ब्रेस्ट साईज असेल मोठी तर टाळा ‘ब्रा’संदर्भातील या चुका

ब्रेस्ट साईज असेल मोठी तर टाळा ‘ब्रा’संदर्भातील या चुका

ब्रेस्ट साईज ही स्त्रियांच्या सौंदर्यातील एक महत्वाचा भाग आहे. स्तनांचा आकार चांगला असेल तर तुमची पर्सनॅलिटी नक्कीच चांगली दिसते. पण जर तोच आकार फार मोठा असेल तर अशा मोठ्या ब्रेस्ट साईजचाही खूप जणांना कंटाळा येतो. स्तनांचा आकार मोठा असेल तर अशांना कपड्यांची निवड योग्य करणे फारच गरजेचे असते. विशेषत: इनरवेअरचा विचार करता ब्रेस्ट साईज मोठी असेल तर अशांनी इनरवेअरचे काही प्रकार टाळणे फारच गरजेचे असते. तुमच्याही स्तनांचा आकार मोठा असेल तर तुम्ही इनरवेअर निवडताना या चुका टाळायला हव्यात.

जाड दिसायचे नसेल तर अशी असावी कपड्यांची फिटिंग

बारीक पट्टे

बरेचदा शरीर बारीक आणि ब्रेस्ट साईज मोठी असेही अनेकांचे शरीर असते. जर ब्रेस्ट साईज मोठी असेल तर त्याचा संपूर्ण भार हा ब्रावर जातो. प्रत्येकाच्या स्तनांना नैसर्गिक उभारी नसते. त्यामुळे अशांसाठी योग्य ब्रा निवडणे गरजेचे असते. ब्रामध्ये अनेक प्रकार असतात. बारीक पट्टयांच्या ब्रा या अनेकांना आवडतात. पण स्तनांचा आकार मोठा असेल तर बारीक पट्ट्यांची ब्रा मुळीच निवडू नये. असे बारीक पट्टे निवडले तर असे पट्टे खांद्यावर रुतण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बारीक पट्टे अजिबात घेऊ नका. त्या ऐवजी थोडे जाड आणि तुमच्या ब्रेस्ट साईजचा भार घेऊ शकतील अशा ब्राचे पट्टे निवडा. 

फुलकव्हरेज ब्राची निवड

Instagram

ब्रेस्ट साईज मोठी असेल तर कपसाईज ही नेहमी योग्य असायला हवी. कपसाईजची निवड हा एक संपूर्ण वेगळा आणि महत्वाचा विषय आहे.पण यासोबतच बस्ट साईज मोठी असणाऱ्यांसाठी कपसाईजचा शेप महत्वाचा असतो. अशांनी ब्राची निवड करताना ती फुलकव्हरेज असलेली घ्यावी. फुलकव्हरेज असलेल्या ब्रामध्ये तुमच्या स्तनांना योग्य उभारी मिळते. फुलकव्हरेजची ही दिसायला तुम्हाला मोठी जरी वाटली तरी अशा ब्राच्या फिटिंग या फार व्यवस्थित फिट देतात आणि त्या तुम्ही दिवसभर अगदी आरामात घालू शकता. 

वायर्ड ब्रा घालताय? तर वाचा चुकीच्या फिटिंगचे नुकसान

फॅन्सी ब्रा टाळा

Instagram

ब्रामधील वेगवेगळ्या फॅशन्स करायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फॅन्सी ब्रा घेण्याची चुकी टाळा. बरेचदा फॅन्सी ब्रा या तुम्हा आणि तुमच्या स्तनांना योग्य कम्फर्ट देतीलच असे नाही. कारण फॅन्सी ब्राचे पट्टे, कव्हरेज हे सगळ्यांनाच योग्य फिट देतील असे नसतात. त्यामुळे तुम्ही कधीही फॅन्सी ब्रा घेणे टाळा. जर तुम्हाला एखाद्या खास कपड्यांसाठी फॅन्सी ब्रा घ्यायची असेल तर ती रेग्युलरवेअरसाठी अशा फॅन्सी ब्रा मुळीच घेऊ नका.

टाईट ब्रा टाळा

काही जणांना घट्ट ब्रा घेतल्या की, आपल्या ब्रेस्टचा आकार कमी दिसेल असे वाटते. पण असे मुळीच नाही. तुम्ही टाईट ब्रा घेतल्या की, तुमच्या बल्जेस दिसण्याची शक्यता जास्त असते. अशा ब्रामध्ये तुम्ही सडसडीत आणि बारीक दिसण्याऐवजी खूप जाड दिसता. तुमच्या शरीरात फॅट जास्त आहे असे दिसू लागते. त्यामुळेब्राची साईज कमी निवडून किंवा कपसाईज कमी निवडून तुमच्या ब्रेस्ट साईज मुळीच कमी दिसणार नाहीत. त्यामुळे छोट्या ब्रा घेऊ नका.

महागडा शालू टाकण्यापेक्षा असा करा त्याचा उपयोग, पैसै होतील वसूल

दोन ब्रा घेण्यापेक्षा योग्य ब्रा घ्या

खूप जण स्तनांचा आकार मोठा दिसू नये. त्यांची हालचाल होऊ नये म्हणून एकाच वेळी दोन ब्रा घालतात. पण असे मुळीच करु नका. हेवी  ब्रेस्ट असली म्हणून त्यासाठी दोन ब्रा घालण्याची काहीच गरज नाही. जर तुम्ही योग्य कपड्यातील आणि वरील सगळ्या ठोकताळयांमध्ये बसणारी ब्रा निवडली तर तुम्हाला फार विचार करण्याची गरज नाही. तुम्ही एकच ब्रा घालून तुमच्या मोठ्या ब्रेस्टना चांगली उभारी आणू शकता. 


आता ब्रेस्ट साईज मोठी म्हणून लाज वाटण्याची काहीच कारण नाही ते आकर्षक दिसण्यासाठी ब्रा निवडताना अशा चुका टाळा. 

हेही वाचा :

bra size a b c d means in hindi
सबसे अच्छी ब्रा कौन सी है

Beauty

Molten Matte Liquid Lipstick- Bia

INR 645 AT MyGlamm