व्हॅलेंटाईन डे साठी करा अभिनेत्रींसारखा ट्रेंडी मेकअप, खास टिप्स

व्हॅलेंटाईन डे साठी करा अभिनेत्रींसारखा ट्रेंडी मेकअप, खास टिप्स

व्हॅलेंटाईन महिना (Valentine month) सुरू झाला आहे. पुढच्या आठवड्यापासून व्हॅलेंटाईन विक सुरू होईल. याची तयारी आजकाल मुली बऱ्याच आधीपासून सुरू करतात. यादिवशी सर्वात सुंदर दिसावे असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. आपल्या बॉयफ्रेंडने अथवा आपल्या नवऱ्याने आपल्या सौंदर्याची स्तुती करावी आणि आपल्याकडेच पाहत राहावं असं कोणत्या मुलीला वाटणार नाही? या दिवशी (Valentines Day) तर अगदी खास दिसायचं असतं. मग अशावेळी आपल्याला आपल्या आवडत्या अभिनेत्रींसारखा मेकअप करून तयार होता आलं तर...मग काय मज्जाच. पण मग हा लुक नक्की कसा करायचा असा प्रश्नही पडतो. तर हा लुक करणं काही कठीण नाही. तुम्हीही घरच्या घरी हा मेकअप लुक करू शकता. मस्त मेकअप लुक करा आणि तयार होऊन साजरा करा आणि अधिक खास बनवा हा व्हॅलेंटाईन डे! आम्ही दिलेल्या या टिप्स नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. जाणून घ्या या सोप्या टिप्स.

रोझ गोल्ड शिमर लुक (Rose Gold Shimmer Look)

Instagram

Make Up

Glow to Glamour Shimmer And Fixing Powder

INR 1,195 AT MyGlamm

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अधिक सुंदर दिसण्यासाठी तुम्ही रोझ गोल्ड शिमरी आयमेकअप लुक कॅरी करू शकता. रोझ गोल्ड शिमर मेकअप तुम्हाला सटल आणि क्लासी लुक मिळवून देतो. तुम्ही अतिशय क्लासी दिसून अधिक आकर्षक दिसता. अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा हा लुक तुम्हाला करता येणं सहज शक्य आहे. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हा लुक करता तेव्हा तुम्ही लायनरचा वापर करू नका. तर तुमच्या डोळ्यांना मस्कारा जास्त लावा. तसंच लिपस्टिकची शेड ही गडद आणि रोझ शेड्समध्येच निवडा. जेणेकरून तुमचा लुक अधिक आकर्षक दिसेल. यासाठी तुम्ही MyGlamm चा शिमर मेकअप नक्कीच ट्राय करू शकता.

कलर्ड आयलायनर लुक (Colourd Eyeliner)

Instagram

Beauty

Manish Malhotra Glitter Eyeliner - Galaxy Blue

INR 850 AT MyGlamm

सध्या कलर्ड आयलायनरची चलती आहे. त्यातही निळा रंग अधिक प्रमाणात वापरला जातो. हा रंग तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलविण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्ही जर व्हॅलेंटाईनसाठी लालऐवजी निळा रंगाचे कपडे घालण्याचे ठरवले असेल तर तुम्ही कलर्ड आयलायनर लुक करून जाऊ शकता. तुम्ही यावेळी शिमरी ब्लू आयलायनरचा वापरही करू शकता. प्राजक्ता माळीचा हा लुक तुम्हाला नक्कीच आकर्षित करेल. तुम्ही तुमच्या डोळ्यांप्रमाणे हा लुक कॅरी करा. यासह लिपस्टिकची लाईट शेड वापरा. कारण निळा रंग गडद असल्याने तुम्हाला लिपस्टिकची लाईट शेड अधिक चांगली दिसेल आणि जर गडद शेड वापरायची असेल तर गुलाबी रंगाची शेड वापरण्यास प्राधान्य द्या.

10 मिनिट्समध्ये कसे व्हाल बाहेर जाण्यासाठी तयार, मेकअप ट्रिक्स

स्मोकी आईज लुक (Smoky Eyes)

Instagram

Make Up

Manish Malhotra Beauty Eye It Makeup Kit by MyGlamm

INR 999 AT MyGlamm

ब्राऊन स्मोकी आईज अथवा ब्लॅक स्मोकी आईज सध्या खूपच चर्चेत आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी असा अप्रतिम आणि स्टायलिश लुक तुम्ही करू शकता. स्मोकी आय लुक केल्यानंतर तुम्ही न्यूड लिपस्टिकचा वापर करा. हा लुक तुमचे सौंदर्य अधिक खुलवतो. स्मोकी आय मेकअप आणि न्यूड लिप कलर हे अप्रतिम कॉम्बिनेशन असून तुम्हाला या व्हॅलेंटाईनसाठी एक उत्तम पर्याय आहे.

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

नो मेकअप लुक (No Makeup Look)

Instagram

Beauty

Manish Malhotra Hi-Shine Lipstick - Barely Nude

INR 950 AT MyGlamm

बऱ्याच अभिनेत्री गडद मेकअप करण्यापेक्षा नो मेकअप लुक करण्यासाठी  अधिक प्राधान्य देतात.  याचा अर्थ मेकअप केला जात नाही असं नाही. पण मेकअप केला आहे याची जाणीवही होत नाही असा हा लुक असतो.  तरीही अधिक आकर्षित करतो.  यासाठी चेहऱ्यावर केवळ कन्सीलर आणि फाऊंडेशनचा बेस लावण्याची आवश्यकता असते.  त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर लाईट गुलाबी रंगाच्या क्रिम ब्लशरचा वापर करा.  डोळ्यांवरही तुम्ही अगदी लाईट गुलाबी रंगाची क्रिमी आयशॅडो लावा. मस्कारा लावा आणि मग ओठांना लाईट शेडची लिपस्टिक लावा आणि लुक पूर्ण करा. तुम्हाला हवं  तर तुम्ही या मेकअपमध्येही न्यूड लिपस्टिकचा वापर करू शकता. 

स्किनटोननुसार परफेक्ट न्यूड लिपस्टिक कशी निवडावी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक