ओट्सच्या वापराने अशी मिळेल सुंदर त्वचा

ओट्सच्या वापराने अशी मिळेल सुंदर त्वचा

वजन कमी करण्यासाठी ओट्सचा आहारात समावेश केला जातो. पण वजन कमी करण्यासोबतच त्वचेसाठीही ओट्स फारच फायदेशीर आहे.ओट्सचा वापर त्वचेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. ओट्सच्या वापरामुळे त्वचा मॉश्चराईज होण्यास मदत मिळते. शिवाय त्वचेवरील टॅन, पिंपल्स आणि अतिरिक्त कोरडेपणा जाऊन त्वचा ग्लो होते. ओट्स हे नैसर्गिक गुणांनी युक्त असल्यामुळे त्याचा त्रास त्वचेला होत नाही. ओट्सच्या नियमित वापरामुळे त्वचा दिवसेंदिवस अधिक सुंदर दिसू लागते. तुम्हीही त्वचेसाठी ओट्सचा वापर करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अशापद्धतीने ओट्सचा वापर करु शकता.

ब्लुबेरीजच्या वापराने मिळवा पिंपल्सपासून सुटका

ओट्स पॅक

Instagram

ओट्सचा पहिला फेसपॅक आहे जो खूपच सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळे कोणतेही साहित्य लागणार नाही. फक्त ओट्स आणि पाणी लागेल. एका भांड्यात तुमच्या चेहऱ्याला लागेल इतकेच ओट्स घ्या. त्यात पाणी घालून ओट्स भिजत ठेवा. ओट्स थोड्या वेळात फुगून येतात. त्याचा पॅक करण्यालाठी तुम्हाला ओट्स हाताने छान वाटून घ्यावे लागेल. त्यामुळे ओट्स चांगले हाताने वाटून घ्या आणि तयार पॅक चेहऱ्याला लावा. ओट्स पॅक वाळायला फारसा वेळ लागत नाही. पण साधारण 15-20 मिनिटांसाठी ठेवून द्या. नंतर कोमट पाण्याने त्वचा धुवून घ्या. तुम्हाला नक्कीच रिफ्रेशिंग वाटेल.

ओट्स- लिंबू पॅक

अनेक ब्युटी पॅक्समध्ये लिंबू किंवा व्हिटॅमिन C असलेले घटक घातले जातात.  जर तुमच्याकडे व्हिटॅमिन Cचे सीरम, संत्र्याचा रस असे काही नसेल तर तुम्ही सरळ लिंबाचा रसही घालू शकता. एक चे दोन चमचे ओट्स घेऊन त्यामध्ये एक चमचा व्हिटॅमिन C असलेले घटक घाला. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची एक पेस्ट बनवून घ्या. तयार मास्क चेहऱ्यावर लावा. साधारण 10 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा.. चेहरा स्वच्छ धुवून घ्या. लिंबामुळे त्वचेवरील टॅन निघण्यास मदत होेते. लिंबूमधील अॅसिडिक घटक ओट्समुळे कमी होतात आणि त्वचेची जळजळ होत नाही

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहेत आवळ्याच्या बिया, असा करा वापर

ओट्स कॉफी स्क्रब

Instagram

ओट्सचा वापर हा स्क्रब म्हणूनही केला जातो. ओट्स आणि कॉफी याचा एकत्रित वापर केल्यामुळे त्वचेस अधिक फायदे मिळतात एक चमचा ओट्स आणि एक चमचा कॉफी घेऊन एकत्र करा. त्यामध्ये थोडेसे ऑलिव्ह ऑईल किंवा तुमच्या आवडीचे तेल घालून त्वचा स्क्रब करायला घ्या.त्यामुळे त्वचा मॉईश्चरायईज राहण्यासही मदत मिळते. ओट्सच्या वापरामुळे टॅन कमी होते. आणि कॉफी त्वचेवरील सॅल्युलाईट कमी करण्यास मदत करते. ओट्स- कॉफी हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा वापर अगदी हमखास करायला हवा. आठवडयातून एकदा तरी असे स्क्रब चेहऱ्याला किंवा संपूर्ण शरीराला करण्यास काहीच हरकत नाही. 


घरी असलेल्या ओट्सचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करुन  सुंदर त्वचा मिळू शकता. आठवड्यातून एकदा जास्तीत जास्त दोनवेळा याचा वापर करा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा मिळेल.

बीचवर टॅन व्हायचं नसेल तर अशी घ्या त्वचेची काळजी