशनच्या मध्ये पडलेल्या रेषा तुम्ही कॉटन बड्सने भरून काढू शकता. ज्यामुळे तुमचा मेकअप सेट होईल आणि चेहरा एकसमान दिसेल. 

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm