लग्नात नक्की ट्राय करा या लेटेस्ट बांगड्यांच्या डिझाईन्स

 लग्नात नक्की ट्राय करा या लेटेस्ट बांगड्यांच्या डिझाईन्स

लग्नात नवरीचा हातात घातल्या जाणाऱ्या हिरव्या बांगड्या सौभाग्याचे लेणं म्हणून घातल्या जातात हिरव्या बांगड्या घालण्याची ही पद्धत कितीही जुनी असली तरी देखील फॅशनमधून कधीही आऊटडेटेड फॅशन होऊ शकत नाही. या हिरव्या बांगड्यांना साजेशा सोन्याच्या, मोत्याच्या आणि कुंदनच्या बांगड्या घालण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. यामध्ये वेगवेगळे ट्रेंड नेहमीच पाहायला मिळतात. लग्नासाठी तुम्हालाही हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घालण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या लेटेस्ट बांगड्या घालायच्या असतील तर तुम्ही या काही नव्या डिझाईन्सच्या बांगड्या ट्राय करु शकता. अगदी 1 ग्रॅम सोन्यापासून ते इमिटेशन अशा प्रकारामध्ये या बांगड्या मिळतात. बघुयात अशाच काही लेटेस्ट डिझाईन्स

टेंपल डिझाईन्स बांगड्या

Instagram

सध्या ज्वेलरी या प्रकारामध्ये टेंपल ज्वेलरीचा चांगलाच ट्रेंड सुरु आहे. जुनं ते सोनं म्हणत तशाच डिझाईन्स यामध्ये पाहायला मिळतात. टेंपल ज्वेलरीमध्ये मोठ्या प्रमाणा देव- देवतांचा किंवा मंदिरातील शिल्पावर कोरण्यात येणाऱ्या डिझाईन्सचा वापर केला जातो. अत्यंत कोरीव काम केलेल्या या बांगड्या असतात. तुम्हाला यामध्ये अगदी जाड कड्यांपासून ते बांगड्यांच्यामध्ये घालता येतील अशा पातळ बांगड्याही मिळतात. ज्या तुम्ही अगदी सहज बांगड्यांच्या मध्ये घालू शकता. जर तुम्ही टेंपल डिझाईन्सच्या बांगड्या निवडल्या असतील तर तोच संपूर्ण सेट वापरा. 

लग्नात सोन्याहूनही अधिक सुंदर दिसतील दागिन्यांचे हे प्रकार

लक्ष्मी बँगल्स

Instagram

टेंपल डिझाईनला थोडे पुढे नेत ही नवी बांगड्याची डिझाईन तयार करण्यात आली आहे. कमळात बसलेली लक्ष्मी घडवून या बांगड्या केल्या जातात. या बांगड्यांच्या सभोवती लक्ष्मी बनवली जाते म्हणूनच याला लक्ष्मी बांगड्या म्हणतात. यामध्येही तुम्हाला कितीतरी बांगड्यांचे प्रकार मिळतील. पण या बांगड्या तुम्हाला जाड कड्यांच्या रुपातच मिळतात. त्यामुळे जर हिरव्या बांगड्यांच्या मध्ये किंवा पुढे आणि सगळ्यात पाठी तुम्हाला कोणती बांगडी हवी असेल तर तुम्ही या प्रकारातील कडं अगदी हमखास घालू शकता. यामध्ये 1 ग्रॅमचे कडे अगदी हमखास मिळतात.

बॉडी टाईपनुसार अशी निवडा ब्लाऊजच्या हाताची लांबी

मोगरा मोती बांगड्या

Instagram

मोती तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही असा प्रकारच्या मोगरा मोती बांगड्या घालायला हव्यात. अगदी बारीक बारीक मोती गुंफून या बांगड्या तयार केल्या जातात. यामध्ये खरे मोती वापरले जात नाही. तर खोटया आणि आर्टिफिशिअल अशा कणीदार मोतींची गुंफण केली जाते. या बांगड्या दिसायला खऱ्या मोत्यांपेक्षाही फारच उठावदार असतात. यामध्येही तुम्हाला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. बारीक बांगड्या आणि जाड कडं अशा स्वरुपात या सगळ्या ज्वेलरी असतात. ज्या दिसायला खूपच सुंदर दिसतात. तुम्ही मोती अशी थीम ठरवली असेल तर हिरव्या बांगड्याच्या मधोमध असं जाड कडं घालायला काहीच हरकत नाही. कारण अशा बांगड्या हातात फारच सुंदर दिसतात. 

 

आता या काही बांगड्याच्या लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करा. 

बंधेज साडी देते रॉयल लुक, दिसाल अधिक उठावदार आणि आकर्षक