लिपस्टिकच्या मदतीने अशी मिळवा तुमच्यासाठी परफेक्ट शेड

लिपस्टिकच्या मदतीने अशी मिळवा तुमच्यासाठी परफेक्ट शेड

लिपस्टिकचे सुंदर शेड बाजारात रेडिमेड मिळतात. पण इंडियन स्किनटोनचा विचार केला तर सगळ्यांनाच लिपस्टिकचे सगळेच शेड उठून दिसतात असे नाही. ज्या प्रमाणे वयानुसार आणि कामानुसार लिपस्टिकची शेड निवडतो. कधी कधी एखाद्या स्किनटोनला एखादी लिपस्टिक शेड खूप उठून दिसते. पण ती तुम्हाला दिसतेच असे नाही. आता परफेक्ट लिपस्टिक शेड म्हणजे काय ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जर तुम्हाला बाजारातून आणलेले रेडिमेड शेड परफेक्ट वाटत नसतील तर तुम्ही एक ते दोन शेड एकमेकांमध्ये मिसळून तुमच्यासाठी परफेक्ट शेड बनवू शकता. नेमके कोणते रंग तुम्ही एकमेकांमध्ये मिसळू शकता ते जाणून घेऊया. 

स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी

लिपस्टिकची परफेक्ट शेड म्हणजे काय?

Instagram

लिपस्टिक ही तुमची पर्सनॅलिटी उठून दिसण्यासाठी असते. एखादी शेड लावल्यानंतर तुमचा स्किनटोन आणि तुमची पर्सनॅलिटी उठून दिसायला हवी. लाल, गुलाबी, चॉकलेटी अशा काही शेड्स याच्यामध्ये मिळतात. याच्यामधील वेगवेगळ्या शेडमध्ये प्रत्येक रंगाचे प्रमाण हे थोडेफार वेगळे असते. एखादी लिपस्टिक ओठांवर लावल्यानंतर जर तुम्हाला त्यामध्ये कम्फर्टेबल वाटत असेल तर गी लिपस्टिक शेड तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती

लिपस्टिकचे हे शेड मिसळून बनवा परफेक्ट शेड

  • जर तुम्हाला खूप लाल रंग ओठांना लावायला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेला लाल आणि चाॅकलेटी रंग एकत्र करु शकता. त्यामुळे तुम्हाला एक मरुन रंगाची शेड मिळते. जी लालच्या तुलनेने अधिक चांगली दिसते.  तुम्हाला किती लाईट आणि डार्क शेड हवा त्यानुसार तुम्ही लाल- चॉकलेटी रंगाचा वापर करु शकता.
  • रेड- ऑरेंज रंगाची एक शेडही कोणत्याही स्किनटोनला चांगली दिसणारी असते. केशरी आणि लाल रंगाची लिपस्टिक शेड घेऊन तुम्ही ती एकत्र करुन घ्या. तयार झालेली लिपस्टिकची शेड ही देखील खूप रिफ्रेशिंग दिसते. 
  • बरेचदा आपल्याला हवा असलेला पेस्टल शेड आपल्याला मिळत नाही. अशी पेस्टल शेड तुम्हाला गुलाबी आणि ब्राऊन कलरच्या लिपस्टिक पासून बनवता येते. ही पेस्टल शेड तुम्ही डार्क आणि लाईट करु शकता. जी दिसायला खूपच सुंदर दिसते. 

लिपस्टिक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जास्त दिवस टिकते का, जाणून घ्या तथ्य

Instagram

  • केशरी आणि पिंक हा रंग एकत्र करुनही तुम्हाला एक रिफ्रेशिंग शेड मिळवता येते. ही शेड खूपच ब्राईट दिसते. लिपस्टिकची ही शेड तुम्हाला अगदी कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येते. यामधून तुम्हाला पीच, कोरल, साल्मन असे शेड मिळू शकतात. 
  • जर तुम्हाला न्यूड शेड आवडत असेल तर तुम्ही गुलाबी, चॉकलेटी आणि ऑरेंज असे शेड्स एकत्र करुनही एक सुंदर रंग तयार करु शकता. जो खूपच सुंदर दिसतो. 

हे असे काही लिपस्टिक शेड तुम्ही एकमेंकामध्ये मिसळून बनवू शकता. जे खूपच सुंदर आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला बनवता येतात.