आरोग्यासाठी उपयुक्त आहे द्राक्षाची चटणी अशी करा तयार घरी

आरोग्यासाठी उपयुक्त आहे द्राक्षाची चटणी अशी करा तयार घरी

द्राक्ष तर तुम्ही खूप वेळा खाल्ली असतील तर पण कधी द्राक्षाच्या चटणीची चव चाखली आहे का ? नसेल तर एकदा या चवीचा स्वाद अवश्य घ्याच. द्राक्षाची चटणी फक्त चटकदारच नाही तर आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. कारण या चटणीत द्राक्षाचे पोषक घटक असतात. द्राक्षातील व्हिटॅमिन सीमुळे तुमची त्वचा आणि केस सुंदर होतात. रोग प्रतिकारशक्ती वाढते. यासाठीच जाणून घ्या द्राक्षाची चटणी कशी तयार करावी आणि  त्याचे आरोग्यावर काय काय चांगले फायदे होतात.

द्राक्षाची चटणी बनवण्याची सोपी पद्धत -

द्राक्षाची चटणी तुम्ही पोळी, भाकरी, ब्रेडसोबत खाऊच शकता. शिवाय ही चटणी नुसतीच खायलाही छान लागते. 

द्राक्षाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य -

  • द्राक्ष
  • लाल तिखट
  • मीठ
  • गुळ
  • मेथी पावडर
  • जीरे पावडर
  • बडिसोपची पावडर

चटणी बनवण्याची पद्धत -

एका कढईत थोडं तेल घ्या. गॅसवर तेल गरम झालं की त्यात मेथी पावडर, जीरे पावडर, बडीसोप टाका. थोडं परतल्यावर त्यात द्राक्षांच्या फोडी टाका. द्राक्ष शिजल्यावर वरून लाल मसाला आणि चवीनुसार मीठ टाका. झाकण ठेवून एक वाफ द्या. गॅसवरून खाली उतरण्याआधी गुळ टाका. गुळ वितळला की तुमची चटणी खाण्यासाठी तयार होते. पातळ चटणी करण्यासाठी  तुम्ही त्यात थोडं कोमट पाणी मिसळू शकता. 

instagram

मधुमेहींसाठी उपयुक्त

द्राक्षाची चटणी मधुमेहींसाठी फारच उपयुक्त आहे. कारण द्राक्षामध्ये ग्लाइसेमिक लोड आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी करणारे गुणधर्म असतात. जर द्राक्षाची चटणी तुमच्या नियमित आहारात असेल तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. द्राक्षाची चटणी खाण्यामुळे मधुमेहापासून तुमचे संरक्षणही होऊ शकते. त्यामुळे ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आहारातून ही चटणी घेण्यास सुरूवात करावी. 

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो

शरीरात रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले की ह्रदयाच्या समस्या निर्माण होतात. ह्रदय विकारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी कोलेस्ट्रॉवर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो त्यांना पुढे मधुमेह आणि ह्रदय विकार होण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांनी आहारात द्राक्षाची चटणी समाविष्ट केल्यास कोलेस्ट्ऱॉलवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. 

instagram

अस्थमाचा त्रास कमी होतो

दमा अथवा अस्थमा हा एक असा आजार आहे  ज्यामध्ये रूग्णाला सतत आरोग्याची काळजी घ्यावी लागते. धुळ,माती, प्रदूषण, वारा यामुळे अशा रूग्णांना लगेच त्रास होण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्यांना कधी आणि कशामुळे त्रास होईल हे सांगता येत नाही. मात्र द्राक्षाच्या चटणीमुळे अस्थमाच्या लोकांचा त्रास आटोक्यात येऊ शकतो. द्राक्षामुळे श्वसनमार्गातील सूज आणि इनफेक्शन कमी होण्यास मदत होते. 

थोडक्यात आरोग्य समस्या दूर ठेवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी द्राक्षाची चटणी नियमित खाणे तुमच्या फायद्याचे ठरेल. आम्ही तुमच्यासोबत केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही द्राक्षाच्या चटणीची रेसिपी ट्राय केली का ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा. शिवाय तुमच्याकडे द्राक्षाची चटणी बनवण्याची एखादी वेगळी पद्धत असेल तरलती देखील तुम्ही आमच्यासोबत शेअर करा.