डोळ्यांच्या रंगानुसार का निवडायला हवा आयलायनरचा रंग

डोळ्यांच्या रंगानुसार का निवडायला हवा आयलायनरचा रंग

डोळ्यांना आयलायनर लावायला आवडत असेल आणि त्यावर वेगवेगळे प्रयोग करायला आवडत असतील तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे आयलायनर नक्की ट्राय करायला हवे. हल्ली आयलायनरमध्ये खूप व्हरायटी मिळते. आयलायनरचे वेगवेगळे प्रकारच नाही तर आयलायनरच्या वेगवेगळ्या शेड्सही मिळतात. चॉकलेटी, हिरवा, निळा, जांभळा अशा शेड्सचे आयलायनर सध्या फारच हिट आहेत. रंगीबेरंगी आयलायनर लावण्याचा विचार करत असाल तर तुमच्या डोळ्यांच्या रंगानुसार तुम्ही आयलायनर निवडायला हवे. तसे केले तर तुम्हाला आयलायनर अधिक उठून दिसतील.

तुम्हालाही हवेत *जाड* आयब्रोज?,मग हे नक्की वाचा

करडा ते तपकिरी डोळ्यांचा रंग

भारतात खूप जणांच्या डोळ्यांचा रंग हा करडा, तपकिरी असा असतो. अशा रंगाचे डोळे हे खूपच सुंदर आणि बोलके असतात. जर तुमच्या डोळ्यांचा रंग असा असेल तर तुम्ही चॉकलेटी रंगाचे आयलायनर नक्की लावून बघा. कारण हे आयलायनर तुमच्या डोळ्यांच्या रंगामुळे लावल्यासारखे मुळीच वाटत नाही. शिवाय तुमच्या डोळ्यांचा आकार मोठा असेल तर डोळ्यांच्या रंगाचे आयलायनर लावल्यानंतर डोळे मोठे दिसत नाही. डोळ्यांचा रंग काळा असेल तर त्यांना चॉकलेटी हा रंग इतकासा उठून दिसत नाही. पण तपकिरी ते करड्या रंगाची शेड असलेल्यांना हा रंग अधिक चांगला दिसतो. 

Beauty

Stay Defined Liquid Eyeliner Brow Powder - Ebony & Walnut

INR 1,095 AT MyGlamm

निळे डोळे

निळे डोळे हे भारतात फारच कमी लोकांचे असतील. अगदी असले तरी ते लाखात एक असेच म्हणावे लागतील. जर तुमचे डोळे हिरवट निळे किंवा अशा शेड्समधले असतील तर तुम्हाला काळ्या रंगाचे लायनर छान दिसते. काळा रंगामुळे तुमच्या डोळ्यांच्या रंगाना छान उभारी येते. तुमचे डोळे अधिक सुंदर आणि मोठे दिसतात. निळ्या रंगाना निळ्या किंवा हिरव्या रंगाचे लायनर हे तितकेसे उठून दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच डोळ्यांचा रंग हा उठून दिसत नाही. डोळ्यांचा असा रंग असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे लायनर लावा.

घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक (How To Do Makeup At Home In Marathi)

Beauty

LIT Matte Eyeliner Pencil - Slay

INR 445 AT MyGlamm

घारे डोळे

घारे डोळे हे थोडेशे करडा, हिरव्या आणि थोड्याशा मिश्र शेडमध्ये असलेल्या रंगाला घारे डोळे म्हणू शकतो.असे डोळेही थोडे वेगळे असतात. अशा रंगाचे तुमचे डोळे असतील तर तुमच्या डोळ्यांमध्ये जो शेड जास्त असेल त्या शेडचे लायनर तुम्ही लावू शकता. घाऱ्या डोळ्यांमध्ये चॉकलेटी, हिरवा, निळा असा जास्त शेड असेल तर त्या रंगाच्या आयलायनरमधील गडद शेड घेऊन तुम्ही अगदी आरामात लावू शकता. तुमच्या डोळ्यांवर असे रंग चांगले उठून दिसतात. 

Beauty

LIT Matte Eyeliner Pencil - Girl Crush

INR 445 AT MyGlamm

काळे डोळे

भारतीयांमध्ये काळ्या रंगाचे डोळे असणे अगदी सर्वसाधारण आहे. डोळ्यांचा रंग काळा असेल तर अशा रंगाच्या डोळ्यांना अगदी कोणत्याही रंगाचे आयलायनर लावता येते. त्यामुळे तुम्ही अगदी काळ्यारंगापासून ते हिरवा, निळा अशा कोणत्याही रंगाचे आयलायनर लावू शकता. जर तुमच्या स्किनटोननुसार तुम्हाला चॉकलेटी रंग हा इतका चांगला वाटत नसेल तर तुम्ही काळ्या रंगाची गडद शेड निवडा. हिरवा किंवा निळा रंग निवडतानाही तुम्ही गडद रंगाची निवड करा म्हणजे तुमच्या डोळ्यांच्या रंगाना न्याय मिळेल. 


आता रंगीबेरंगी आयलायनर लावताना या गोष्टीचा नक्की विचार करा. 

म्हणून आलिया भट दिसते इतकी सुंदर, जाणून घ्या रहस्य

Beauty

LIT Matte Eyeliner Pencil - Wicked

INR 445 AT MyGlamm