समुद्र आवडत असेल तर कोकणातील देवबाग आहे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण

समुद्र आवडत असेल तर कोकणातील देवबाग आहे तुमच्यासाठी बेस्ट ठिकाण

‘येवा कोकण आपलोच असा’ म्हणत आता पुन्हा एकदा कोकणातील पर्यटनाला सुरुवात झाली आहे. कोरोनाची भीती किंवा काळजी म्हणून तुम्हाला सध्या महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्याने समृद्ध अशा कोकणची निवड अनेक पर्यटकांनी केली आहे. कोकणातील वातावरण, तेथील जेवण, समुद्रकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक जण कोकणाकडे वळत आहे. कोकणाला जाण्याचा विचार करत असाल तर तळकोकणातील ‘देवबाग’ हे फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. देवबागला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही माझा #देवबागप्रवास जाणून घ्या आणि त्यानंतर लगेचच कोकणला जाण्यासाठी बॅग भरायला घ्या. कारण देवबाग आहेच इतकी सुंदर

गुलाबी शहर जयपूरचा फेरफटका, शॉपिंग आणि बरेच काही...मग तुम्ही कधी जाताय?

देवबाग आणि सुंदर समुद्रकिनारे

देवबाग हे कोकणातील अगदी छोटेसे गाव असून खाडी आणि समुद्राच्या मधोमध असलेले हे गाव आहे. एका बाजूला समुद्राची गाज आणि दुसरीकडे निवांत अशी खाडी दिसते. त्यामुळे तुम्हाला खाडी आणि समुद्र किनारे दोन्हीचा आनंद घेता येतो. देवबागमध्ये राहून बऱ्याच गोष्टी करता येणाऱ्या आहेत. शिवाय आजुबाजूला असणाऱ्या मालवण, आचरा, देवगड अशी काही ठिकाणंही फिरता येतात. जशी की, चिवला बीच, तारकर्ली बीच, संगम, त्सुनामी आयलँड, कुणकेश्वर मंदिर,रामेश्वर मंदिर, ओझर अशी बरीच ठिकाणं तुम्हाला करता येतात. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल तर तुम्ही देवबाग किंवा मालवण या दोन्ही बीचवर याचा आनंद घेऊ शकता. पॅरासिलींग, स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्कुटर, बनाना राईड अशा काही गोष्टीही करता येतात. या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला किमान ३ दिवस तरी देवबाग फिरायला आणि त्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी लागतात. 

उत्तम जेवण

जर तुम्ही सी फुडचे चाहते असाल तर तुमच्यासाठी हे ठिकाणं एखाद्या स्वर्गासारखे आहेत. कारण ताजे मासे आणि तेथील पाण्याची चव यामुळे येथील प्रत्येक पदार्थ हा चवदार लागतो. तुम्हाला मासे योग्य दरात या ठिकाणी मिळू शकतात. चिंगोळ्या, चिंबोऱ्या, सुरमई, कोळंबी, कालवं, तिसऱ्या, बांगडे असे वेगवेगळे मासे मिळतात. मस्त फिश फ्राय, फिश करी, भाकरी / चपाती, भात याचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे जेवणावर आडवा हात मारायला असेल आणि भरपूर व्हिटॅमिन सी ( समुद्र) याचा भरपूर आस्वाद घेता येईल. व्हेजप्रेमींनाही गावातील खास जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेता येईल. येथील वातावरण इतके चांगले आहे की, तुम्हाला पचनाचा अजिबात त्रास होत नाही. उलट तुम्हाला मस्त भूक लागते आणि तुम्ही जेवणाचा मनमुराद आनंद घेता येतो. 

नवीन वर्षात देशभ्रमंती करण्यासाठी असं करा प्लॅनिंग

असं करा बुकिंग

Instagram

कोकणात जाण्यासाठी अनेक ट्रेन आहेत. या शिवाय बस सर्व्हिसेससुद्धा आहेत.काही बस या थेट काही गावागावांमध्ये जातात. देवबागला जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून बस आणि ट्रेन आहेत. तुम्हाला बसने त्रास होत नसेल तर तुम्ही बस निवडा. कारण तुम्ही निवडलेल्या ठिकाणी तुम्हाला बस अगदी दारात जाऊन सोडतात. जर तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर कुडाळ किंवा सिंधुदूर्ग अशा दोन स्टेशन्सवर उतरु शकता. तेथून तुम्हाला बस किंवा गाडी करुन तुमच्या इच्छित हॉटेलवर जाता येते. कुडाळवरुन तुम्हाला साधारण २ तास लागतात. तुम्ही अगदी कोणताही पर्याय निवडू शकता.

खरेदी

Instagram

खूप जणांना फिरायला जाणं म्हणजे खरेदी करणं तेथील काही खाद्यपदार्थ आणि वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला याठिकाणी उत्तम कोकम, काजू, भाज्या,कोकमचा आगळ, कोकमचा रस, कैरी पन्हे, खडखडे लाडू( शेवाचे लाडू), कडक बुंदीचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू असे काही प्रकार घेण्यासारखे आहे. तुम्ही याची खरेदी करा. 


आता लगेचच बॅगा भरा आणि लगेचच देवबागसाठी निघा. 

साधारण बजेट: 12 ते 15 हजार प्रत्येकी (3 दिवस)

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी '25' पर्यटन स्थळं